Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवी मुंबईकरांच्या सोयीसाठी वाशीत पासपोर्ट कार्यालय

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईकरांना गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या महत्त्वाच्या कामासाठी ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत असे. त्यामुळे अनेकांना त्रास होत होता. या अनुषंगाने वाशीतील पोस्ट कार्यालयाच्या इमारतीमध्ये पासपोर्ट विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी नवी मुंबईकरांची होणारी पायपीट यापुढे थांबणार आहे. नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी …

Read More »

शाळकरी मुले सोशल साईट्सच्या विळख्यात

नवी मुंबई : प्रतिनिधी सोशल मीडियातील विविध माध्यमे मानवाला वास्तविक जगापासून दूर घेऊन जात आहेत. याच्या वापराने लोक भ्रामक विश्वात राहण्यावर विश्वास ठेवत आहेत, परंतु या समस्येवर योग्य निदान शोधण्याकडे कोणाचे लक्ष नाही. युवकांसोबत शाळकरी मुलेसुद्धा या भ्रामक जगात गुंग होत आहेत. समाजाच्या दृष्टीने ही चांगली लक्षणे नाहीत, असे निरामय …

Read More »

आमदार शरद सोनावणे शिवसेनेत

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार  शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला धक्का बसला असून, विधानसभेतील मनसेची पाटी कोरी झाली आहे. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदार सोनावणे यांनी सोमवारी (दि. 11) शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची …

Read More »

महिला बचत गटांसाठी अस्मिता बाजार योजना

मुंबई : प्रतिनिधी : ग्रामीण भागातील महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची आता अस्मिता अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री करता येणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थ, लहान मुलांना लागणार्‍या आवश्यक वस्तू, सौंदर्यप्रसाधने, घरगुती उपयोगी वस्तू, पशू खाद्य आदी साहित्याचीही या अ‍ॅपच्या सहाय्याने बचत गटांना रिटेलर म्हणून विक्री करता येणार आहे. जागतिक महिला दिनी राज्याच्या …

Read More »

कंत्राटी कर्मचार्यांना वेतनप्राप्तीची हमी

मुंबई : प्रतिनिधी : कंत्राटी कर्मचार्‍यांना कंत्राटदारांसमवेत केलेल्या करारानुसार आणि विविध कामगार कायद्यानुसार वेतन प्रदान करण्यासंदर्भात समान कार्यपद्धती लागू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक होते. या संदर्भात  उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने 22 फेब्रुवारी 2019 रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार कंत्राटी कर्मचार्‍यांना कंत्राटदारांमार्फत वेतन अदा करताना समान कार्यपद्धती अवलंबिण्यात …

Read More »

महिलांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा

निवेदिका अनघा मोडक यांचे प्रतिपादन, सिडकोमध्ये महिला दिन बेलापूर : रामप्रहर वृत्त : स्त्रियांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्य समरसून जगण्याची क्षमता प्राप्त केली, तर जीवनात केवळ आनंद आणि आनंदच असेल, असे उद्गार सुप्रसिद्ध निवेदिका व रेडीओ जॉकी अनघा मोडक यांनी काढले. सिडको भवन येथे सिडको एम्प्लॉईज युनियनतर्फे जागतिक महिला …

Read More »

शेवटच्या दोन सामन्यांसाठी महेंद्रसिंह धोनीला विश्रांती

मुंबई : प्रतिनिधी भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेत शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे रांचीत झालेला सामना हा धोनीसाठी घरच्या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर माध्यमांशी बोलताना म्हणाले, शेवटच्या दोन सामन्यांसाठी आम्ही काही बदल केले आहेत. माही …

Read More »

शहिदांच्या कुटुंबीयांना सरकारचा आधार; वीरपत्नी, वीरमाता यांना शेतीयोग्य जमिनीचे वाटप

मुंबई : प्रतिनिधी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून, या कुटुंबांना आधार देणे हे राज्य शासनाचे कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 8) येथे केले. सह्याद्री अतिथीगृहात शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता यांना शेतीयोग्य जमिनीचे वाटप करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास …

Read More »

लीज डीड सुधारणा योजनेचे सिडकोकडून सादरीकरण

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा : राज्याच्या महसूल व वन विभागाने शासकीय जमिनींसंदर्भात फ्री होल्ड धोरण निश्चित केले व त्या धर्तीवर सिडकोनेदेखील लीजशी संबंधित काही अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने फ्री होल्डप्रमाणे सर्व सुविधा नवी मुंबईतील रहिवाशांना मिळाव्यात म्हणून भाडेपट्ट्याच्या अटी शिथिल करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळामसोर मांडण्यात आला …

Read More »

पाकिस्तानी मसाल्यांच्यावर व्यापार्यांची बंदी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान चालणार्‍या व्यापारावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. भारतातून पाकिस्तानात जाणारा टोमॅटो आणि अन्य कृषी माल तिकडे पाठविण्यास येथील व्यापार्‍यांनी आधीच नकार दिला आहे. त्यातच आता पाकिस्तानातून येणारा कृषी माल, मसाल्याचे पदार्थ …

Read More »