Breaking News

महत्वाच्या बातम्या

विसर्जन घाटाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण

गणेशभक्तांनी मानले तेजस कांडपिळेंचे आभार पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या प्रभाग 20मधील पोदीवरील गणेश विसर्जन घाटावर शनिवारी (दि. 11) दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले. या वेळी तेथील तुटलेल्या घाटाचे आणि खराब झालेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून घेतल्याबद्दल गणेशभक्तांनी नगरसेवक तेजस कांडपिळे यांचे भेटून आभार मानले. पनवेल महापालिकेच्या …

Read More »

सिडको करणार खारघर, तळोजामध्ये पाणीपुरवठा

भाजपच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई: प्रतिनिधी खारघर आणि तळोजा परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे सिडकोने पाणीपुरवठा करण्यासाठी एक कोटी 41 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. यासंदर्भात  भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सिडकोला धारेवर …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलिसांचा रुटमार्च

रोहे : प्रतिनिधी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखत सर्व सण निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली रोहा शहरात रुटमार्च करण्यात आला. यामध्ये सर्व सहाय्यक अधिकारी आणि 30 कर्मचार्‍यांसह अग्निशमन, रुग्णवाहिका यांचा सहभाग …

Read More »

कर्जतमधील गणेशघाटांची पालिकेकडून पाहणी

कर्जत : बातमीदार कर्जत शहरातील गणेश विसर्जन उल्हास नदीवर ज्या ज्या गणेश घाटांवर केले जाते, तेथील सोयीसुविधांची पाहणी आणि अत्यावश्यक सेवा यांची माहिती घेण्यासाठी कर्जत नगर परिषदेकडून पाहणी करण्यात आली. कर्जत शहरातील गणेश विसर्जन उल्हास नदी पात्रात वाहत्या पाण्यात केले जाते. गौरी-गणपती, तसेच अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी येणार्‍या …

Read More »

ड्रोनच्या वापरामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीतील विहूर रौद परिसरात तणावाचे वातावरण असताना शनिवारी (दि. 11) सकाळी 11.30 वाजता येथील तैजून नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने ड्रोनचा वापर केला. हा ड्रोन त्याने त्याच्या जागेवतिरिक्त इतर जागेतही फिरवल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सरकारी गुरुचरण असलेली जागा तैजून यांनी विकत घेतल्यामुळे …

Read More »

अंथ्राट-गुडवण-बोरिवली रस्त्याची दुरवस्था

वाहतूक बंद; ग्रामस्थांचा फेरा वाढला कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील कशेळे-पिंपळोली-तळवडे-नेरळ या जिल्हा मार्ग रस्त्यावरील अंथ्राट-गुडवण आणि तेथून बोरिवलीकडे जाणार्‍या रस्त्यावर भगदाड पडले आहे, तर नेरळ-गुडवण रस्ता मध्यभागापासून खचला असून या मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांना लांबचा फेरा मारत कशेळे-मुरबाड रस्ता किंवा कशेळे-नेरळ या राज्यमार्गांवर …

Read More »

रायगडच्या पर्यटन विकासासाठी छायाचित्र स्पर्धा

रोहे : प्रतिनिधी 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील अस्सल कोकण परिचित होण्यासाठी एक विशेष छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यातील परिचित, अपरिचित आणि अप्रकाशित पर्यटनस्थळांचा शोध व्हावा आणि जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत ती स्थळे पोहोचवावी या उद्देशाने रायगड जिल्हा कृषी प्रबोधिनी व लक्ष्मीसृष्टी अ‍ॅग्रो …

Read More »

फिनो बँकेच्या माध्यमातून डिजिटल बँकिंग सेवा

पेण : प्रतिनिधी फिनो बँकेच्या शाखेमधून ग्राहकांना डिजिटल सेवा देण्याचा बँकेचा हेतू असून आज गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर पेणमध्ये फिनो बँकेच्या आउटलेटची सुरुवात विभुते इन्टरप्रायजेसच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती बँकेचे कोकण मुख्य प्रबंधक गौतम जाधव यांनी दिली. पेणमधील फिनो बँकेच्या डिजिटल सेवा देणार्‍या शाखेची सुरुवात चिंचपाडा येथे करण्यात आली असून या …

Read More »

नियोजित नानानानी पार्कवरील अतिक्रमण हटविण्याचे आव्हान

खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगर परिषद हद्दीत शिळफाटा येथे पाताळगंगा नदीकाठी नानानानी पार्कचा प्रस्ताव वाढत्या अतिक्रमणामुळे रखडणार असून, नव्याने पदभार घेतलेले मुख्याधिकारी अतिक्रमण विषय किती गांभीर्याने घेणार याकडे खोपोली नागरिकांचे लक्ष लागले आहे. दोन वर्षापूर्वी खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंदिरा चौक रस्त्याचे रुंदीकरण हाती घेण्यात आले …

Read More »

लसीकरण महोत्सव

कर्जत शहरात कोरोनाचे रुग्ण यांची संख्या गेल्या 15 महिन्यात शून्यावर येऊ शकली नाही. त्यामुळे आता पालिका आणि उपजिल्हा रुग्णालय यांनी प्रत्येक प्रभागात कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आवश्यक असलेले लसीकरण करण्यावर भर दिला आहे.कर्जत शहर लसीकरण संघर्ष समिती यांच्या पुढाकाराने कर्जत शहरात यावर्षीचा गणेशोत्सव लसीकरण उत्सव झाला आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्जत शहर लसीकरण …

Read More »