Breaking News

मुंबई – नवी मुंबई

राज्यात अनेक नवे उद्योग येणार -मुख्यमंत्री

मुंबईत : प्रतिनिधी आयोजित रोजगार मेळाव्यात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात अनेक नवे उद्योग आणत असल्याची माहिती दिली. दोन-तीन प्रकल्प कुठे गेले हे आरटीआयमधून समोर आले आहे. त्यातून सत्य समोर येईल. प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले? कधी गेले? हे समोर येईल. उपमुख्यमंत्र्यांनीही पुराव्यानिशी मांडले आहे, असे सांगून आम्ही …

Read More »

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना सरकारचा दिलासा

नुकसानभरपाई देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकर्‍यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आतापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबरमधील पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय बुधवारी (दि. 2) राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. …

Read More »

राज्यात विविध विभागांत तब्बल 75 हजार पदे भरली जाणार

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे नोकरभरतीला घातलेली 50%ची मर्यादा शिथिल करीत आता शंभर टक्के नोकरभरती करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकरने घेतला आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यात शासनाच्या 29 विभागांमध्ये 75 हजार पदांची नोकर भरती केली जाणार आहे. राज्य सरकारने या संदर्भातील शासकीय आदेश …

Read More »

नवी मुंबईत राष्ट्रभक्तीचे एकात्म दर्शन

तिरंगी मानवी एकता साखळीतून राष्ट्रीय एकता दिन साजरा नवी मुंबई : बातमीदार भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनमोल योगदान देणारे स्वातंत्र्य सेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनाचे अर्थात राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील सर्व्हिस रोडवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या समवेत सर्व अधिकारी, कर्मचारीवृंद यांनी मानवी एकता साखळी …

Read More »

महाराष्ट्रात साकारणार इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर

केंद्र सरकारची मंजुरी; उपमुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासह आगामी वर्षात राज्यात टेक्स्टाईल क्लस्टर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 31) येथे पत्रकार परिषदेत दिली. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार …

Read More »

नवी मुंबईत उत्तर भारतीयांची छट्पूजा उत्साहात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात छट्पूजा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जात आहे. नवी मुंबई शहरात पाम बीच ज्वेल ऑफ नवी मुंबई या परिसरात तसेच शहरातील विविध तलावांच्या ठिकाणी छट्पूजेचा उत्साह सुरू आहे. तीन दिवस चालणार्‍या उत्सवाचा आजचा दुसरा दिवस. शहरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांनी …

Read More »

महिन्याभरात कांदा रडवणार

एपीएमसीत प्रतिकिलो 35 रुपयांवर नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दोन आठवड्यापासून एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ पहावयास मिळत आहे. मागील आठवड्यात गुरुवारी आणि त्यानंतर शनिवारी कांद्याच्या दरात किमान पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. तर आता सोमवारी (दि. 31) बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा प्रति किलो 35 रुपयांवर पोहोचला …

Read More »

सुटीच्या दिवशी विभागनिहाय हरकती सूचना स्वीकाराव्यात

भाजपचे महामंत्री विजय घाटे यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या सूचना आणि हरकतींसाठी विकास आराखडा प्रकाशित केला आहे. या प्रक्रियेनुसार सूचना आणि हरकती स्वीकारण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत ठेवली आहे. सध्या हरकती सूचना स्वीकारण्याचा कालावधी समाप्त होत आला आहे. शेवटचे दोन दिवस उरले आहेत, …

Read More »

एपीएमसीच्या बाजार समित्यांचा होणार पुनर्विकास

संचालक मंडळाच्या हालाचाली सुरू; सल्लागारांची नियुक्ती नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून वाशीतील इमारतींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता 2005पासून धोकादायक यादीत समाविष्ट होत असलेल्या कांदा-बटाटा बाजाराच्या विकासाबरोबरच इतर चारही बाजाराचा पुनर्विकास एकत्रितपणे करण्याच्या निर्णय एपीएमसी संचालक मंडळाने …

Read More »

आरोग्य विभागात होणार महाभरती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आरोग्य विभागामध्ये 10 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात येत्या 1 ते 7 जानेवारीदरम्यान जाहिरात निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री महाजन म्हणाले की, मार्च 2018मध्ये आरोग्य विभागात 13 हजार जागांची भरती निघाली होती, …

Read More »