नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात अडीच कोटी लोकांना लसींचे डोस दिल्यानंतर रात्री 12 वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू झाला. त्यांचा ताप वाढला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लगावला आहे.पंतप्रधानांनी शुक्रवारची देशाची लसीकरणाची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोव्यातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. …
Read More »आयपीएलच्या दुसर्या सत्राला रविवारीपासून सुरुवात
दुबई : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना रविवारी (दि. 19) रंगणार आहे. या टीम्सचा या आयपीएलमधील हा 30वा सामना असेल. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता होता आहे. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याचे …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेची पाहणी
रतलाम : वृत्तसेवा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. शुक्रवारी खुद्द गडकरींनी मध्य प्रदेशातल्या रतलाममध्ये रस्त्याचे परीक्षण केले. गडकरींनी एका कारमधून रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्या वेळी त्यांची कार 170 प्रतिकिमी वेगाने धावत होती. गडकरींनी द्रुतगती महामार्गाच्या घेतलेल्या चाचणीचा व्हिडीओ आता …
Read More »आरोग्य कर्मचार्यांवर मानसिक परिणाम; कोरोनाबाबत ‘आयसीएमआर’च्या अभ्यासाचा निष्कर्ष
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना साथीचा आरोग्य कर्मचार्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या अहवालात समोर आला आहे. आयसीएमआरने केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कामाचे तास आणि तीव्रता, लोकांचे गैरवर्तन आणि आरोग्यसेवा कर्मचार्यांच्या असलेल्या अतिरिक्त जबाबदार्या ज्यात त्यांना नवीन प्रोटोकॉलशी जुळवून घ्यावे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात कोरोना लसीकरणाचा विक्रम
एकाच दिवसात दोन कोटींहून अधिक नागरिकांना डोस नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता व्यक्त होत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती घेतली आहे. लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी शुक्रवारी (दि. 17) एकाच दिवसात देशात दोन कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम …
Read More »…तर ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक ठरेल -चंद्रकांत पाटील
पुणे : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा अध्यादेश न्यायालयात टिकावा अशी आपली इच्छा आहे, पण हा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते देहू येथे पत्रकारांशी बोलत होते. …
Read More »आता तरी जागे व्हा!
संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा जालना : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत या नैराश्यातून सदाशिव शिवाजी भुंबर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली आहे. या घटनेच्या …
Read More »बँकिंग क्षेत्रासाठी केंद्राकडून 30,600 कोटींची तरतूद
नवी दिल्ली : कोरोना महामारीतून सावरत असताना देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला पाठबळ देण्याकरिता नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची (एनएआरसीएल) उभारणी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यामार्फत संकटात असलेल्या बँकिंग क्षेत्रासाठी तब्बल 30 हजार 600 कोटींच्या निधीची घोषणा बुधवारी (दि. 16) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात …
Read More »जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच करायला हवे होते, ते आज आम्ही करतोय!
पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन संरक्षण कार्यालय संकुलांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पावरून टीका करणार्यांना विरोधकांवर निशाणा साधला. जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच करायला हवे होते, ते आज आम्ही करीत आहोत, …
Read More »मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा मराठा ठोक मोर्चातर्फे इशारा; प्रलंबित मागण्यांसाठी पवित्रा
औरंगाबाद : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला तीन महिने उलटूनही निर्णय घेतला नाही. त्यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा अडवणार आहोत, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper