Breaking News

संपादकीय

सुधागड तालुक्यातील आरोग्य सेवा सलाईनवर

रायगड़ जिल्ह्यातील  सुधागड़ तालुक्यात गोरगरीब सर्वसामान्य  रुग्ण, नागरिक व गर्भवती महिलांना आधार असलेल्या आरोग्य केंद्राला घरघर लागली आहे. या ठिकाणची आरोग्य सेवा सलाईनवर असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होताहेत.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत, साथीचे आजार उद्भवत आहेत. गोरगरीब जनतेची मदार ज्या आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांच्यावर आहे, तेथे आज महत्त्वाची पदे …

Read More »

ही गुर्मी येते कुठून?

गेल्या आठ वर्षांत इतके फटके खाऊनदेखील काँग्रेसजनांना अजुन शहाणपण येत नाही, याला काय म्हणावे? राष्ट्रपतींच्या अपमानावरून देशभर संतापाची लाट उसळूनही अधीर रंजन चौधरी आणि श्रीमती सोनिया गांधी यांनी संसदेची माफी मागितली नाही. जनतेने वारंवार लाथाडूनही या पक्षाच्या नेत्यांमधील उर्मटपणा काही कमी होताना दिसत नाही असे वारंवार घडताना दिसते. काल-परवापर्यंत महागाई …

Read More »

मद्यपान जरा जपून

दारूबंदीचा कायदा करून निर्बंध लादले की आपले काम संपले असा जो प्रशासकीय यंत्रणेचा खाक्या असतो, त्यातील सांधीफटी आता उघड होत आहेत. निव्वळ दारूबंदीचा कायदा करून भागणार नाही तर प्रबोधनाच्या मार्गानेच हे काम पूर्ण करावे लागेल. गुजरातमधील शोकांतिकेपाठोपाठ दारूबंदीबद्दल तपशीलात लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्याकडची गटारी अमावस्या. गेल्या काही वर्षांत गटारी साजरी …

Read More »

थरकाप उडविणार्या दरडग्रस्तांच्या आठवणी

25 व 26 जुलै 2005 रोजी पोलादपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजविला. उत्तरवाहिनी सावित्री, चोळई, कामथी, घोडवनी आणि ढवळी नद्यांची पात्र तुडूंब भरून वाहताना काठावरील शेतजमीन अन् भाताची रोपेही सोबत वाहून नेत होती. महाड तालुक्यातील जुई, कोंडीवते, दासगांव, रोहन गावांत धरणीमातेच्या उदरात अनेक मानवी देह गाडले गेले तोच प्रकार पोलादपूर तालुक्यातील …

Read More »

इतिहास घडताना

यंदा आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी पाड्यातून आलेली एक कर्तृत्ववान महिला देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत येऊन पोहोचते, तो क्षण निश्चितच ऐतिहासिक मानायला हवा. समाजातील शेवटच्या स्तरावरील शेवटच्या व्यक्तीपर्यंत उन्नतीचा स्पर्श होणे हेच लोकशाहीला अपेक्षित असते. भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी …

Read More »

खारेपाटातील खारबंदिस्तींची कामे पूर्ण करा

गेले कित्येक वर्षे अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील खारबंदिस्तीची कामे न केल्यामुळे समुद्राचे खारेपाणी घुसून हजारो एकर जमीन नापीक झाली आहे. समुद्राला उधान आले की, खारेपाटात पाणी शेतात घूसते. उधानाचे पाणी शेतातून आता लोकवस्तीपर्यंत येऊ लागले आहे. हेे असेच सुरू राहिले तर  अलिबाग तालुक्यातील खारेपाट पाण्याखाली जाण्याची भीती आहे. या भागातील …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 29

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). निफ्टी प्राईव्हेट बँक निर्देशांकात पुढीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश होत नाही? अ. कोटक महिंद्र बँक …

Read More »

गैरसमज मनात ठेवून तांत्रिक विश्लेषण करणे चुकीचे का आहे?

शेअर बाजारातील तांत्रिक विश्लेषणाविषयी अनेक गैरसमज आहेत.ते दूर करून या विश्लेषणाकडे पाहण्याची गरज आहे.शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाबरोबरच त्या विषयाचं सखोल शिक्षण, संपूर्ण ज्ञान, उत्तम  पैसे व्यवस्थापन कौशल्य आणि भरपूर शिस्त आवश्यक आहे. तांत्रिक विश्लेषण या भागातील लेखात आपण टेक्निकल अ‍ॅनालिसिसचे फायदे जाणून घेतले. आता आणखी कांही महत्वाच्या गोष्टी …

Read More »

‘मेडिकल टुरिझम’ मध्ये भारताला संधीच संधी!

‘मेडिकल टुरिझम’ म्हणजे दुसर्‍या देशात जाऊन आजारावर उपचार करून घेणे. अनेकदेशांनी असे पर्यटन जाणीवपूर्वक वाढविले आहे. भारतातही असे पर्यटन वाढविण्याची प्रचंड क्षमता आहे. मात्र त्यासाठीचे विशिष्ट धोरण नसल्याने हा विषय पुढे जाऊ शकला नाही. आता लवकरच असे धोरण जाहीर होण्याची शक्यता असून त्याचा भारताला मोठा लाभ होईल. आपल्या आजारावर चांगले …

Read More »

अच्छे दिन येणार

कोरोना काळात वाया गेलेली दोन वर्षे पाहता यंदा तरी सर्वसामान्य रीतीने गणेशोत्सव साजरा करता यावा अशी सर्वांचीच अपेक्षा होती. शिंदे-फडणवीस सरकारने ती पूर्ण केली असे म्हणावे लागेल. दहीहंडी आणि गणेशोत्सव हे दोन्ही गर्दीचे सण आहेत. त्यामुळे निर्बंधमुक्तीचे वरदान मिळाले असले तरी सर्वांनीच सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवूनच सामाजिक व्यवहार करायला हवेत. शिंदे-फडणवीस …

Read More »