Yearly Archives: 2020
रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप
पेण : प्रतिनिधी शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत 2018-19 मध्ये पेण नगर परिषद हद्दीतील घरकुल मंजूर केलेले लाभार्थी कैलास जनार्दन जाधव व सुनिल हरिश्चंद्र पंते यांना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते एक लाख 25 हजार रूपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. उपनगराध्यक्षा वैशाली कडू, मुख्याधिकारी अर्चना दिवे, गटनेते अनिरूद्ध पाटील, सभापती दर्शन …
Read More »खालापुरात शिक्षकाला बेदम मारहाण; अज्ञात चौघांविरोधात अॅेट्रॉसिटीचा गुन्हा
खोपोली : प्रतिनिधी नेहमी नाटक करत असतो याच्या शाळेला लॉक लावा, असे धमकावत खालापूर तालुक्यातील खरसुंडी शाळेतील शिक्षक रमेश नामदेव देवरूखकर (वय37, रा. निळजे डोंबविली) यांना जातीवाचक शिविगाळ करून चार जणांनी शाळेतच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. खरसुंडी येथील दत्तात्रय शिवराम जाधव माध्यमिक शाळेत रमेश शिक्षक आहे. सोमवारी शाळा …
Read More »विद्यार्थ्यांच्या आहारात गोमाशी प्राथमिक शाळेच्या परसबागेतील भाज्या
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील गोमाशी गावातील प्राथमिक शाळेत परसबाग उपक्रम राबविण्यात आला आहे. या परसबागेतील विविध भाज्या विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात वापरल्या जातात. तसेच शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांना त्यांची नावे दिली असून, या झाडांचे संगोपन विद्यार्थी करत आहेत. ही झाडे विद्यार्थ्यांनी दत्तक घेतली आहेत. विद्यार्थी व गोमाशी शाळा व्यवस्थापन …
Read More »जाहिरातबाजीसाठी वृक्षतोड; रस्ते विकास महामंडळाचा प्रताप; ‘काम बंद’चे आदेश
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील कि मी.42 जवळ होर्डिंग, बोर्ड लावण्यासाठी कुठल्याही खात्याची परवानगी न घेता वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार खोपोलीतील पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे. खुद्द महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वृक्षतोड करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पार …
Read More »खोपोलीत थांबली रस्त्यांची कामे; निधी मंजूर असूनही नगर परिषद प्रशासनाचा कानाडोळा
खोपोली : प्रतिनिधी शहरातील शास्त्रीनगर भागामधील रस्त्यांच्या कामांना मागील महिन्यात सुरुवात करण्यात आली, त्यावेळी टप्याटप्याने शहरातील सर्वच रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण होईल, असे खोपोली नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र येथील एकाच रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर यंत्रणा गायब झाली. त्यामुळे या भागातील अन्य रस्त्यांचे काय? शहरातील अन्य रस्त्यांची कामे होणार …
Read More »बालसंस्कार विद्यामंदिरने ठेवला वेगळा आदर्श -महेश शिंदे
महाड : प्रतिनिधी आजच्या युगात शिक्षण हा व्यवसाय झाला असून, या बाजारात बाल संस्कार विद्या मंदिर या संस्थेने कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा वेगळा आदर्श जगासमोर ठेवला असल्याचे मत पत्रकार महेश शिंदे यांनी मंगळवार (दि. 11) येथे व्यक्त केले. महाड तालुक्यातील कोकरे येथील बालसंस्कार विद्या मंदिर या शाळेतील …
Read More »खारपाडा येथे स्वच्छता अभियान
पेण : प्रतिनिधी सीएफआय, बीएनवाय व एम्पॉवर तसेच खारपाडा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने खारपाडा गावात नुकताच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी एकूण 49 किलो प्लास्टिक गोळा करून गावात स्वच्छता व प्लास्टिक बंदी विषयी जनजागृती करण्यात आली. आयबीएनच्या चेअरपर्सन हेगे मॅग्नुस्सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमिला स्कॅरे, छायाचित्रकार हल्लवर जोहोन्सन, सीएफआयचे मुख्यकार्यकारी …
Read More »नेरळच्या धरणावरील पूल कधी? रायगड जिल्हा परिषदेकडून ग्रामस्थांची सातत्याने दिशाभूल
कर्जत ़़: बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेला पूल 2018 मध्ये कोसळला आहे. येथील ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली असलेल्या या पुलाच्या बांधकामाबद्दल रायगड जिल्हा परिषद सातत्याने चुकीची माहिती देत आहे. दरम्यान, नेरळमधील पूल कोसळून दोन वर्षे पूर्ण होत आली तरी पुलाचे बांधकाम सुरु झाले नाही, त्यामुळे सलग तिसरा पावसाळादेखील पुलाअभावी जाण्याची शक्यता …
Read More »घोटाळेबाज कर्नाळा बँकेवर आज ठेवीदारांचा धडक मोर्चा
पनवेल : रामप्रहरकर्नाळा बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदार व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत बँकेचे अध्यक्ष व शेकाप नेते केवळ आश्वासने देत आहेत. ठेवीदारांचे हक्काचे पैसे मात्र त्यांना दिले जात नाहीत, तर दुसरीकडे सरकारही याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper