उरण : वार्ताहर – दिवसेंदिवस उरण तालुक्यात कोरोना संसर्ग प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर नियंत्रण व्हावे, त्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सहकार्याने व भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील धुतुम गावातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने गावात रविवारी (दि. 28) जंतुनाशक फवारणी करवून घेतली. या कामी …
Read More »Yearly Archives: 2020
कामोठ्यातील मोेकळ्या प्लॉटची साफसफाई
नागरिकांच्या समस्येचे भाजप नगरसेवकांकडून निवारण कामोठे : रामप्रहर वृत्त – कामोठे सेक्टर 34 येथील रिकाम्या प्लॉटवर खड्डे व झाडी, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे तेथे दुर्गंधी तसेच साप देखील बाहेर येत असतात. परिसरातील सोसायटींच्या पदाधिकार्यांनी या संदर्भात स्थानिक भाजप नगरसेवक विकास घरत व डॉ. अरुणकुमार भगत यांच्याकडे समस्या मांडली. त्यावेळी भाजपच्या …
Read More »नेरूळ-उरण रेल्वेमार्गाचा दुसरा टप्पा रखडला
सिडकोच्या दिरंगाईमुळे करावी लागणार प्रतीक्षा उरण : प्रतिनिधी – नवी मुंबईतील नेरूळ-उरण या सुरू असलेल्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी वन विभागाकडून सिडकोला तब्बल 50 वर्षांच्या प्रयत्नानंतरही वनखात्याकडून आवश्यक असलेली चार किमी अंतरावरील आवश्यक जागा भुसंपादन करता आलेली नाही. त्यामुळे सुमारे 27 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर 50 वर्षात फक्त 12.4 किमी …
Read More »जीएमबीएफ ग्लोबल, महावीर आरोग्य संघाचे अतुलनीय कार्य
कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांना दिलासा अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत प्रत्येक जण आपले योगदान देत आहे. त्यामध्ये जीएमबीएफ ग्लोबल आणि महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी या संघाचेही योगदान नक्कीच दखलपात्र आहे. महावीर आरोग्य सेवा संघ हा मास्क ग्रुप संचलित आहे. या संघाचे संचालक प्रसाद दोशी आहेत. ते जीएमबीएफ ग्लोबल फोरम दुबईचे …
Read More »मुरूड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुरूड शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुरूड अॅक्टीव्ह मेंबरच्या सदस्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता व्यापारीवर्ग, मेडिकल व इतर दुकानांत जाऊन तीन दिवस दुकाने बंद करून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. त्या विनंतीनुसार मुरूड शहरातील व्यापारी, भाजीविक्रेेते व इतर दुकानदारांनी …
Read More »पाली बाजारपेठ चार दिवस बंद
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण नुकतेच बरे होऊन घरी परतले होते. तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण असलेले पाली कोरोनापासून दूर होते, मात्र शनिवारी एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून रविवार (दि. 28) ते बुधवारपर्यंत (दि. 1) …
Read More »जिद्दीने करा मधुमेहाशी यशस्वी मुकाबला!
आरोग्य प्रहर मधुमेह हा तसा लांब पल्ल्याचा आजार. त्यामुळे तो झाला की बराच काळ, कदाचित आयुष्यभरही तुम्हाला इलाज करून घ्यावा लागतो. वेळोवेळी कराव्या लागणार्या रक्त तपासण्या, उपचार, त्यातून कुठले इंद्रिय त्याच्या विळख्यात सापडले की त्यासाठी होणारा खर्च या सगळ्याचा हिशेब मांडला तर कित्येक देशांची अर्थव्यवस्था ढासळेल की काय अशी परिस्थिती …
Read More »माणगावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू
बैठकीत एकमुखी निर्णय माणगाव ः प्रतिनिधी मागील 15 दिवसांपासून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने माणगावकरांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी सायंकाळी एकाच दिवशी कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळल्याने शनिवारी माणगावकर नागरिकांनी खबरदारीच्या हेतूने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एकत्रित येत सोमवार (दि. 29) ते शुक्रवारपर्यंत (दि. 3) जनता …
Read More »स्कॉलरशिप परीक्षेसाठी ऑनलाइन मोफत कोचिंग क्लासेस
उरण : वार्ताहर कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे शाळा बंद असून मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. यात विद्यार्थ्याचा महत्त्वाचा वेळ वाया जावू नये या करिता हे ऑनलाइन लाईव्ह क्लासेस घेण्यात येणार आहेत जेणे करून मुले घरी बसून आपला सर्व सिलॅबस पूर्ण करू शकतील. आणि त्यांचा अमूल्य वेळ सत्कारणी लागेल तसेच ह्या क्लासेसमुळे …
Read More »भारत रक्षा मंचची दशकपूर्ती खारघर येथे उत्साहात साजरी
खारघर : रामप्रहर वृत्त भारत रक्षा मंच या संघटनेचा दशकपूर्ती सोहळा खारघर येथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत शनिवारी (दि. 27) साजरा करण्यात आला. मंचची स्थापना सन 2010मध्ये भोपाळ येथे केली गेली होती. ’बांगलादेशी घुसखोरी : देशावरील मोठे संकट’ या परिचर्चेतून सूर्यकांत केळकर यांनी संघटनेची स्थापना केली व आज देशातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper