आकाश जुईकर यांचा मदतीचा हात मोहोपाडा : प्रतिनिधी – रसायनी परिसरात गोरगरिबांच्या हाकेला धावणारे भाजपचे वासांबे पंचायत समिती अध्यक्ष व भाजप कामगार विभागाचे सरचिटणीस आकाश अमृत जुईकर यांनी मोहोपाडा पंचशिलनगर, खाने आंबिवली, नवीन पोसरी व परीसरातील आदिवासी बांधव, कलर काम करणारे कामगार, रोजंदारी करणारा कामगार वर्ग व गरजू गोरगरिबांना धान्यासह …
Read More »Yearly Archives: 2020
देशाचे दीपस्तंभ
जनतेने निव्वळ मनोभावे दिवेच प्रज्वलित केले नाहीत, तर दुसर्या दिवशी म्हणजे सोमवारी समाजमाध्यमांवर या उपक्रमाद्वारे आपल्याला कशी विलक्षण जादूई अनुभूती मिळाली याचे वर्णनही केले. आपल्या अनोख्या उपक्रमांतून मोदी जनतेची आंतरिक शक्ती कशी वाढवत आहेत याचेच दर्शन समाजमाध्यमांवरील या प्रतिक्रियांमधून घडते. जगभरात कोरोनाचे थैमान अद्यापही सुरूच आहे. भारतातली परिस्थिती युरोप-अमेरिकेच्या तुलनेत …
Read More »लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले माणगाव
माणगाव ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला माणगाव तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानुसार रविवारी (दि. 5) एक दिवा स्वतःसाठी, देशाच्या हितासाठी अशी मनोधारणा करून एकता दाखवत लक्ष लक्ष दिव्यांनी संपूर्ण माणगावनगरीसह तालुका उजळून निघाला होता. कोरोनाच्या महामारीतून जनतेची लवकर सुटका व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध युक्त्या …
Read More »कर्जतमध्ये महावीर जयंती साधेपणाने साजरी
कर्जत ः प्रतिनिधी जगभरात कोरोनाचे संकट पसरल्याने कर्जतमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणारी श्री महावीर जयंती यंदा सोमवारी (दि. 6) जैन बांधवांनी केवळ महावीरांचे दर्शन घेऊन अत्यंत साधेपणाने साजरी केली. इतिहासात पहिल्यांदाच येथील मिरवणूक रद्द करण्यात आली. श्री महावीर जयंती म्हणजे जैन धर्मियांचा एकप्रकारे सणच आहे. सकाळपासूनच जैन मंदिरात …
Read More »ट्रान्सफार्मरला आग; वीजपुरवठा खंडित
खोपोली ः प्रतिनिधी खोपोलीतील खालची खोपोली अमरधामजवळील विजेच्या ट्रान्सफार्मरला सोमवारी (दि. 6) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. परिसरात सुके गवत व अन्य साहित्य असल्याने ही आग पसरली. आग आटोक्यात आणण्यासाठी वीज वितरणचे अधिकारी व खोपोली अग्निशमन दलाने मेहनत घेतली. दरम्यान, यामुळे संपूर्ण खोपोली शहरातील वीजपुरवठा एक तासासाठी खंडित झाला …
Read More »आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; मुस्लिम समाजाचा पुढाकार
माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे माणगावमधील मोर्बा येथील मुस्लिम समाज बांधवांनी लक्ष केंद्रित करून परिसरातील सात आदिवासी वाड्यांतील 500 कुटुंबांना साधारण 450 रुपये किमतीचे कांदा, बटाटा, दोन प्रकारच्या डाळी, तेल, साखर, चहा पावडर, मिरची पावडर, मीठ असे एका कुटुंबाला कमीत कमी आठवडाभर …
Read More »संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांना पोलिसांचा इशारा
पेण ः प्रतिनिधी राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत असून जिल्ह्यातही अनेक ठिकाणी प्रसार होत आहे, परंतु पेणकरांना यांचे गांभीर्य दिसत नसून अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करून संचारबंदीचे उल्लंघन करीत आहेत. परिणामी आता मलाच रस्त्यावर उतरावे लागल्याची प्रतिक्रिया पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांनी दिली. कोरोनासारख्या जीवघेण्या आजराशी मुकाबला …
Read More »एक दिवा एकात्मतेचा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद उरण : वार्ताहर – कोरोनाला आपण निश्चित परतवुन लाऊ एक दिवा एकात्मतेचा, असा संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला समस्त देशवासीयांनी प्रतिसाद दिला. रविवार (दि. 5) रात्री 9 वाजता 9 मिनिटे देश भारत सर्व ठिकाणी दिप प्रज्वलित करून कोरोना विरोधाच्या संघर्षात आणखी …
Read More »श्री साई नारायणबाबा मंदिराकडून गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप
पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरातील रेल्वे स्टेशनजवळील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री साई नारायणबाबा मंदिराच्या वतीने आजही गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे वाटप त्याचप्रमाणे 140 विधवा माता-भगिनींना पूर्ण महिन्याचे रेशन श्री साई नारायणबाबा यांच्या हस्ते देण्यात आले आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावावर हातावर पोट असणार्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. …
Read More »मास्कविक्रीच्या बहाण्याने फसवणूक
पनवेल : बातमीदार – कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी वापरण्यात येणारे मास्क व इतर वैयक्तिक सुरक्षा उपकरणांच्या मागणीत वाढ झाल्याची संधी साधून या वस्तूंच्या विक्रीच्या बहाण्याने टोळीने ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या टोळीने देशभरातील विविध सरकारी व खासगी रुग्णालयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. एन-95 मास्क व वैयक्तिक सुरक्षा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper