उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओबीसी महासंघाच्या सभेत माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, असे कुठेही म्हटलेले नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणाताही संबध नाही. आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीत सांगितले. त्याचप्रमाणे शिंदे गटाचे …
Read More »जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती
11 ऑगस्ट रोजी घेणार शपथ नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी शनिवारी (दि. 6) मतदान झाले. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला असून ते देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून 11 ऑगस्ट रोजी शपथ घेणार आहेत. जगदीप धनखड यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »आमच्या संयमाचा अंत पाहू नका
गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा पुणे ः प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी (दि. 2) रात्री कात्रज चौकात हल्ला केला. दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा सूचक इशाराच उदय …
Read More »महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी पुन्हा सुनावणी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बुधवारी (दि. 3) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या संदर्भात गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे. कामकाज सुरू झाल्यानंतर ही सुनावणी पहिल्या क्रमांकावर असेल, असे सरन्यायाधीश रमणा यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमधील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हानासह अन्य याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली. या वेळी …
Read More »आता 24 तास फडकविता येणार तिरंगा; केंद्र सरकारकडून ध्वजसंहितेमध्ये बदल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे. आता दिवस-रात्र म्हणजे 24 तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे तसेच पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारने हर घर तिरंगा मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. …
Read More »देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा -पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्टदरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले आहे. या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत …
Read More »द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती
देशातील पहिल्या आदिवासी महिला सर्वोच्च पदावर विराजमान नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान झाल्यानंतर गुरुवारी (दि. 21) संसद भवनात मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या भरघोस मतांनी विजयी झाल्या असून त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर …
Read More »महाराष्ट्रासाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा; दोन आठवड्यांत निवडणुका जाहीर करण्याचे आदेश नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 20) झालेल्या सुनावणीत बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार येत्या दोन आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले …
Read More »संसदेत शिवसेनेचा गट स्थापणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजधानी दिल्लीत घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेनेच्या 12 खासदारांनी आज हिंदुत्ववादी विचारांना आणि युतीचे सरकार स्थापण्याला त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्यानंतर आम्ही संसदेत शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. राहुल शेवाळे गटनेते असतील, तर भावना गवळी मुख्य प्रतोद असतील, असे सांगत …
Read More »सुटे धान्य, दही, लस्सीवरील जीएसटी मागे; केंद्राची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने सुट्या धान्यावरील पाच टक्के जीएसटी मागे घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट करून हा याबाबत माहिती दिली. यानुसार सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यावर पाच टक्के जीएसटी लागणार नाही. जीएसटी लागू झाला तेव्हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper