अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहीमेस बुधवारी (दि. 16) अलिबाग नगर परिषद शाळेमध्ये प्रारंभ झाला. रायगड जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील एक लाख 40 हजार 500 मुले असून, या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य …
Read More »Yearly Archives: 2022
माथेरानच्या विद्यार्थ्यांची रोज बारा किमी पायपीट
कर्जत : बातमीदार माथेरानमधील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शाळा, महाविद्यालयात जाण्या-येण्यासाठी रोज किमान 12 किलोमीटरची पायपीट करावी लागते. माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरु झाल्यास या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. माथेरान या पर्यटन स्थळावर मोटार वाहनांना बंदी आहे, त्यामुळे पायी किंवा घोड्यांच्या सहाय्याने माथेरानमध्ये वाहतूक व्यवस्था करावी लागते. येथील स्मित सखाराम खाडे हा …
Read More »अलिबाग येथे बेलीफ महासंघाची सभा
अलिबाग : प्रतिनिधी ठाणे, रायगड जिल्हा न्यायालयीन बेलीफ कर्मचारी संघटनेच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलीफ कर्मचारी महासंघाची सभा नुकतीच अलिबागमधील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात संपन्न झाली. रायगडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधिश विभा इंगले, जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. जी. मलशेट्टी, अधीक्षक पालवणकर, बेलीफ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांच्यासह ठाणे व रायगड …
Read More »मुरूडमध्ये जागतिक ग्राहक दिन उत्साहात
मुरूड : प्रतिनिधी ग्राहकांमध्ये हक्क आणि कर्तव्याबद्दलची जागरूकता वृध्दींगत करण्यासाठी ग्राहक दिन साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन मुरूडचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी मंगळवारी (दि. 15) येथे केले. जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात तहसीलदार शिंदे बोलत होते. या वेळी एनएसएस विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या …
Read More »कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ
कर्जत ़: प्रतिनिधी कोंकण ज्ञानपीठ कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये नुकताच पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 350 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश ब्राह्मणकर यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक अहवाल सादर केला. प्रा. अनुप कुंटे यांनी …
Read More »पोलादपूर पंचायत समितीची आमसभा
महाराष्ट्रातील 29 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती आहे. पंचायत समिती मतदार संघाला गण असे म्हणतात. 17,500 लोकसंख्येचा एक गण असतो. लोकसंख्येनुसार प्रत्येक पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मतदार संघांच्या दुप्पट गण निर्माण केले आहेत. प्रत्येक गणातून एक सदस्य निवडण्यात येतात. मतदार प्रत्यक्ष मतदान पध्दतीने आपला प्रतिनिधी निवडून पंचायत समितींवर पाठवितात. …
Read More »दडवून ठेवलेल्या फाइल्स
दशकानुदशके काश्मीरमधील सत्य दडपले गेले अशा प्रतिक्रिया आपण अनेक ठिकाणी ऐकलेल्या, वाचलेल्या किंवा पाहिलेल्या असतील, परंतु त्याचा नेमका अर्थ ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रभावीपणे सांगतो. असे चित्रपट मोठ्या संख्येने निर्माण व्हायला हवेत असे उद्गार खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले याला फार मोठा अर्थ आहे, कारण नरेंद्र मोदी नावाच्या …
Read More »रायगडातील कर्जतमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद
मुंबई ः उष्णतेच्या बाबतीत हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसतोय, कारण कोकणातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान 40 अंशापार गेले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये सर्वाधिक 44.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील काही ठिकाणांच्या स्टेशनवरील तापमानही 40 अंश सेल्सिअसवर गेले आहे. मुंबईमध्ये 1956नंतर मार्चमध्ये प्रथमच …
Read More »ताम्हिणी घाटात एसटी बसला अपघात, 11 जण जखमी
महाड ः प्रतिनिधी स्वारगेट-विन्हेरे (महाड) एसटी बसला मंगळवारी (दि. 15)ताम्हिणी घाट उतरत अपघात होऊन ही बस उलटली. यात वाहकासह 11 प्रवासी जखमी झाले आहेत. स्वारगेट बसस्थानकातून सकाळी 10 वाजता निघालेली बस (एमएच 14-बीटी 4684) महाड विन्हेरेकडे येत होती. ताम्हिणी घाट उतरत असताना कोंडेथर येथे ही बस दुपारी उलटली. या अपघातात वाहक …
Read More »महापौर डॉ. कविता चौतमोल यांना नवदुर्गा पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांना राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी मुंबईतील कलासाधना सामाजिक संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त कामोठ्यात हा पुरस्कार सोहळा झाला. या वेळी विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला होता. अनेक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper