केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भूमिपुत्रांच्या मेळाव्यात ग्वाही उरण ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी येत्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरणार असल्याची ग्वाही केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी (दि. 17) जासई (ता. उरण) येथे आयोजित भूमिपुत्रांच्या मेळाव्यात दिले. …
Read More »Monthly Archives: August 2021
जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत ‘यूएसकेएआय’च्या खेळाडूंचे सुयश
पनवेल ः रामप्रहर वृत्तआकुर्ली (नवीन पनवेल) येथे नुकतीच जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया (यूएसकेएआय)च्या खेळाडूंनी यश संपादन केले.यूएसकेएआयच्या प्रद्युम्न म्हात्रे, आरव शेट्टी, अलोक निर्मल, अर्णव खन्ना, यश काटेकर, आयुरी धुमाळ, शशांक शेट्टी, साक्षी मुरडेकर, अनुष्का जगदाळे, वैष्णवी मुरडेकर, प्रणय दुरकर, श्रीवास पाटील, उदय …
Read More »नेमबाज वेदांत पाटीलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या माध्यमिक विभाग मराठी माध्यमात इयत्ता आठवीत शिकणार्या वेदांत किरण पाटील याने रायफल शूटिंग प्रकारात घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे भोपाळ येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली.अहमदाबाद येथे झालेल्या आठव्या वेस्ट झोन चॅम्पियन (प्री नॅशनल-सहा …
Read More »संपूर्ण संघाचा मला अभिमान!
कर्णधार कोहलीकडून सहकार्यांचे कौतुक लंडन ः वृत्तसंस्था‘संपूर्ण संघाचा मला अभिमान आहे. लॉर्ड्सवर विजय मिळवणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. प्रत्येकाने महत्त्वाच्या क्षणी खेळ उंचावल्याने हे साध्य झाले. इंग्लंडच्या संघाला 60 षटकांत गुंडाळू याची खात्री होती. वेगवान गोलंदाजांच्या जिगरबाज वृत्तीला माझा सलाम,’ अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहली याने सहकार्यांची पाठ …
Read More »स्वातंत्र्य दिनानिमित्त नेरळ भाजपकडून वृक्षारोपण
कर्जत : बातमीदार अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपच्या वतीने नेरळमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. नेरळ शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी नेरळ मोहाचीवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये वृक्षारोपण करून स्वातंत्र दिन साजरा केला. या वेळी भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष, तसेच नेरळ ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर, नेरळ शहर अध्यक्ष अरुण नायक, उपाध्यक्ष हर्षल …
Read More »रायगड जि. प. पाणीपुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार; सभापती दिलीप भोईर यांचा घरचा आहेर
अलिबाग : प्रतिनिधी रेवस पंचक्रोशीतील गावांना प्राधान्याने पाणी गेले पाहिजे, मात्र तेथील बोअरवेलला, विहिरींना मचूळ पाणी आहे. त्या गावकर्यांना एमआयडीसीचाच आधार आहे, पण जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराने ते मिळणार नाही, असा दावा पत्रकार परिषदेत करून समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी घरचा आहेर दिला आहे. रेवस, कोप्रोली, मिळखतखार, सारळ …
Read More »जिल्हा प्रशासनाची आपत्तीशी यशस्वी झुंज!
अतिवृष्टीमुळे 22 जुलैच्या रात्री महाड शहरात पूर आला. त्या मागोमाग पोलादपूर तालुक्यातील देवनाळे व साखर सुतारवाडी आणि महाडमधील तळीये या गावी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. अतिमुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर येऊन महाड शहर, बिरवाडी, राजेवाडी, लाडवली, गांधारे पाले, बिरवाडी एमआयडीसी, दादली पूल, पोलादपूर तालुक्यातील माटवण, आकले, कालवली, केवनाळे, साखर सुतारवाडी …
Read More »डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते राऊत क्लिनिकचे उद्घाटन
उरण, चिरनेर : प्रतिनिधी पी. पी. खारपाटील एज्युकेशनच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरदास राऊत यांचे सुपुत्र डॉ. व्हॅन्युज सुरदास राऊत यांनी सुरू केलेल्या राऊत क्लिनिकचे उद्घाटन पनवेल येथील डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते नुकतेच चिरनेर येथे करण्यात आले. दिवसेंदिवस बदलणार्या वातावरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आजाराचे …
Read More »हनीट्रॅपमध्ये अडकवून बांधकाम व्यावसायिकाला लाखोंचा गंडा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणीने पनवेल येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवले. त्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह सहा जणांच्या टोळीला अटक केली आहे. हनीट्रॅप म्हणजे आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याची गुप्त माहिती किंवा त्याच्याकडून पैसे उकळणे होय. …
Read More »ओबीसींची जनगणना करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे जन आशीर्वाद यात्रेसाठी आले असता आगरी कोळी समाज हॉलमध्ये ओबीसींची जात निहाय जनगणना व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसींची जनगणना 2021मध्ये होणार असे जाहीर केले होते, परंतु कोविंड या महामारी मुळे ते चालू करता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper