Breaking News

संपादकीय

दहशतवादी घडविणारी शाळा

सूर्य जणू आग ओकत असल्याने राज्यातील सर्व शाळांना उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे. दुसरीकडे पुण्यातील एक शाळा मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. दहशतवादी कृत्यांमुळे ब्ल्यू बेल्स शाळेवर गंडांतर आले आहे. दहशतवाद हा आपल्या देशात जुनाच रोग …

Read More »

वसंतकाले संप्राप्ते

ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आणि अजितदादा पवार यांचे राजकीयदृष्ट्या कधीही फारसे पटले नाही हे एकंदरीत दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी विशेष जवळीक असणार्‍या संजय राऊत यांनी अजितदादांबद्दल मात्र उलटसुलट विधाने करणे सोडलेले नाही. त्याचा स्फोट मंगळवारी अजितदादा पवार यांच्या एका पत्रकार परिषदेत झाला. तुम्ही तुमच्या पक्षाचे …

Read More »

वावड्यांचे विश्व

सध्याच्या काळात राजकीय वर्तुळातून इतक्या उलटसुलट चर्चा घडताना दिसत आहेत की त्यातली बातमी कुठली आणि वावडी कुठली हे ओळखता येणे कठीण व्हावे. ज्यांच्या मतांसाठी एवढ्या राजकीय घडामोडी घडत असतात त्या मतदारांना कसलाही थांगपत्ता लागत नाही. सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्यातून वावड्यांचा कचराच अधिक बाहेर येऊ लागला आहे. …

Read More »

मिट्टी में मिला दिया

उत्तर प्रदेशातील माफिया इतकी वर्षे कोणी जोपासला? असंख्य गुन्हे नावावर असतानाही गुंडांना पक्षाची उमेदवारी देण्याचे धाडस कोण दाखवत होते? काही स्वार्थांध राजकारण्यांच्या कृपाछत्रामुळेच उत्तर प्रदेशात संघटित गुन्हेगारी फोफावली. माफिया डॉन कितीही मोठा असला तरी त्याची पर्वा न करता त्यांना मातीत घातले जाईल… हम उन्हें मिट्टी में मिला देंगे असे उद्गार …

Read More »

ड्रॅगनच्या कुरापती

चीनी वर्चस्ववाद आणि विस्तारवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पायबंद घातला हे विरोधकांनाही मान्य करावे लागेल. चीनच्या डरकाळ्यांना भीक न घालता गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना ठणकावले. त्यानंतर आता अधिक सावध राहिले पाहिजे. अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती गावात जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चीनला खणखणीत शब्दांत खडसावल्यानंतर …

Read More »

बदलती समीकरणे

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेस यांचा राष्ट्रीय दर्जा तांत्रिक मुद्यावर रद्द झाला, परंतु त्याचवेळी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने अवघ्या 11 वर्षांत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला ही बाब लक्षणीय मानायला हवी. देशातील समीकरणे बदलत चालली आहेत याचेच हे द्योतक आहे. भारतीय मतदार आपल्या जुन्या धारणा टाकून देऊन नवीन निवड करतो …

Read More »

हिंदुत्वाचा गजर

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील शासकीय यंत्रणेतील त्यापूर्वीची ढिलाई मागे पडली असून खर्‍या अर्थाने जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे गतिमान सरकार कार्यरत असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. त्यामुळे फडणवीस-शिंदे सरकारच्या विरोधात अवघे बळ एकवटून, एकजुटीने उभे राहण्यासाठी धडपडणार्‍या महाविकास आघाडीसमोर …

Read More »

नवीन वर्ष दिलासादायक

केंद्र आणि राज्य शासनाचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. यामध्ये सर्वसामान्य लोकांचा विचार करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकूणच शासनाने सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर करीत सर्वसामान्यांच्या हृदयात घर केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यानंतर आता नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. भारत ही जगातील सर्वांत …

Read More »

दिलदार, सर्वसमावेशक गिरीशभाऊ

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या गिरीशभाऊंच्या जाण्याचे पुणे पोरके झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आणि सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या निधनांनंतर सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त होत आहे. एका कंपनीतील कर्मचारी ते खासदार असा गिरीश …

Read More »

अपमान की परीक्षा?

मोदीविरोध करता-करता आपण राष्ट्राच्या विरोधात कधी उभे ठाकलो हेच राहुल गांधी यांना कळले नाही हे उघड दिसते. खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या सार्वभौम सभागृहाचा अपमान केला असून सभागृहात येऊनच त्यांनी माफी मागितली पाहिजे असा आग्रह भाजपच्या खासदारांनी आक्रमकपणे लावून धरला आहे. याउलट माफी मागण्याचा प्रश्नच नाही असा हेका काँग्रेसने चालू …

Read More »