Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

आयपीएलवरील सट्ट्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त

वडिलांची तीन मुलींसह आत्महत्या वाराणसी ः वृत्तसंस्था जुगारी वडिलांमुळे एक हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. सट्ट्यात सर्वकाही हरल्याने एका पित्याने तीन मुलींना विष देऊन स्वत:देखील आत्महत्या केली. आता या कुटुंबातील केवळ मुलींची आई जिवंत आहे. माहेरी गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला, मात्र पती आणि मुलींच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला …

Read More »

सहा महिन्यांनंतर उघडले केदारनाथ मंदिराचे द्वार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिर गुरुवार (दि. 9)पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी उघडण्यात आला आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पुजार्‍यांनी विधिवत पूजा केली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथाला जलाभिषेक, रुद्राभिषेक संपन्न झाला आहे. 8 तारखेला गंगोत्री आणि यमनोत्रीची दारे खुली झाल्यापासून चारधामच्या यात्रेला सुरुवात …

Read More »

चक्रीवादळग्रस्त राज्यांना रेल्वेची मदत

विनाभाडे पोहोचविणार साधनसामुग्री सोलापूर ः प्रतिनिधी फनी चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यांतील नागरिकांना मदत करण्याचा ओघ वाढतच आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील सामाजिक संस्था, संघटना व अन्य लोकांकडून दिली जाणारी मदत विनाभाडे रेल्वे प्रशासन संबंधित लोकांपर्यंत पोहचवणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे …

Read More »

राहुल गांधींची पुन्हा बिनशर्त माफी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोर्टाच्या निकालाचा दाखला देताना कोर्टानेही ‘चौकीदार चोर’ असल्याचे मान्य केल्याचे म्हटले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल यांना निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रकरणी तंबी दिली होती. त्यानंतर राहुल यांनी आपण निवडणूक प्रचाराच्या गोंधळात हे वक्तव्य केल्याचे सांगत दोनदा चुकीबाबत खेद व्यक्त केला होता, …

Read More »

आज मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग दोन तास बंद

पुणे ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक गुरुवारी (दि. 9) दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे़. यादरम्यान सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील किमी़ 85/100 या ठिकाणी थांबवण्यात येणार आहेत़. हलकी चारचाकी व इतर वाहने …

Read More »

आता फक्त तुरुंगात टाकणे बाकी; मोदींचा रॉबर्ट वड्रांना सूचक इशारा

हरियाणा ः वृत्तसंस्था जनतेच्या आशीर्वादाने हा चौकीदार शेतकर्‍यांना लुटणार्‍यांना तुरुंगाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन गेला आहे. आता त्यांना जामिनासाठी कोर्टाचे आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यांना कारागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेले असून, पुढील पाच वर्षांत त्यांना तुरुंगात टाकू, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉबर्ट वड्रा यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

व्हीव्हीपॅटसंदर्भात विरोधकांना सुप्रीम कोर्टाचा दणका ; फेरविचार याचिका फेटाळली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकांमध्ये 50 टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी विरोधकांची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने मंगळवारी (दि. 7) फेटाळली आहे. एकाच याचिकेवर किती वेळा सुनावणी घ्यायची, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालावर फेरविचार …

Read More »

देशभरात सहा वर्षांत 656 वाघांचा मृत्यू

अवैध शिकारी वाढल्या नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभरात 2012 ते 2018 या सहा वर्षांच्या कालावधीत 656 वाघांचा मृत्यू झाला. यापैकी 31.5 टक्के म्हणजेच 207 वाघांचा मृत्यू अवैध शिकार व विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाला आहे.  ही धक्कादायक माहिती नॅशनल टाइगर कंझर्वेशन अथॉरिटी (एनटीसीए) यांनी जारी केलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. 2014मध्ये …

Read More »

डोक्यावरील विगमध्ये लपवले सोने

पुणे ः प्रतिनिधी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या एका व्यक्तीकडून 31 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. पुणे विमानतळावरील कस्टमच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. शेझाद बाबा मिया मोमीन या व्यक्तीकडून हे सोने जप्त करण्यात आले. एअर इंडियाच्या विमानाने शेझाद बाबा मिया मोमीन पुणे विमानतळावर आला असता कस्टमच्या …

Read More »

मतदानादरम्यान हॉटेलमध्ये आढळल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स

बिहार ः वृत्तसंस्था सोमवारी बिहारमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना मुझफ्फरपूर येथील एका हॉटेलमध्ये दोन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे हे हॉटेल मतदान केंद्रापासून अगदी जवळच्या अंतरावर होते. हॉटेलमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेक्टर …

Read More »