Breaking News

महत्वाच्या बातम्या

प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील बंदी उठवावी

मूर्तिकार संघटनेची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव कर्जत : प्रतिनिधी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्तींमुळे जास्त प्रमाणात जलप्रदूषण होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जन केल्यावर पाण्याच्या ’पीएच’ वर (हायड्रोजन आयोन कॉन्सेन्ट्रेशन दर्शविणारे परिणाम) कोणताही परिणाम होत नाही. पण शाडू मातीच्या मूर्तीमुळे पाण्यातील ’पीएच’ कमी होऊन ते पाण्याला अम्लीय (एसेटिक) …

Read More »

भारताविरुद्ध कसोटी मालिकेत आर्चर खेळण्याची शक्यता कमीच

लंडन ः वृत्तसंस्था भारताविरुद्ध होणार्‍या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. 4 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या या मालिकेतून इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर जवळजवळ बाहेर झाला आहे. भारत दौर्‍यावर असताना आर्चरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही दिवस मैदानाबाहेर होता, पण काऊंटी क्रिकेटमध्ये खेळताना त्याच्या दुखापतीने पुन्हा …

Read More »

युव्हेंटसने जिंकला इटालियन चषक

रोम ः वृत्तसंस्था युव्हेंटस संघाने अ‍ॅटलांटाचा 2-1 असा पराभव करीत इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. युव्हेंटसला या मोसमात चमकदार कामगिरी करता आली नसली तरी मोसमाअखेरीस त्यांनी सरशी साधली. युव्हेंटसचे हे इटालियन चषकाचे 14वे तर अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे पहिले जेतेपद ठरले. दुजान कुलुसेवस्की याने 31व्या मिनिटाला युव्हेंटसचे खाते खोलल्यानंतर …

Read More »

विश्वचषक मल्लखांब स्पर्धा पुढील वर्षी अमेरिकेत

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी होणारी दुसरी मल्लखांब विश्वचषक स्पर्धा एक वर्ष लांबणीवर ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा आता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत होणार आहे. मुंबईत 2019मध्ये झालेल्या मल्लखांबच्या पहिल्यावहिल्या विश्वचषकाला खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. यामध्ये भारताव्यतिरिक्त 15 देशांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या समारोपावेळी …

Read More »

आयपीएल पुन्हा होणार सुरू?

बीसीसीआयकडून इंग्लंड बोर्डाला पत्र नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (इसीबी) पत्र लिहिले असून आयपीएलसाठी वेळ मिळावा यासाठी कसोटी मालिका निर्धारित वेळेच्या एक आठवडा आधी खेळवली जावी, अशी विनंती केली आहे. …

Read More »

रंगांच्या दुनियेत हरवलेला कलाकार मदतीच्या प्रतीक्षेत

संधी तुमचे दार कधी ठोठावेल ते सांगता येत नाही. आलेल्या संधीचे सोने करणे की, माती करणे हे प्रत्येकाच्या हातात असते. ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्यातील कलागुण व्यक्त करण्याची संधीच लाभत नाही. पण गुणी कलाकार प्रतिकुल परिस्थितीतही आपल्या कलेची छाप पाडल्याशिवाय राहत नाही. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील एक …

Read More »

हॅम रेडिओ ऑपरेटर्सची मोलाची कामगिरी; तौक्ते चक्रीवादळात प्रशासनाला केले सहकार्य

अलिबाग : जिमाका तौक्ते चक्रीवादळाच्याकाळात क्षेत्रीय स्तरावरून महत्त्वाच्या माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी हॅम रेडिओ ऑपरेटर्सचे जिल्हा प्रशासनाला मोलाचे सहकार्य मिळाले. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उभारलेल्या वायरलेस यंत्रणेचे काम हॅम रेडिओ ऑपरेटर यांनी पाहिले व प्रशासनास मदत केली. 16 व 17 मे रोजी जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला, त्या …

Read More »

‘तौक्ते’मुळे आंबा बागायतदार हतबल; 1550 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पाली : रामप्रहर वृत्त तौक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील आंबा बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेला आंबा जमीनदोस्त झाला आहे. त्यात बागायतदरांचे करोडोंचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. प्राथमिक पाहणीनंतर तब्बल 1550 हेक्टरवरील आंबा बागांचे नुकसान झाले  असल्याची माहिती जिल्हा कृषी कार्यालयाने दिली आहे. मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे आंब्याची झाडे …

Read More »

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली पेणमध्ये नुकसानीची पाहणी

पेण : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि. 20) पेणमध्ये भेट देऊन तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी विनोबा भावे यांचे स्मारक असलेल्या गागोदे बुद्रुक या गावातील  नुकसानीचा आढावा घेतला व पाहणी केली. तसेच चक्रीवादामध्ये मयत झालेल्या रामा बाबू कातकरी या इसमाच्या पत्नीची भेट घेऊन …

Read More »

नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळवून द्या; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना, पोलादपूरमध्ये शासकीय अधिकार्यांसोबत चर्चा

पोलादपूर : प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळवून देण्याबाबतच्या सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि. 20) येथे संबंधीत अधिकार्‍यांना दिल्या. तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर कोकण दौर्‍यावर आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी पोलादपूर …

Read More »