Breaking News

Monthly Archives: April 2022

डॉ. समीर आगलावे यांचे वर्तन आदर्शवत -वाय. टी. देशमुख

पनवेल ः रामप्रहर वृत्त वैद्यकीय शिक्षणासाठी घेतलेल्या आर्थिक मदतीचा परतावा करीत डॉ. समीर श्रीपत आगलावे यांनी युवा पिढीपुढे आदर्श ठेवला आहे, असे प्रतिपादन  रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 15) येथे केले. तालुक्यातील कोळवाडी येथील डॉ. समीर आगलावे यांना इंग्लडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याकरिता …

Read More »

सुधागडची पॉवरलिफ्टर सुश्मिता देशमुखने राष्ट्रीय विक्रमासह जिंकले सुवर्णपदक

सुधागड : प्रतिनिधी ठाण्यातील विटाव्यात राहणारी मूळची सुधागड तालुक्यातील वाघोशी गावची सुकन्या पॉवरलिफ्टर सुश्मिता सुनील देशमुख हिने केरळमधील अल्पुझा येथे झालेल्या सब ज्युनिअर-सिनिअर मास्टर क्लासिक पॉवर लिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपद जिंकले. यासोबतच तिने राष्ट्रीय विक्रम स्वतःच्या नावावर केला. कल्याणच्या कारभारी जिमची खेळाडू असलेल्या सुश्मिताने राष्ट्रीय स्पर्धेत सिनियर गटामध्ये 52 किलो वजनी …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त विश्वरत्न डॉ. बबासाहेब आंबेडकर यांची 131 जयंती पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांनी गुरुवारी (दि. 14) उत्साहात  साजरी झाली. जयंत्तीनिमित्त विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना माजी खासदार लाकेनेते रामशेठ ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उपस्थिती लावली. उलवे नोड येथे …

Read More »

आरटीआयएससी फुटबॉल संघाचा पलावा एफसीवर विजय

पनवेल : रामप्रहर वृत्त ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या (टीडीएफए) वतीने खेळविण्यात येत असलेल्या फुटबॉल लीग स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या (आरटीआयएससी) फुटबॉल संघाने पलावा एफसी विरुद्ध 3-1ने विजय मिळवला. आरटीआयएससी संघाकडून यश डांगे, राहुल रावत आणि कौस्तुभ गुरव यांनी प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध गोल केले. याबाबत बोलताना संघाचे …

Read More »

पनवेल परिसरात मातीच्या माठांना मागणी वाढली

पनवेल ः वार्ताहर उन्हाळ्यात लागणारी तहान भागविण्यासाठी माठातील पाणी सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळेच उन्हाळ्याची चाहूल लागताच माठाची मागणी नागरिकांकडून सुरू होते. याच पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील नागरिकांकडून मातीच्या माठाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. माठाची मागणी वाढल्याने माठ बनविणारे कारागीर देखील कामात मग्न असल्याचे चित्र पनवेल परिसरात कुंभारवाडा परिसरात व …

Read More »

वरिहा रावल ठरली एलीट मिस इंडिया

पनवेल ः वार्ताहर डिव्हेलिशिअस मिर्सेस युनिवर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एलिट मिस इंडिया आणि मिसेस इंडिया युनिवर्स मॉडेलिंग स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील वरिहा रावल आणि अनुपम चंदन ह्या विजयी ठरल्या. वरिहा रावल हिने एलीट मिस इंडिया तर अनुपम चंदन हिने डिवॅलिशिअस मिसेस इंडिया युनिव्हर्स 2022 हा किताब पटकावला. याबद्दल त्यांचे …

Read More »

कामोठे वसाहतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

पनवेल ः वार्ताहर कामोठे वसाहतीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखांली काढलेल्या भव्य मिरवणुकीला कामोठेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी जगदीश गायकवाड यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व भिमसैनिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. वाजत गाजत, ढोल-ताशा तसेच लाठी-काठीचे प्रदर्शन करीत कामोठे …

Read More »

घारापुरी बेटाबद्दल मिळणार इत्थंभूत माहिती

28 स्थानिक युवकांना लोकल गाईडची ओळखपत्रे उरण ः रामप्रहर वृत्त घारापुरी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून लेणी परिसरात खासगी सुरक्षारक्षक म्हणून तीन, तर बेटावर पर्यटकांना माहिती करून देण्याचे काम करणार्‍या 28 स्थानिक युवकांना लोकल गाईडची ओळखपत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना या लेण्यांबाबत इत्थंभूत माहिती मिळणार आहे. उरण तालुक्यातील घारापुरी लेणी या …

Read More »

नेरूळची प्रयोगशाळा ठरतेय वरदान

आतापर्यंत 11 लाख 40 हजार आरटीपीसीआर चाचण्या नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पहिल्या लाटेत नवी मुंबई महापालिकेने नेरूळ येथील रुग्णालयात केवळ 11 दिवसांत आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा उभारली होती. ही प्रयोगशाळा नवी मुंबईकरांना लाभदायी ठरत आहे. या प्रयोगशाळेत आतापर्यंत 11 लाख 40 हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या …

Read More »

सुस्वागतम!

तेरा कोटी लोकसंख्येच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचा मुख्यमंत्री दोन-दोन वर्षे मंत्रालयाकडे फिरकत देखील नाही ही बाब कुणालाही खटकण्याजोगी नाही का? तंत्रज्ञानामुळे बहुसंख्य गोष्टी घरबसल्या पार पाडता येतात हे खरे असले तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे कार्यमग्न असणे देखील जनतेला दिलासा देणारे असते. ही कार्यमग्नता …

Read More »