Breaking News

संपादकीय

गोंधळलेले चेहरे

ममता बॅनर्जी यांनी धडाकेबाज सूचना करणे आणि त्याला ‘इंडिया आघाडी’च्या बाकीच्या काही नेत्यांनी मान डोलावणे ही काही आपोआप घडलेली घटना नव्हे. गांधी परिवाराला पूर्णत: बाहेर ठेवण्याचा बेत या आघाडीत शिजू लागल्याचे हे लक्षण मानायला हवे. म्हणूनच बैठकीतील दोन्ही मागण्यांबाबत स्वत: मल्लिकार्जुन खरगे यांनी सावध भूमिका घेतलेली दिसते. येत्या वर्षात लोकसभेच्या …

Read More »

संसद सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

देशाच्या संसदेवर 2001 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बुधवारी 13 डिसेंबर रोजी 22 वर्षे पूर्ण होत असतानाच सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे वेळी दोन तरुणांनी लोकसभेच्या गॅलरीतून खाली उडी मारून सभागृहात पिवळ्या धुराचे लोट पसरवले तर अन्य दोघांनी संसदेबाहेर गोंधळ माजवला. या घटनेमुळे नव्या संसदेच्या सुरक्षेविषयी मोठी चिंता निर्माण झाली आहे. …

Read More »

विचारपूर्वक वाटचाल

भारतीय जनता पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये दिमाखदार विजय संपादन केल्यानंतर हिंदीभाषिक पट्ट्यातील या तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री पद कुणाकडे जाणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने या निवडीला महत्त्व असल्यानेच एव्हाना चार दिवस होत आले …

Read More »

मोदी लाट कायम

लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिल्या जाणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. निकाल जाहीर झालेल्या चारपैकी तीन राज्यांत भाजपने विजय मिळविला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. एवढे पक्ष एकत्र आल्याने आता आम्हीच जिंकणार असा …

Read More »

‘कुली’ची चाळीशी…अमिताभचा आजार ते पिक्चरचे यश

26 जुलै 1982च्या दुपारनंतरची वेळ. पीटीआय व यूएनआय या वृत्तसंस्थेने ’न्यूज फ्लॅश’ म्हटलं, अमिताभ बच्चनला अपघात. एवढ्यावरून चित्र स्पष्ट होणे शक्य नव्हतेच. बातमीवर लक्ष ठेवणे आवश्यक होते… मनमोहन देसाई दिग्दर्शित कुली चित्रपटाच्या बंगलोर येथील बंगलोर विद्यापीठाच्या ज्ञान भारती कॅम्पसमधील सेटवर मारहाण दृश्यात पुनीत इस्सारचा ठोसा चुकवण्याचा अभिनय करताना स्टीलच्या टेबलाचा …

Read More »

सत्ता कुणाची?

विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये प्रचारात भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा होता. त्याखालोखाल हिंदुत्व आणि कल्याणकारी योजनांच्या अवतीभवती प्रचार झाला. लोकसभा निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिल्या जाणार्‍या या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लोकसभा निवडणुकीसाठीची गणिते आकार घेतील असे दिसते. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी गुरूवारी मतदान पार पडले. तेलंगणासह राजस्थान, …

Read More »

श्वास मोकळा झाला

उत्तर काशीतील सिलक्यारा बोगद्यामध्ये कोंडल्या गेलेल्या 41 कष्टकर्‍यांचे श्वास अखेर मंगळवारी मोकळे झाले. त्यांच्यासोबत संपूर्ण देशाचाच श्वास कोंडला होता. गेले 17 दिवस या कष्टकरी मजुरांनी मृत्यूशी झुंज दिली. बचावपथकाकडून अहोरात्र सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना मंगळवारी रात्री यश मिळाले. बचावपथकांचे प्रयत्न आणि देशभरातील आबालवृद्धांकडून केली जाणारी प्रार्थना फलद्रुप झाली. या 41 …

Read More »

दुर्दैवी राडा

स्वर्गीय बाळासाहेबांच्या अकराव्या स्मृतिदिनी त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी आणि त्यांची शिकवण यांचे स्मरण व्हायला हवे होते, परंतु दुर्दैवाने याच्या अगदी उलट घडले. ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थावर जो धिंगाणा घातला, तो निंदनीय होता. महाराष्ट्राचे दैवत हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतीदिनाला खरे तर राज्यभर काही …

Read More »

विवेकदीप उजळी

दिवाळीच्या निमित्ताने शहरे आणि महानगरांमधील व्यापारपेठा, मॉल लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आहेत. दिवाळीची मौजमजा करताना आपण हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या वस्तीमध्ये दिव्यांचा लखलखाट असला तरी काही वस्त्या-पाड्यांवरील झोपड्यांमध्ये अजूनही अंधार बाकी आहे. आपल्या दारापाशी लागलेल्या आकाशकंदिलाचा उजेड तिथपर्यंत पोहचायला हवा. दारासमोरची एक इवलीशी पणती काळोखाला रोखून धरते, तिच्या …

Read More »

प्रामाणिक प्रयत्न सुरूच

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात उभे राहिलेले वादळ फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शमवू शकतात याबाबत एव्हाना सर्वांचीच खात्री पटलेली असेल. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल याकरिता सरकारी यंत्रणा आता वेगाने कामाला लागली आहे. गेली अनेक वर्षे आरक्षणाच्या प्रश्नी मराठा समाजाने मोर्चे, आंदोलने असे शांततापूर्ण मार्ग …

Read More »