Breaking News

Yearly Archives: 2022

माणगावात कायदेविषयक सल्ला व सहाय्य केंद्राचे उद्घाटन

माणगाव : प्रतिनिधी समाजात विविध प्रकारचे वाद-विवाद होत असतात. विशेष:ता ग्रामीण भागातील पक्षकार न्यायाची अपेक्षा करतात. हे वाद, विवाद विद्यार्थ्यांनी त्या त्या ठिकाणी समजून घेऊन सोडविल्यास विद्यार्थ्यांना समाजात काम करण्याची उर्जा मिळेल व पक्षकारांनाही मोफत न्याय मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश विभा इंगळे यांनी शुक्रवारी (दि. 1) माणगाव येथे केले. …

Read More »

सैन्य दलातील सेवानिवृत्त कमांडो जयेश सुर्वेंचे माणगावात जंगी स्वागत

माणगाव : प्रतिनिधी नगरपंचायत हद्दीतील वाकडाई नगरचे सुपुत्र कमांडो जयेश जयसिंग सुर्वे हे भारतीय सैन्य दलातून 17 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांचे शनिवार (दि. 2) माणगाव नगरीत वाजत गाजत जोरदार स्वागत करण्यात आले. कमांडो सुर्वे यांचे स्वागत करण्यासाठी माणगावमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणगावमधील वीर यशवंतराव घाडगे माजी …

Read More »

खालापुरातील कॅम्प मॅक्स हॉटेलवर हातोडा

वनखात्याच्या अडीच एकर जागेवर होते अतिक्रमण खोपोली, खालापूर : प्रतिनिधी वनविभागाच्या जागेवर आलिशान हॉटेल थाटून खोर्‍याने पैसे ओढणार्‍या कलोते (ता. खालापूर) येथील कॅम्प मॅक्स हॉटेलच्या अनाधिकृत बांधकामावर शनिवारी (दि. 2) वनविभागाने बुलडोझर फिरवला. खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी धरण परिसरात धनिकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. याठिकाणी फार्महाऊस आणि हॉटेल …

Read More »

रायगडात शोभायात्रांनी नववर्षाचे स्वागत

अलिबाग : प्रतिनिधी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थातच गुढीपाडव्याचा सण शनिवारी (दि. 2) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. जिल्हाभरात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दोन वर्षांच्या खंडानंतर मोकळेपणाने हा सण साजरा करता आल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. अलिबाग शहरात शनिवारी सकाळी श्रीराम मंदिर येथून …

Read More »

गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय महत्त्वाचा; तो घाईघाईने का घेऊ नये?

रशिया-युक्रेन युद्धामुळे 52 हजार अंशांपर्यत कोसळलेला भारतीय शेअर बाजार गेल्या आठवड्यात साठ हजार अंशांना गवसणी घालतो आहे. याचा अर्थ एका महिन्यात तो आठ हजार अंशांनी वाढला आहे. जेव्हा बाजार पडला तेव्हा ज्यांनी गुंतवणूक घाईघाईने काढून घेतली त्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. गुंतवणुकीतून घाईघाईने बाहेर पडणे कसे नुकसानीत जाऊ शकते …

Read More »

भारताच्या अर्थव्यवस्थेला शेतीमाल निर्यातीचा बूस्टर!

सलग तीन वर्षे शेतीमालाचे चांगले उत्पादन घेतलेल्या भारताला त्या मालाच्या निर्यातवाढीची गरज आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे ती संधी भारताला मिळते आहे. या निर्यातीतून शेतकर्‍यांच्या हातात पैसा येऊन ग्रामीण भागातील मागणी वाढल्यास भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीला त्याचा मोठाच हातभार लागणार आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला एक महिना होऊन गेला. युद्धकधी थांबेल हे कोणीच …

Read More »

राम प्रहर – अर्थसाक्षर स्पर्धा : 15

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). —– —————- ———— 1. जीएसटीचे सर्वाधिक 1.42 लाख कोटी रुपये संकलन केव्हा झाले आहे? …

Read More »

चैत्राची नवपालवी!

यंदाचा गुढी पाडवा हा ‘नेहमीसारखे जगण्याचा उपक्रम’ सुरु करण्यासाठी अगदी आदर्श आहे. कारण गेली दोन वर्षे महाराष्ट्रासाठी एखाद्या काळरात्रीप्रमाणे गेली. दोन वर्षांपूर्वी अशाच एका गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला देशभर लॉकडाऊन करण्याची घोषणा झाली होती. त्यानंतरची दोन वर्षे भयानक संकटाला तोंड देण्यातच गेली. कुठल्याही निर्बंधांशिवाय गुढी पाडवा साजरा करण्याची संधी ही त्यानंतर …

Read More »

गुढीपाडवा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा!  कोणत्याही शुभकार्याला  या दिवशी सुरूवात करावी. इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते. वसंत ऋतुचं आगमन या दिवसापासून होतं. नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासून सुरूवात होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी, नव्या वास्तूत गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ करतात. हिंदु समाजात आपापल्या घराच्या …

Read More »

नामदेववाडीतील प्रश्न सिडकोशी चर्चा करून सोडविणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : वार्ताहर वडघर ग्रामपंचायत हद्दीतील नामदेववाडी येथील जागा व राहती घरी सिडकोने पुनर्वसन योजनेंतर्गत संपादित केलेली आहे, पण तेथील रहिवाशांचा काही प्रश्न उरला आहे. या संदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागातील रहिवाशांनी भेटीस येऊन त्यांची समस्या मांडली आहे. या समस्येवर सिडकोशी चर्चा …

Read More »