Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

राजू शेट्टी यांचे राज्य सरकार विरोधात आंदोलन

कोल्हापूर : प्रतिनिधीपूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (दि. 5) नृसिंहवाडीत जलसमाधी आंदोलन केले. या वेळी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीपात्रात उड्या मारल्या. त्यांना पोलिसांनी बोटींच्या सहायाने तातडीने बाहेर काढले. शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केल्यानंतर …

Read More »

यंदाही सण घरातच!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचना नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गामध्ये वाढ झाल्याचं आढळून येत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत खरंतर आपल्याला सरकारकडून वारंवार सूचना करण्यात येत आहेत. त्यातच सध्या सण-उत्सवांचा हंगाम आहे. अशा काळात निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा गंभीर स्थिती उद्भवू नये यासाठी सर्व तज्ञ मंडळी …

Read More »

लहान मुलांसाठी लवकरच येणार आणखी एक लस

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये भारताला लवकरच आणखी एक लस मिळणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) हैदराबादच्या बायोलॉजिकल ई लिमीटेड या कंपनीला 5 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठीच्या कोरोना लसीसाठी क्लीनीकल ट्रायल घेण्याची परवानगी दिली आहे. अटी आणि शर्थींसह डीसीजीआयने कॉर्बेवॅक्स (उेीलर्शींरु) या लसीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या …

Read More »

अफगाणिस्तानसंदर्भात भारताचा टास्क फोर्स सक्रिय

नवी दिल्ली ः अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य स्थापन झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्धच्या कारवाईसाठी वापरू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. हा ठराव मंजूर करण्यात भारताने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. त्यानंतर आता अफगाणिस्तानमधील बदलती परिस्थिती पाहता भारताच्या तात्कालिक प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी …

Read More »

खासदार भावना गवळींच्या शिक्षण संस्थांवर ईडीचे छापे

वाशिम ः प्रतिनिधी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. वाशिममधील देगाव, शिरपूर व इतर अशा पाच शिक्षण संस्था आहेत. मागील वर्षी तेथून पाच कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. बालाजी …

Read More »

क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठेल

 मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचा विश्वास नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासबका साथ, सबका विकास यासोबतच सबका प्रयास या सूत्राच्या आधारे क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठू शकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते रविवारी (दि. 29) मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधत …

Read More »

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढतीच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी (दि. 29) सकाळी संपलेल्या 24 तासांत देशात 45,083 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 460 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 35,480 जण कोरोनातून बरेही झाले आहेत. देशात सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची …

Read More »

राज्यातील प्रश्नांकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष

ना. नारायण राणेंचा निशाणा कणकवली ः प्रतिनिधी महाराष्ट्रात सरकार आहे की नाही हे मला कळत नाही. एसटी महामंडळातील कामगार पगारासाठी आत्महत्या करीत आहेत. ही भयानक अवस्था आहे. या प्रश्नांकडे ठाकरे सरकारचे लक्ष नाही. फक्त नारायण राणे कुठे जातात याकडे लक्ष आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान …

Read More »

लहान मुलांना ऑक्टोबरपासून लस

12 ते 17 वयोगटाला तीन डोस घ्यावे लागणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकारने 12 ते 17  वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे. येत्या ऑक्टोबरपासून झायडस कॅडीलाची झायकोव्ह-डी ही लस देण्यात येणार आहे. मुलांना या लसीचे तीन डोस द्यावे लागतील. एनटीएजीआय प्रमुख एन. के. अरोरा यांनी या संदर्भात माहिती दिली …

Read More »

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी सज्जता

नवी दिल्ली ः देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, मात्र असे असले तरी कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने आधीपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग …

Read More »