नवी दिल्ली : राज्यसभेत भाजपचे बळ आणखी वाढले आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे आठ, तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडला गेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी (दि. 2) शेवटचा दिवस होता. त्यानंतर निवडणूक अधिकार्यांनी उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. इतिहासात पहिल्यांदाच भाजपची राज्यसभेत …
Read More »Yearly Archives: 2020
पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील पदवीधर, तर अमरावती व पुणे येथील शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी ही निवडणूक होत आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, नागपूर पदवीधरचे आमदार अनिल सोले, …
Read More »जंजिरा किल्ला बंद असल्याने स्थानिकांच्या रोजगारावर गदा
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे या किल्ल्यावर उपजीविका अवलंबून असलेले सुमारे 250 स्थानिक व त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त लोक येत असतात. समुद्रात असणारा 22 एकरवरील हा दुर्ग पर्यटकांना आकर्षित करतो. …
Read More »अनधिकृत वाळू व्यवसायावर महाड पोलिसांची कारवाई; वाळूसह पोकलेन व अन्य तीन वाहने जप्त; पाच जणांना अटक
महाड : प्रतिनिधी महाड पोलिसांनी खाडीपट्टा विभागात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खनन आणि विक्रीवर कारवाई करीत वाळूसह पोकलेन आणि अन्य तीन वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे 47 लाख 97 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले …
Read More »…तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल : शिवेंद्रराजे
सातारा : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाही तर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झाले असे बोलले जाते. आता आपण एकत्र आलो नाही तर आपले दुसरे सामाजिक पानिपत होईल, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे. सातार्यात …
Read More »पक्षवाढीसाठी मेहनत घ्या : अश्विनी पाटील; भाजप महिला मोर्चा पनवेल ग्रामीण मंडलच्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप महिला मोर्चाच्या पनवेल ग्रामीण मंडलची कार्यकारिणी बैठक सोमवारी (दि. 2) उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत महिला पदाधिकार्यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी बोलताना पाटील यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घ्या, असे आवाहन केले. पनवेल मार्केट यार्ड येथील …
Read More »बांगलादेशी घुसखोरांना मदत? मालेगावातील ’ते’ दोन आमदार संशयाच्या भोवर्यात; विघातक षडयंत्राची कसून चौकशी करा -भातखळकर
मुंबई : प्रतिनिधी बांगलादेशी घुसखोरांना बेकायदेशीररित्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणार्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला असून, त्यांच्याकडे महाराष्ट्रातील एमआयएम व काँग्रेसच्या आमदारासह एकूण सात आमदारांची स्वाक्षरी असलेली लेटरहेड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा प्रकार धक्कादायक असून, देशविघातक कृत्यासाठी या आमदारांना 24 तासांच्या आत अटक करावी, अशी मागणी भाजप …
Read More »परदेशी कांद्याला मोठी मागणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू करून आयातीला परवानगी दिल्याने इराण, तुर्कस्थान, अफगाणिस्तान, इजिप्त या देशांतून सध्या घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. देशी कांद्याच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्याने परदेशी कांद्याला मोठी मागणी आहे. तुर्भे येथील ‘एपीएमसी’ घाऊक बाजारात 50 टन …
Read More »महिला पोलिसांची फसवणूक करणार्या तोतया पोलिसाला अटक
बनावट फेसबुक अकाऊंटवरुन करायचा मैत्री पनवेल : वार्ताहर पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे महिला पोलिसांसोबत फेसबुक वरुन मैत्री करुन त्यांच्याकडून रोख रक्कम उकळणार्या भामट्याला एका महिला पोलिसानेच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना उघडकिस आली आहे. मिलींद रमेश देशमुख (28) असे या भामट्याचे नाव …
Read More »नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात आग
सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या निवासी बंगल्यात सोमवारी (दि. 2) दुपारी अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच हालचाल करून आग नियंत्रणात आणली. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त निवासी बंगल्यात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper