Breaking News

संपादकीय

हिंसेला अटकाव हवा

केरळमध्ये स्फोट झाल्याची बातमी रविवारी सकाळी अकस्मात येताच दक्षिणेत हिंसक कारवायांनी डोके वर काढल्याबद्दलची चिंता स्वाभाविकपणे सुजाण नागरिकांच्या मनात निर्माण झाली असावी. प्रत्यक्षात मात्र या स्फोट प्रकरणातील तपशील काहिसे निराळेच निघाले. अर्थात तरीही चिंता वाटण्यासारख्या काही बाबी आहेतच. केरळमधील कोचिनजीकच्या कलमस्सेरी येथे रविवारी सकाळी ख्रिस्ती समाजातील एका पंथाच्या धार्मिक परिषदस्थळी …

Read More »

आंदोलन चिघळवू नये

राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापू लागले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असताना या आरक्षणासाठीचे आंदोलन चिघळल्यास त्यातून कुणाचे भले होणार? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत 24 तारखेला संपली, मात्र …

Read More »

खुद्दार विरुद्ध गद्दार

निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, परंतु रणांगणाचे वेध मात्र लागले आहेत अशा अवस्थेत ठाकरे गटाची चांगलीच कुचंबणा झालेली दिसते. तारखा जाहीर न झाल्यामुळे निवडणुकीचा अजेंडा ठरवणे अनेक राजकीय पक्षांना जड जाते आहे. नेमके कुठल्या दिशेने प्रचाराचे गाडे पुढे रेटायचे याचा अंदाज अद्याप त्यांना आलेला दिसत नाही. दसर्‍याचा दिवस हा …

Read More »

सत्य लवकर बाहेर यावे

रुग्णालय प्रशासन व तुरुंगातील सदोष यंत्रणा तसेच या सार्‍याचा प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा गैरवापर ही गुन्हेगारीशी संबंधित चित्रपटांत दर्शवली जाणारी स्थिती वास्तवातही असल्याचे ललित पाटील प्रकरणात दिसते. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे अलीकडच्या काळात मुंबई-पुण्यासारख्या शहरांत महाविद्यालयांच्या परिसरात व उच्चभ्रू समाजात ड्रग्जचा अगदी सुळसुळाट झाल्याचे सगळीकडेच बोलले जात होते. त्यापाठोपाठच हे अवघे …

Read More »

स्वच्छ हवा दुरापास्त

गेली काही वर्षे ऑक्टोबर ते जानेवारी या काळात देशातील नवी दिल्ली, मुंबई व कोलकाता या शहरांमधील हवेच्या दर्जाने अतिधोकादायक पातळी गाठणे नित्याचे झाले आहे. परिस्थिती बिकट होताच तातडीची उपाययोजना अवश्य केली जाते, परंतु अशी परिस्थिती ओढवूच नये या दिशेने मात्र फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. यापैकी वाहनप्रदूषणाच्या विरोधातील उपाययोजना जनतेच्या …

Read More »

व्यापक चर्चा आवश्यक

समलिंगी संबंध ही केवळ शहरी अभिजनांमधील संकल्पना आहे याबद्दल घटनापीठाने असहमती दर्शवली असली तरी आजच्या घडीला तरी बहुसंख्य भारतीयांना हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा वाटतो. घटनापीठातील पाच न्यायाधीशांनी यासंदर्भात चार वेगवेगळी निकालपत्रे दिली यावरून या विषयासंदर्भातील विभिन्न बाबींविषयी समाजातही केवढी मतभिन्नता असावी याचा प्रत्यय येतो. विशेष विवाह कायद्यांंतर्गत समलिंगी विवाहांना कायदेशीर …

Read More »

राजकारणाचाच शाप

काही भीषण अपघातांमुळे लोकांच्या मनात समृद्धी महामार्गाविषयी गैरसमज निर्माण झाले असून विरोधकांनी केलेली बेजबाबदार विधाने त्यात भरच घालू शकतात. प्रत्यक्षात या महामार्गावरून प्रवास करण्याचा अनुभव घेतलेले लोक मात्र समृद्धी महामार्गावरील प्रवास सुखकर असल्याचेच सांगतात. महामार्गाच्या बांधणीत कुठलाही दोष नसून महामार्ग गुणवत्तापूर्ण असल्याची ग्वाही तज्ज्ञ जाणकारांनीही यापूर्वीच दिली आहे. आपल्या वाहनाचा …

Read More »

वैद्यकीय प्रवेश मिळवून देतो सांगून फसवणूक चौघांना पश्चिम बंगालमधून अटक; तिघांचा शोध सुरूच

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग येथील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालात प्रवेश मिळवून देतो म्हणून सांगून 32 लाख रुपयांना गंडा घालणार्‍या टोळीतील चार जणांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे, तसेच त्यांच्याकडून 20 लाख रू. रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वषण शाखेने ही कामगिरी केली. सौरभ सौम्य …

Read More »

दुर्दैवाचा घाला

नांदेड येथील सरकारी रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी निश्चितच धक्कादायक आहे. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी ठाण्यानजीकच्या छत्रपती शिवाजी सरकारी इस्पितळामध्ये एका रात्रीत 18 रुग्ण दगावले होते. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर पडणारे हे दुर्दैवाचे घाले तातडीने थांबायला हवेत यात शंकाच नाही. इस्पितळामधील हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याची चौकशी …

Read More »

पुनरागमनायच…

यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशीच मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलादचा सण आला आहे. मुस्लिम बांधवांच्याही मिरवणुका या दिवशी निघतात. गर्दीचे नियंत्रण थोडेतरी सुलभ व्हावे यादृष्टीने ईदची सुटी 29 तारखेला द्यावी अशी विनंती पोलीस दलानेच केल्यामुळे राज्य सरकारने अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशीही शासकीय सुटी जाहीर केली आहे. समाजामध्ये बंधुभाव आणि एकोपा वाढावा यासाठीच हे …

Read More »