Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

शिवसेनेला मोठा धक्का! धनुष्यबाण चिन्ह गोठविले 

नवी दिल्ली ः शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वांत मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठविले आहे. एवढेच नव्हे; तर शिवसेना पक्षाचे नावदेखील त्यांना वापरता येणार नाही. दुसरीकडे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरणार आहे. शिवसेनेत उभी उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर शिंदे …

Read More »

अज्ञानी पर्यटक आणि उपेक्षित ठिकाणे

’केल्याने देशाटन’ हा एक कार्यक्रम आमच्या लहानपणी दुरदर्शनवर लागत असे. या कार्यक्रमात उपेक्षित असलेली पर्यटन स्थळे प्रकाशात आणली जात असत. पर्यटकांना काय वेगळ पहायला मिळेल आणि शिकायला मिळेल याचा चांगला उद्देश यातून साध्य व्हायचा, मात्र आजच्या चॅनलमधील स्पर्धा आणि मालिकांची लोकप्रियता पाहता असे कार्यक्रम मागे पडू लागले आहेत. त्यामुळे नवनवीन …

Read More »

देशात सुपरफास्ट 5जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ

भारताने नवा इतिहास रचला -पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था 21व्या शतकातील भारतासाठी 1 ऑक्टोबर 2022 हा ऐतिहासिक दिवस आहे. 5जी तंत्रज्ञान दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. नवा भारत हा फक्त तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावेल. 2जी, 3जी, 4जीच्या काळात भारत …

Read More »

आजपासून इंटरनेट सुपरफास्ट!

5जी सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार शुभारंभ नवी दिल्ली ः वृत्तसंस्था तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारत प्रवेश करीत आहे. 1 ऑक्टोबरपासून देशात सुपरफास्ट इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर सकाळी 10 वाजता 5जी सेवेचा शुभारंभ होईल. 5जी तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, …

Read More »

‘पीएफआय’वर बंदी केंद्र सरकारकडून मोठे पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अध्यादेश जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पीएफआय संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. गेल्या आठवड्यात एनआयएने महाराष्ट्रासह देशात 15 ठिकाणी छापेमारी करीत सुमारे 106 पीएफआय …

Read More »

5जी सेवेची प्रतीक्षा संपली! पंतप्रधान मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबरला शुभारंभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली 5जी इंटरनेट सेवा 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्राच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने ट्वीट करून ही माहिती दिली. इंडिया मोबाईल काँग्रेस या कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीतील प्रगती मैदानावर केले जाणार आहे. त्याच्या पहिल्या दिवशी …

Read More »

तब्बल सात दशकानंतर चित्ता पुन्हा भारतात

भोपाळ : वृत्तसंस्था भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचे तब्बल 75 वर्षांनंतर मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी (दि. 17) आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्त्यांना उद्यानात सोडले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पाच मादी आणि तीन नर असे एकूण आठ चित्ते विशेष कार्गो विमानाने आफ्रिकेतील नामिबियातून ग्वाल्हेरमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांना …

Read More »

गोव्यात काँग्रेसला खिंडार; आठ आमदार भाजपमध्ये

पणजी : देशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली असताना काँग्रेसला गोव्यात जबरदस्त धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी बुधवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला. गोव्यात काँग्रेसचे 11 …

Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याचे रशियात अनावरण

मॉस्को : वृत्तसंस्था महाराष्ट्रभूमीचे महान सुपूत्र लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात आला आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये साठे यांचा पुतळा, तैलचित्र उभारण्यात आले आहे. यांचे अनावरण मंगळवारी (दि. 13) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हटले की, रशियात भारतीय संस्कृती …

Read More »

मोदी सरकारच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील भाजप सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट झाल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती मागवली होती. आकडेवारीनुसार मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2004 ते 2013मध्ये 9,321 दहशतवादी कारवाया झाल्या, तर मोदी सरकारच्या काळात म्हणजे 2014 ते 2022पर्यंत 2,132 …

Read More »