पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 10) कोरोनाचे 14 नवीन रुग्ण आढळले, तर 20 जणांनी कोरोनावर मात करून सुखरूपपणे घरी गेले आहेत. नव्या रुग्णांमध्ये शहरी भागातील खारघर येथील सहा, कामोठे पाच आणि पनवेल व कळंबोलीतील प्रत्येकी एक अशा 13 जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागात उमरोली येथे एका व्यक्तीला कोरोनाची …
Read More »Yearly Archives: 2020
धक्कादायक! उरणमधील करंजात आढळले 21 रुग्ण
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील करंजा येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि क्वारंटाइन केलेल्या 77 पैकी 21 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नवे रुग्ण चार कुटुंबांतील सदस्य असून, त्यात वृद्ध महिला-पुरुषांसह लहान मुलांचा समावेश आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने उरण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. …
Read More »पनवेल महानगरपालिका हद्दीतील इतर दुकानेही सुरू; सत्ताधारी भाजपच्या सूचनेची दखल
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत जीवनावश्यकखेरीज इतर दुकानेही सुरू करावीत, अशी सूचना महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आयुक्तांकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने ठरवून दिलेल्या वारानुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान ही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली असून, या वेळी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील परिस्थिती …
Read More »विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध
मुंबई : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणार्या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. अखेर काँग्रेस एकच जागा लढवण्यास राजी झाल्याने महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार असून, यामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. संख्याबळ नसतानाही दोन जागा लढवण्याच्या …
Read More »ग्रामपरिस्थितिकीय विकास समितीकडून शिरढोणमध्ये गॅस सिलिंडर रिफिलिंग
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. देशात सर्व व्यवहार ठप्प असल्याने हातावर पोट असणारे मजूर, गरीब नागरिक, झोपडपट्टीवासीय यांना दोन वेळचे अन्न देखील मिळेनासे झाले आहे. अशा वेळेस त्यांना संकटकाळात, एक हात मदतीचा पुढे करीत ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती शिरढोण च्या माध्यमातून शिरढोण …
Read More »दररोज 500 कोरोना चाचण्या क्षमतेची लॅब नवी मुंबईत उभारा
आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणायची असेल तर जास्तीत जास्त नागरिकांच्या कोरोना चाचण्या होणे गरजेचे असून त्याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून स्वमालकीची नवी मुंबईत 500 कोरोना चाचण्या दररोज करण्याची क्षमता असलेली स्वतंत्र लॅब उभारा, अशी मागणी आमदार गणेश …
Read More »मांडवणेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कडाव : प्रतिनिधी शासनाने केल्यानंतर आवाहनाला प्रतिसाद देत काही ग्रामपंचायतींनी या देशकार्यात सहभागी होऊन रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने मांडवणे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दोन महिला व 24 पुरुषांनी रक्तदान करुन देश कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. रविवारी (दि. 10) मांडावणे ग्रामपंचायत हद्दीतील हरेहरेश्वर मंदिराच्या भव्य …
Read More »खारभूमी मजबुतीकरणाची लगबग सुरू
कामे उरकण्यासाठी अधिकार्यांची होणार दमछाक पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे गडब, खारपाले, कासू भागातील खारपाले, खारढोंबी जुईअब्बास, माचेला चिर्बी तर रावे, कोपर, भाल विठ्ठलवाडी, वडखळ या खारभूमी क्षेत्रातील तब्बल 9000 एकरावर नापिकीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. यामुळे बंधार्याची मजबुती करण्याची कामे येत्या 25 दिवसात करण्यासाठी खारभूमी विभागाचे …
Read More »नवी मुंबईत कोरोनाचे थैमान
रविवारी आढळले 82 रुग्ण; एकूण संख्या 674 वर नेरुळ : बातमीदार नवी मुंबईत कोरोना बधितांची संख्या वाढत असून रविवारी (दि. 10) एकाच दिवसात 82 रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 674 झाली आहे. शनिवारपर्यंतचा एका दिवसात रुग्ण वाढीचा हा सर्वोच्च आकडा असल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेला कठोर पाऊले उचलण्याशिवाय …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते धान्यवाटप
सुधागड : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शासनाच्या वतीने अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे. सुधागड तालुक्यातील निराधार महिला, रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू व्यक्ती, कामगार, बेघर व्यक्तींना शासनाकडून ओएमएसएस योजनेंतर्गत धान्य देण्यात आले. अशाच प्रकारे तालुक्यातील शिळोशी ग्रामपंचायत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper