Breaking News

मुंबई – नवी मुंबई

“भारत जोडो यात्रेत भ्रष्टाचारातील पैशांचा वापर”

खर्चाच्या चौकशीची भाजपची मागणी मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर आरोप केला आहे. मागील अडीच वर्षांतील सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराचा पैसा या यात्रेसाठी वापरण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे तसेच या यात्रेवर …

Read More »

केबीपी कॉलेजमध्ये भष्ट्राचार निर्मूलनासाठी जनजागृती

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमधील (केबीपी) राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी भष्ट्राचार प्रतिबंधात्मक सप्ताहाच्या निमिताने  31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत पथनाट्यातून जनजागृती केली. भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक सप्ताह दरम्यान स्वयंसेवकांनी संपूर्ण नवी मुंबई परिसरातील विविध ठिकाणी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती …

Read More »

पावसामुळे टोमॅटोच्या दरात घसरण तर डाळिंबाचे दर भिडले गगनाला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात विविध ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे एपीएमसीत टोमॅटो 40 रुपये किलो, तर किरकोळाला 50 ते 55 रुपये किलोपर्यंत दरवाढ झाली होती. मात्र, दिवाळीनंतर हे दर किलोमागे 25 रुपयांनी घसरले असून किरकोळ बाजारात 30 रुपये किलोने टोमॅटोची …

Read More »

नवी मुंबइतील सार्वजनिक वाहतूकीचे कौतुक

प्रथम पुरस्काराने शहराचा गौरव नवी मुंबई : बातमीदार भारत सरकारच्या  गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील इन्स्टिट्युट ऑफ आरंबन ट्रान्सपोर्ट (इंडिया) यांचेमार्फत कोची येथे झालेल्या 15 व्या अर्बन मोबॅलिटी इंडिया परिषदेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास ‘सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर ’ श्रेणीचा राष्ट्रीय प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले. …

Read More »

नवी मुंबईतील सीबीडी येथे घरफोडी

घरमालक नाईट ड्युटीला गेल्यावर चोरांनी साधली संधी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त चोरटे चोरी करण्यापूर्वी त्या घरात कोण राहते कधी कामाला जातात याचा शोध घेतात. संपूर्ण माहिती गोळा करतात ज्याला पोलिसी भाषेत रेकी म्हणतात. अशाच पद्धतीच्या चोर्‍या सध्या वाढल्या आहेत. बंद घरे फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. नवी मुंबईतील …

Read More »

सिडकोकडून 700 स्लॅबचे काम 555 दिवसांत पूर्ण; गृहनिर्माण क्षेत्रातील यशाची पुनरावृत्ती

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नवी मुंबईतील तळोजा नोडमधील सेक्टर-28, 29, 31 व 37 मध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील इमारतींमधील 500 स्लॅबचे काम 489 दिवसांत पूर्ण केल्यानंतर, सिडको महामंडळाने पुन्हा एकदा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी  यांच्या मार्गदर्शनाखाली याच इमारतींमधील 700 स्लॅबचे काम केवळ 555 दिवसांत …

Read More »

नवी मुंबईत 29 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विविध देशांतून आयात केलेल्या खाद्यपदार्थाचा दर्जा अन्न व सुरक्षा मानकांप्रमाणे न आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने नवी मुंबईतील शीतगृहांवर कारवाई करून 29 कोटींचा माल जप्त केला आहे. आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे …

Read More »

आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईकर चमकले

नवी मुंबई : बातमीदार दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या दुसर्‍या ओपन इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईच्या दोन खेळाडूंनी प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत 900पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते . नवी मुंबईतील सुरज पुजारीने रौप्यपदक आणि परेझ नादार यांनी कांस्यपदक पटकावित नवी मुंबईचे नाव गाजवले. या स्पर्धेसाठी …

Read More »

नवी मुंबईत कॅरम स्पर्धेला प्रतिसाद

नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिरवणे गाव येथे दोन दिवसीय भव्य कॅरम स्पर्धा झाली. भाजपचे महामंत्री डॉ. राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्यातर्फे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत देशाच्या विविध भागातील खेळाडू सहभागी झाले होते. मालदीव येथे झालेल्या …

Read More »

पोलीस भरतीतील वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई ः प्रतिनिधी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील तरुणांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीतीच्या कमाल वयोमर्यादेत वाढ केली आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छूक असलेल्या तरुण-तरुणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ज्या उमेदवारांची वयाची कमाल मर्यादा पूर्ण झालीय अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना …

Read More »