Breaking News

Yearly Archives: 2020

रणजी स्पर्धेतून मुंबईचे आव्हान संपुष्टात

मुंबई : प्रतिनिधी स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी संघ अशी ओळख असलेल्या मुंबईचे रणजी क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेले आहे. सौराष्ट्राविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे मुंबईचा संघ बाद फेरीच्या शर्यतीमधून बाहेर फेकला गेला आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाला बडोद्याविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या डावात मुंबईने सर्फराज …

Read More »

कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची दमदार सुरुवात

अलिबाग : प्रतिनिधी  कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी यजमान महाराष्ट्राने 6 बाद 306 अशी मजल मारली. रणजीत निकम याने आक्रमक फलंदाजी करून शतकी खेळी (140 धावा) केली. हा सामना नागाठणे येथील रिलायन्स क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. कर्नाटकने नाणेफेक जिंकून महाराष्ट्रास प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. महाराष्ट्राच्या …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी वन-डे : भारतासाठी ‘करो या मरो’

ऑकलंड : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात 347 धावांचा डोंगर उभारूनदेखील पराभव झाल्याने भारतीय संघाला झटका बसला. टी-20 मालिकेत 5-0ने धमाकेदार विजय मिळवणार्‍या भारतीय संघाला हा पराभव पचनी न पडणारा होता. आता तीन सामन्यांच्या वनडेत शनिवारी (दि. 8) होणारी लढत टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ अशी आहे. …

Read More »

राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत मोरे, अपूर्वाला जेतेपद

जळगाव : प्रतिनिधी येथील श्री शिव छत्रपती जिल्हा क्रीडा संकुलात खेळल्या गेलेल्या 48व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिला सेट गमाहूनही खेळणारा विद्यमान विश्वविजेता प्रशांत मोरे (रिझर्व्ह बँक)ने अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या संदीप दिवेचा चुरशीच्या लढतीत  16-25, 25-10, 25-07 असा पराभव केला. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात विद्यमान …

Read More »

बांगलादेशची फायनलमध्ये धडक; युवा विश्वचषकात उद्या भारताविरुद्ध महामुकाबला

केपटाऊन : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत दोन आशियाई देश विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. दुसर्‍या उपांत्य सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचे आव्हान परतवून लावत अंतिम फेरी गाठली. विजयासाठी दिलेले 212 धावांचे आव्हान बांगलादेशने चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. बांगलादेशच्या महमदुल हसन जॉयने शतकी खेळी केली. त्यामुळे अंतिम फेरीत …

Read More »

…तर देश बदलला नसता!

पंतप्रधान मोदींचे विरोधकांवर शरसंधान नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. देशातील जनतेने फक्त सरकार बदलले नाही, नव्या विचाराने काम करण्याची संंधी आम्हाला दिली. आम्हीही काँग्रेसच्या वाटेने गेलो असतो, तर देश बदलला नसता, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान साधले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा …

Read More »

चिखले ग्रामपंचायत हद्दीत विकासगंगा

विविध कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल तालुक्यातील चिखले ग्रामपंचायत हद्दीत विकासाची गंगा आली असून, जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या माध्यमातून येथील दोन विकासकामांचे उद्घाटन आणि एका कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 6) भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …

Read More »

सिडकोने रहिवाशांना सुविधा द्याव्यात

आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तसिडकोच्या माध्यमातून रहिवाशांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी (दि. 6) सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक शिनगारे व अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. सिडकोने आपल्या हद्दीतील विकासकामांवर भर देण्याची आग्रही मागणी आमदार बालदी यांनी या वेळी …

Read More »

दुंदरे येथील महिलेला जाळून फासावर लटकवले; नातेवाईकांचा आरोप

भाजप प्रदेश प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्याकडून सांत्वन; कारवाईची मागणी पनवेल : बातमीदारतालुक्यातील दुंदरे येथे एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह 4 फेब्रुवारी रोजी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या महिलेला जाळून ठार मारून फासावर लटकवले असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याची, तसेच औरंगाबादच्या सिल्लोड …

Read More »

कार्यालयीन सहाय्यकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

अलिबागमधील प्रकार अलिबाग : प्रतिनिधीबांधकाम व्यावसायिकाकडून 21 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अलिबाग येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयातील सहाय्यक प्रशांत मांडलेकर याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. 6) रंगेहाथ पकडले.प्रशांत मंडलेकर याचाविरुद्ध एका बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली  होती. त्यानुसार या विभागाच्या रायगडच्या पथकाने गुरुवारी दुपारी 2 …

Read More »