Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

पत्नीबरोबर संभोग करणे पतीचा मूलभूत अधिकार; न्यायालयाचा निर्णय

लंडन ः वृत्तसंस्था : लंडनमधील एका न्यायालयाने एक वेगळाच निर्णय दिला आहे. कोणताही पती आपल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवू शकतो. हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एपी हेडन यांनी हा निर्णय सुनावला आहे. न्यायाधीश हेडन यांनी कोर्ट ऑफ प्रोटेक्शनच्या …

Read More »

राहुलजी, अमेठीच्या विकासाचे काय?

भाजप नेत्या स्मृती इराणींचा खडा सवाल अमेठी ः वृत्तसंस्था : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी वायनाडच्या लोकांना सावध करत राहुल यांनी अमेठीत विकासकामे केली नसल्याचा आरोप …

Read More »

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधानांचा हल्लाबोल; घोषणापत्र नव्हे ‘ढकोसलापत्र’

इटानगर ः वृत्तसंस्था सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन देणार्‍या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. देशातील फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. तिरंगा जाळणार्‍या, ‘जय हिंद’ऐवजी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणार्‍यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती वाटते. त्यामुळेच काँग्रेसचा हात देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत, असा प्रश्न विचारावासा …

Read More »

बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला

आंबेगाव ः प्रतिनिधी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी (ढोबळेवाडी) येथील शेतकरी रामभाऊ नारायण ढोबळे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामभाऊ ढोबळे यांच्यावर सध्या पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आपल्या शेतातील दैनंदिन कामे …

Read More »

वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल सभेत ‘छोटा पाकिस्तानचा’ उल्लेख

सोलापूर ः प्रतिनिधी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या परिसरात त्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत, मात्र दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे झालेल्या एका प्रचारसभेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर त्यांच्या समर्थकाची जीभ घसरली. सोलापूर येथील नई जिंदगी हा परिसर मुस्लीमबहुल भाग आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे समर्थक …

Read More »

देहव्यापारातील विदेशी तरुणी ‘काळ्या यादीत’

नागपूर ः प्रतिनिधी शहरातील विविध भागांत दिवसेंदिवस देहव्यापार फोफावत असून आता या क्षेत्रात विदेशी तरुणींचाही शिरकाव झाला आहे. पर्यटन व्हिसाच्या नावावर देशात येणार्‍या विदेशी तरुणी देहव्यापार करीत असल्याची धक्कादायक बाब अनेक प्रकरणांमधून समोर आली आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी त्यांचा व्हिसा रद्द करून पुन्हा त्यांना भारताचा व्हिसा मिळणार नाही याकरिता ‘काळ्या …

Read More »

काँग्रेसला झटका; फेसबुकने 687 पेसेज, अकाऊंट हटवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोशल मीडियावर निवडणूक प्रचाराने जोर धरलेला असतानाच फेसबुकने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. फेसबुकवरील काँग्रेसशी संबंधित 687 पेसेज आणि अकाऊंट डिलिट केली आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसशी संबंधित काही फेसबुक पेज आणि अकाऊंटवरून खोट्या बातम्या, खोटी माहिती प्रसारित केली जात होती. …

Read More »

‘पुतण्याकडून पवारांची हिट विकेट’

वर्धा : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 1) वर्ध्यातील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार तोफ डागली. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यासच नकार देत आहेत, कारण त्यांना माहीत आहे हवेची दिशा कोणत्या दिशेला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. पवारांवर …

Read More »

‘इस्रो’ची आणखी एक भरारी

श्रीहरीकोटा : वृत्तसंस्था भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. भारताच्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे 28 नॅनो उपग्रहांचे सोमवारी (दि. 1) श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी 45 प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. एमीसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवण्याची ऐतिहासिक कामगिरी ‘इस्रो’ने केली. …

Read More »

उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा ऑस्ट्रेलियाकडे कल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा कल आता ऑस्ट्रेलियाकडे वाढत चालला आहे. ऑस्ट्रेलियन विद्यापीठात प्रवेश घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत गतवर्षाच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2018मध्ये जवळपास एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये अर्ज केला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने जारी केलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या यादीतून ही आकडेवारी समोर …

Read More »