कर्जत : बातमीदार तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे हिरवीगार झालेली भाताची रोपे पावसाअभावी सुकू लागली आहेत. पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास काही शेतकर्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे. कर्जत तालुक्यात 10 हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. त्यासाठी बाजारातून भाताचे बियाणे विकत आणून …
Read More »12 प्रलंबित, 12 निलंबित
महाराष्ट्राच्या विधिमंडळात सोमवारी जे काही घडले ते भारतीय लोकशाहीच्या इतिहासाला काळिमा फासणारे आहे. अत्यंत दुर्दैवी पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्याचा विक्रम महाविकास आघाडी सरकारच्या नावे नोंदवला गेला. सभागृहाबाहेर तुम्हाला पळता भुई थोडी करू अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणी दिली, ती …
Read More »अर्जेंटिना उपांत्य फेरीत
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा रियो दी जानेरो ः वृत्तसंस्थालिओनेल मेसीच्या 76व्या आंतरराष्ट्रीय गोलमुळे अर्जेंटिनाने इक्वेडोरवर 3-0 अशी मात करीत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यशस्वी खेळात सातत्य राखत मंगळवारी उपांत्य फेरीत अर्जेंटिनाला कोलंबियाचा सामना करायचा आहे. मेसीने या लढतीत तिसर्या क्रमांकाचा गोल केला, पण आधीच्या दोन गोलमध्येही …
Read More »टी-20 क्रिकेटमध्ये सुबोध भाटीचे द्विशतक
17 षटकार, 17 चौकारांचा वर्षाव मुंबई ः प्रतिनिधीटी-20 क्रिकेट ह्या कमी चेंडूंच्या जलद क्रिकेटमध्ये शतक झळकावणे हीदेखील दुर्मीळ गोष्ट मानली जाते. त्याच वेळी दिल्लीचा क्रिकेटपटू सुबोध भाटीने द्विशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे ही ऐतिहासिक कामगिरी त्याने दुसर्यांदा केली आहे. दिल्लीतील एका क्लब मॅचमध्ये सुबोधने 79 चेंडूंमध्ये 205 धावा काढल्या. या …
Read More »आयपीएल 2022साठी ब्लू प्रिंट
बीसीसीआयकडून मेगा ऑक्शनची तयारी; मुंबई इंडियन्समध्येही होणार बदल नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वाचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे खेळविण्यात येणार आहेत. त्याच वेळी आता बीसीसीआयने आयपीएल 2022साठीच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. बीसीसीआयने आयपीएल 2022ची ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्यात आयपीएलमध्ये दोन नव्या फ्रँचायझी, …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण : चौकशीत संचालकांचे वेळकाढूपणाचे धोरण, कारवाई लांबवण्यासाठी पुढील तारीख घेण्याचे तंत्र, खातेदार आणि ठेवीदार मात्र आपल्याच पैशांपासून वंचित
पनवेल ः प्रतिनिधी कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेले संचालक आणि हयात नसलेल्या संचालकांच्या वारसांना सहकार खात्याने नोटीस बजावूनही ते उपस्थित राहत नसून वेळकाढूपणा करून कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. संचालकांच्या या विलंबामुळे खातेधारक आणि ठेवीदारांना त्यांचे अडकलेले पैसे मिळायलाही विलंब होईल. कर्नाळा बँकेतील …
Read More »आजपासून अधिवेशनाची रणधुमाळी; ठाकरे सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकले -फडणवीस
मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत सोमवार (दि. 5)पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, मात्र हे अधिवेशन दोनच दिवसांचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर परखड शब्दांत टीका केली …
Read More »कोविन ग्लोबल कॉन्क्लेव्हवर पंतप्रधान विचार मांडणार
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. 5) कोविन ग्लोबल कॉन्क्लेव्हवर आपले विचार मांडणार आहेत. यात भारत कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरात डिजिटल पब्लिक गुडच्या रूपात कोविनला ऑफर करणार असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणने दिली. जगभरातील देश सध्या कोविड-19 विषाणू संसर्गाचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी कोविन अॅपसंदर्भात …
Read More »मराठा समाज झुकणार नाही -चंद्रकांत पाटील; राज्य सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध
मुंबई ः प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने प्रचंड पोलीस बळ वापरून दडपशाही केली. त्याचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते. अशा प्रकारे आक्रोश दाबण्याचा सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही आणि मराठा समाज कधी झुकणार नाही, असा इशारा भाजप …
Read More »पेणमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये लगबग वाढली; चार लाख मूर्ती परदेशांत रवाना
पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सव जवळ येऊ लागल्याने गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या पेणमधील कार्यशाळांत लगबग वाढली आहे. पेणच्या गणेशमूर्तींना देश-विदेशात मागणी असून आतापर्यंत चार लाख गणेशमूर्ती परदेशांत रवाना झाल्या असल्याची माहिती येथील गणेशमूर्तीकार दीपक समेळ यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे सार्वजनिक आणि घरोघरी आगमन होणार आहे. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper