Breaking News

Yearly Archives: 2022

भेंडखळ येथील खाडीत आढळले मृतमासे

उरण : वार्ताहर, बातमीदार, प्रतिनिधी उरण तालुक्यातील भेंडखळ येथे रासायनिक पाणी खाडीमध्ये सोडल्यामुळे मासळी मेलेली आढळून आली. यामुळे सर्व ग्रामस्थांमध्ये रोष पसरला आहे. उरण तालुक्यातील भेंडखळ गावा नजदिक असलेल्या खाडीत रात्री अज्ञात व्यक्तीने रासायनिक पाणी टँकरद्वारे खाडीच्या पाणीत सोडले आहे. त्यामुळे सर्व मासे, जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे भेंडखळ …

Read More »

साथीच्या आजारांसंदर्भात नवी मुंबई पालिका सज्ज

 वाशी रुग्णालयात डेंग्यू मलेरियासाठी वेगळा कक्ष नवी मुंबई : बातमीदार महापालिकेच्या वाशी रुग्णालयात मलेरिया व डेंग्यू रुग्णांवरील उपचारांकरिता वेगळा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच डेंग्यूच्या आजारामध्ये प्लेटलेट्सची रुग्णांना भासणारी गरज महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. प्लेटलेट्सकरिता आवश्यक असणारी मशीन महानगरपालिकेची स्वत:ची असावी असे आदेश आयुक्तांनी दिले. वाढत्या …

Read More »

इतिहास घडताना

यंदा आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी पाड्यातून आलेली एक कर्तृत्ववान महिला देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत येऊन पोहोचते, तो क्षण निश्चितच ऐतिहासिक मानायला हवा. समाजातील शेवटच्या स्तरावरील शेवटच्या व्यक्तीपर्यंत उन्नतीचा स्पर्श होणे हेच लोकशाहीला अपेक्षित असते. भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी …

Read More »

रायगडातील नगर परिषदांची सुधारित आरक्षण सोडत गुरुवारी

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील नऊ नगर परिषदांच्या आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित पालिका कार्यालयांमध्ये गुरुवारी (दि. 28) सोडत काढली जाणार आहे, तर हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी 29 जुलै ते 1 ऑगस्ट असा कालावधी निश्चित करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड …

Read More »

शिवसेनेचे पेण विधानसभा संघटक बाळा म्हात्रे शिंदे गटात

पेण : प्रतिनिधी रायगडमधील शिवसेनेचे तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत राहिल्याने रायगडमध्ये शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असतानाच पेण शिवसेनेचे विधानसभा संघटक बाळा म्हात्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अलिबाग राजमळा येथील श्रीराज निवासस्थानी आमदार दळवी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मागील महिन्यात दळवी समर्थकांनी …

Read More »

तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करणार्यास बेड्या

अलिबाग पोलिसांनी केली चिमुरड्याची सुटका अलिबाग, पेण : प्रतिनिधी अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला पळवून नेणार्‍या लफंग्याला अलिबाग पोलिसांनी काही तासातच मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्या तावडीतून त्या बालकाची सुटका करून त्याला आईच्या ताब्यात दिले. बाळ हातात येताच आईचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मधुकर नारायण पारधी असे आरोपीचे नाव आहे. …

Read More »

पोलादपुरातील वडाचा कोंड ग्रामस्थांचे स्थलांतर

भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रशासनाकडून सतर्कता पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील चरई ग्रामपंचायत हद्दीतील वडाचा कोंड गावालगतच्या डोंगराला पडलेल्या भेगांची पाहणी केल्यानंतर प्रशासनाने शनिवरी ग्रामस्थांना तातडीने स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र आषाढातील कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित होण्यासाठी पोलादपूरचे निवासी नायब तहसीलदार समीर देसाई आणि पोलीस कर्मचार्‍यांना ग्रामस्थांच्या मिन्नतवार्‍या कराव्या लागल्या. त्यानंतर रविवारी …

Read More »

खारेपाटातील खारबंदिस्तींची कामे पूर्ण करा

गेले कित्येक वर्षे अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील खारबंदिस्तीची कामे न केल्यामुळे समुद्राचे खारेपाणी घुसून हजारो एकर जमीन नापीक झाली आहे. समुद्राला उधान आले की, खारेपाटात पाणी शेतात घूसते. उधानाचे पाणी शेतातून आता लोकवस्तीपर्यंत येऊ लागले आहे. हेे असेच सुरू राहिले तर  अलिबाग तालुक्यातील खारेपाट पाण्याखाली जाण्याची भीती आहे. या भागातील …

Read More »

गटारीसाठी फार्महाऊस सज्ज; मांस, मद्यावर ताव मारण्यासाठी शौकीन उत्सुक

पोलिसांची राहणार नजर पेण ः प्रतिनिधी अवघ्या दोन दिवसांवर आलेली गटारी साजरी करण्यासाठी बेत आखले जाऊ लागले आहेत. याकरिता सुरक्षित मानले जाणार्‍या फार्महाऊसना पसंती दिली जात आहे. एकीकडे मांस, मद्यावर ताव मारण्यासाठी शौकीन उत्सुक असताना दुसरीकडे पोलिसांचीही गैरकृत्यांकडे नजर असेल. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी गटारी साजरी केली जाते. या दिवशी …

Read More »

कामोठ्यात सकल हिंदू समाज पदयात्रा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त देशभरामध्ये हिंदू नववर्ष शोभायात्रा, श्री रामनवमी, हनुमान जयंती मिरवणुकांवरील हल्ले, हिजाब आंदोलनापासून ते नुपूर शर्मा यांच्या समर्थकांचे झालेले खून या सर्व देशभर होणार्‍या घटनांना वाचा फोडण्यासाठी कामोठ्यात रविवारी (दि. 25) हिंदू समाज जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत भाजपचे …

Read More »