Breaking News

महत्वाच्या बातम्या

पेणमधील खारभूमी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे

उधाणाच्या पाण्याने नारवेल ते बेनवले बंधारा वाहून जाण्याची भिती पेण : प्रतिनिधी जागतिक बँकेच्या सहकार्याने पेण तालुक्यातील नारवेल ते बेनवले या 17 किमी लांबीच्या बंधार्‍याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पावसाळ्यात उधाणाच्या पाण्याने हा बंधारा वाहून जाण्याची भिती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. …

Read More »

खालापुरातील शिवभोजन केंद्र चालकांची थाळी रिकामी

 पाच महिन्यांपासून मोबदला नाही खोपोली : प्रतिनिधी कोरोना काळात गरिबांच्या पोटाला आधार देणारी शिवभोजन थाळीचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र शिवभोजन केंद्र चालकांची अवस्था बिकट झाली आहे. खालापूर तालुक्यातील केंद्र चालकांना गेल्या चार ते पाच महिन्यापासून शासनाकडून मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र कसे चालू ठेवावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला …

Read More »

प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना विद्यावेतन मिळवून देणारे ‘दिबा’

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…वाशी गावकर्‍यांनी एकजुटीने सिडकोविरुद्ध जमीन बचाव आंदोलनाची यशस्वी सुरुवात केल्यानंतर इतर गावांतही शेतकरी, …

Read More »

महापौर आणि सभागृह नेत्यांकडून कोविड रुग्णालयांची पाहणी

पनवेल ः प्रतिनिधीकळंबोली येथील कोविड समर्पित रुग्णालय, एमजीएम रुग्णालय, तसेच भारतीय कपास निगमचे गोडाऊन येथे होणार्‍या प्रस्तावित जम्बो कोविड सेंटरला महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला.या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग ‘ब’ …

Read More »

नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

सर्वपक्षीय कृती समितीला नाना पटोले यांचे आश्वासन मुंबई/पनवेल ः प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. ओबीसी समाजासाठी त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. आमच्या पिढीचे ते आदर्श होते. त्यामुळे त्यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वपक्षीय कृती समितीची त्यांच्याशी भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न …

Read More »

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत चिंध्रण येथे बुधवारी गरजु नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्ष एकनाथ देशेकर, तालुका उपाध्यक्ष राम पाटील, चिंध्रणच्या सरपंच कमला देशेकर, तालुका कोषाध्यक्ष शिवाजी दुर्गे, मधु पाडेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान कडु, संतोष …

Read More »

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत तालुक्यातील बोर्ले येथे मंगळवारी गरजूंना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, ग्रुप ग्रामपंचायत कोनचे सरपंच निलेश म्हात्रे, तसेच नाना भागीत, घनश्याम पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

Read More »

पनवेल ः लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे कोप्रोली येथे मंगळवारी गरजू नागरिकांना जीवनावश्यक अन्नधान्य वाटप करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष संजय पाटील, कोप्रोलीचे माजी सरपंच रमेश पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, पनवेल ग्रामीण उद्योग आघाडी संयोजक …

Read More »

उरण महाविद्यालयात ऑनलाइन व्याख्यानमाला

उरण ः प्रतिनिधी कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या वतीने 24 व 25 मे रोजी ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पहिले व्याख्यान प्राध्यापिका डॉ. प्राजक्ती वाघ भोसले (मानसशास्त्र विभागप्रमुख, राजश्री शाहू महाविद्यालय, औरंगाबाद) यांचे कोविड-19च्या काळातील मानसिक आरोग्य या विषयावर झाले. त्यांनी जागृत मन, मनावर …

Read More »

खांदा कॉलनीत गौतम बुद्धांची जयंती उत्साहात

पनवेल : वार्ताहर खांदा कॉलनीतील बुद्धविहारात तथागत गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी सर्वप्रथम बौद्ध उपासिका सरला शरद जाधव यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच निर्मला तायडे यांच्या हस्ते तथागताला पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन चंद्रसेन …

Read More »