Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नागरी सेवेच्या भूखंड उपलब्धतेसाठी आमदार मंदा म्हात्रे यांचा पाठपुरावा

सिडको प्रशासनासोबत बैठक नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा क्षेत्रात विविध प्रयोजनासाठी भूखंड मिळणे संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांसह बैठक झाली. या वेळी बेलापूर ग्रामस्थांकरिता खेळाचे मैदान, सीबीडी येथे बालभवन उभारणे, सीवूड्स येथे महिला भवन, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, उद्यान, आरोग्य केंद्र, …

Read More »

नवी मुंबईतही डोळ्यांची साथ

वाशी महापालिका रुग्णालयात दररोज 25 रुग्णांवर उपचार नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातही डोळे येण्याची साथ आली असून गेल्या आठवड्याभरापासून डोळ्याची साथ वेगाने वाढत आहे. नवी मुंबई महापालिका नागरी आरोग्य केंद्र,महापालिका व खासगी रुग्णालयात नेत्रसंसर्गबाधित रुग्ण वाढल्याच्या माहिती समोर येत आहे. अशी लक्षणे दिसताच योग्य ती काळजी घ्यावी, …

Read More »

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी

आशिष शेलार खजिनदार मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची निवड झाली आहे, तर खजिनदारपदाची सूत्रे भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे असणार आहेत. बीसीसीआयच्या मंगळवारी (दि. 18) मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 1983च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य रॉजर …

Read More »

राज्य शासकीय कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी मिळणार वेतन

मुंबई : प्रतिनिधी येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते, परंतु दिवाळी 22 ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर …

Read More »

माजी आमदार अवधूत तटकरे भाजपमध्ये उद्धव सेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’

मुंबई ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील माजी आमदार अवधूत तटकरे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 14) मुंबईत हा पक्षप्रवेश झाला. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि माजी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंना ढाल-तलवार

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगाने दिले चिन्ह मुंबई ः प्रतिनिधी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला ढाल-तलावर हे चिन्ह देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव व मशाल चिन्ह दिले होते, तर शिंदे गटाला नव्याने तीन …

Read More »

शिवसेनेला मोठा धक्का! धनुष्यबाण चिन्ह गोठविले 

नवी दिल्ली ः शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वांत मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठविले आहे. एवढेच नव्हे; तर शिवसेना पक्षाचे नावदेखील त्यांना वापरता येणार नाही. दुसरीकडे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरणार आहे. शिवसेनेत उभी उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर शिंदे …

Read More »

जनजागृतीनंतरच विकास आराखडा मंजूर करावा

नवी मुंबई बचाव अभियानाचे अध्यक्ष दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेने नागरिकांच्या कर्तव्यात कसूर न करता प्रारुप विकास आराखड्याबाबतीत सर्वसमावेशक जनजागृती, सूचना आणि हरकती यांचा अंतर्भाव करावा, त्यानंतर विकास आराखडा मंजूर करावा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी दसर्‍याच्या दिवशीच वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी …

Read More »

नवी मुंबईतील अमली पदार्थांना आळा घालावा

‘अभाविप’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्याची मागणी ‘अभाविप’च्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. फडणवीस वाशी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. या वेळी त्यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात ‘अभाविप’च्या जिल्हा संयोजिका प्राची सिंह …

Read More »

राज्यात 20 हजार पोलिसांची पदे भरणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी मुंबई : राज्यातील पोलीस विभागात 20 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 26) येथे दिली. सायबर सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पोलीस विभागातील भरतीबाबत यापूर्वी सात ते आठ हजार पदांच्या भरतीबाबत एक जाहिरात …

Read More »