मानवी साखळी आंदोलनाला उदंड प्रतिसाद पनवेल ः हरेश साठेनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि. 10) रायगडसह ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांत भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो जणांनी सहभाग घेऊन मानवी साखळीला उत्स्फूर्त प्रतिसाद …
Read More »धरण, तलाव, धबधब्यांवर जाण्यास बंदी; कर्जत प्रांताधिकार्यांचे आदेश
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होऊ नये याकरिता कर्जतच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी प्रतिबंधात्मक (कलम 144) आदेश जारी केले आहेत. कर्जत उपविभागात येणार्या कर्जत आणि खालापूर तालुक्यातील एकूण 23 ठिकाणी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश 9 जून ते 8 ऑगस्टपर्यंत …
Read More »रायगडमधील कोरोना रुग्णवाढीला जबाबदार कोण?
राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर सध्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक आहे. 1 ते 6 जून या आठवड्यात जिल्ह्याचा कोरोना संक्रमण दर सध्या 13.14 टक्क्यांवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 36 हजार 69 जणांना कोरोनाची बाधा झाली. एक लाख 26 हजार 416 जण बरे झाले. तीन हजार 267 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच कोरोनामुळे …
Read More »थोडीतरी जाणीव ठेवा
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे आदरणीय नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी भूमिपुत्रांमध्ये जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी, डोंबिवली आदी विविध ठिकाणच्या नागरिकांनी, ग्रामस्थांनी, आगरी-कोळी बांधवांनी गुरुवारी मानवी साखळी आंदोलन केले. नियोजित विमानतळाला दि. बा. पाटील यांचे …
Read More »राज्य उत्पादन शुल्क विभागाची रावे येथे धडक कारवाई; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
पेण : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (दि. 8) पेण तालुक्यातील रावे येथे छापा टाकून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे, उपअधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड विभागाचे निरीक्षक आनंद पवार व त्यांच्या पथकातील दुय्यम निरीक्षक अकुंश बुरकुल, रमेश चाटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक …
Read More »मानवी साखळी आंदोलनात संदीप पाटील यांच्याकडून ‘दिबा स्पेशल मास्क’
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन केले आहे. राज्य सरकारला गर्भित इशारा देण्याच्या उद्देशाने मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होणार्या कार्यकर्त्यांना तोंडाला लावण्यासाठी माजी …
Read More »नगरसेविका वाघमारेंची तत्परता
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 17मध्ये नवीन पनवेल सेक्टर 12, 13, 17, व 18 येथे बुधवारी (दि. 9) झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचले होते. वार्यामुळे सेक्टर 13 येथे झाड कोसळले होते. याची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे तसेच अॅड. जितेंद्र वाघमारे यांनी तत्परता …
Read More »मुंबईत पाणी भरून दाखवलं; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा शिवसेनेला टोला; नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल
मुंबई ः प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली. मुंबई महापालिका आणि शिवसेनेने मुंबईत पाणी भरून दाखवलं, अशा शब्दांत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेला सणसणीत टोला लगावला आहे. मुंबईसह उपनगरात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येणार हे माहीत असूनही आणि हवामान विभागाने मुसळधार …
Read More »वर्षा पर्यटनासाठी निघालेल्या दुचाकीस्वारांवर पोलिसांची कारवाई
खोपोली : प्रतिनिधी पावसाळा सुरू होताच वर्षा सहलीसाठी निघालेल्या दुचाकीस्वार पर्यटकांवर खालापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोना संसर्ग लाटेचा प्रभाव काहीसा ओसरू लागल्यानंतर नागरिक बेफिकीर झाल्याचे दिसत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विनाकारण फिरणार्या दुचाकीस्वारांवर पोलीस दंडात्मक कारवाईदेखील करीत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने मुंबई, नवी मुंबईचे तरुण मोठ्या प्रमाणात खोपोली, …
Read More »ओबीसींचे आरक्षण रद्द केल्याविरोधात खोपोलीतून राज्य शासनाला निवेदन
खोपोली : प्रतिनिधी ओबीसी समाजाची जनगणना करून स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत द्यावे तसेच मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या निवेदनामधील मागण्या मंजूर कराव्यात अशा मागण्यांची दोन वेगवेगळी निवेदने खोपोली शहरातील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांच्या उपस्थितीत खालापूर तहसीलदार इरेश चपल्लवार यांना देण्यात आली. माजी नगरसेवक राजेंद्र फक्के, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper