चौघांचा मृत्यू; 68 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 29) कोरोनाचे तब्बल 181 रुग्ण आढळले असून हा आतापर्यंतचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. तर दिवसभरात 68 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 131 कोरोनाबाधित …
Read More »Yearly Archives: 2020
राज्य गोंधळात, राज्यकर्ते सुशेगात
महाराष्ट्रातील कमालीच्या गोंधळलेल्या आणि गोंधळ घालणार्या तीन चाकी आघाडी सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अशी आंग्ल भाषिक घोषणा करीत अखेर 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमांद्वारे जनतेशी प्रदीर्घ संवाद साधताना कोणतीही ठोस माहिती न दिल्यामुळे सामान्य जनांमधील गोंधळ कायम असून जनतेच्या हालअपेष्टांमध्ये वाढच झाली आहे. अनलॉक …
Read More »राज्यात लॉकडाऊन कायम
31 जुलैपर्यंत निर्बंध लागू राहणार मुंबई : प्रतिनिधीराज्यात ’मिशन बिगिन अगेन’चा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महिनाभर लॉकडाऊन कायम राहणार असून, सध्या आहे तेच नियम लागू असतील. यात शिथिलता देण्यात आलेली नाही. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. 1 …
Read More »मुरूड : समुद्रात डुंबण्यासाठी तसेच जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असत. सध्या मात्र हा सारा परिसर पर्यटकांविना सुना सुना दिसत आहे. (छाया : सुधीर नाझरे)
Read More »रक्तदान शिबिरास प्रतिसाद
खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात खोपोली मुस्लिम वेल्फेअर ट्रस्टकडून विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोहना समाज व सर्वोदय ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रविवारी (दि. 28) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत येथील मुस्लिम समाज सभागृहात रक्तदान शिबिर संपन्न झाले. या वेळी …
Read More »कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी तहसील कार्यालयास रुग्णवाहिकेची भेट
पेण ः प्रतिनिधी कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांसाठी काही वेळेस रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नाही. तसेच बरे होऊन येणार्या रुग्णांस अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या अनुषंगाने समाजसेवक राजू पिचिका यांनी पेण तहसील कार्यालयास एक रुग्णवाहिका भेट दिली आहे. पेणमध्ये सध्या कोरोनाचे आकडे वाढत आहेत. एकाच वेळी अनेक पॉझिटिव्ह रुग्ण …
Read More »श्रीवर्धनमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनास अडचणी; बाहेरून आलेल्या कर्मचार्यास कोरोना
श्रीवर्धन ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यात थैमान घातले. वादळामुळे विजेचे खांब, तारा तुटून पडल्या. कांदळगाव ते पाभरे टॉवर लाईन, पाभरे ते श्रीवर्धन हाय टेन्शन लाइनचे काम मालेगाव, ठाणे, कल्याण, पनवेलहून आलेल्या महावितरणच्या स्टाफने चोखपणे केले, परंतु बाहेरून आलेल्या महावितरण कर्मचार्यांतील एकाला खोकला, ताप तसेच कोरोनासदृश लक्षणे दिसू लागल्याने विलगीकरणात …
Read More »माणगावात 15 नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या 28
माणगाव ः प्रतिनिधी रायगडात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हावासीय चिंताग्रस्त आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका असणार्या माणगावात दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर केला आहे. दोन महिन्यांत तालुक्यातील 28 गावांतून आजपर्यंत 94 जणांना कोरोनाची लागण होऊन त्यापैकी 64 जण बरे झाले असून दोघांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 28वर पोहचली आहे. …
Read More »जनता बंदला पेणकरांचा 100 टक्के प्रतिसाद; नगराध्यक्षांनी मानले आभार
पेण : प्रतिनिधी पेण शहरात मागील आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पेणमधील व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी व नगर परिषद प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत पेणकरांनी चार दिवस जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत 100 टक्के बंद पाळून पेणकरांनी तसेच ग्रामीण …
Read More »वैद्यकीय अधिकार्यांमार्फत ऑनलाईन शंकांचे निरसन
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक चिंतेत आहेत. त्यात केंद्र शासनाच्या सतत बदलणार्या विविध नियमांचव पालिकेला अंमलबजावणी करावी लागत आहे. या नव्या नियमांमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला असून नागरिकांचे शंका निरसन व्हावे या उद्दिष्टानुसार थेट वैद्यकीय अधिकार्यांनीच नागरिकांचे ऑनलाइन शंकानिरसन केले. स्थानिक माजी नगरसेवक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper