अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो टाकण्याची धमकी देणार्या एका आरोपीला अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयाने दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. अहमर शराफतअली सिद्दीकी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो लखनऊ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. आरोपी अहमर सिद्दीकीने …
Read More »शेतकरी-शास्त्रज्ञ एकता चळवळ बळकटीकरणाचा निर्धार
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शेतकर्यांच्या अनेक समस्या आहेत, पण त्यांना कोणी वाली नाही. त्यामुळे आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपणच पुढाकार घेण्याची, संघटित होण्याची व शेतकर्यांचा दबावगट निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष वि. रा. देशमुख यांनी येथे केले. कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या वतीने स्थापन झालेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ …
Read More »राज्यात ‘हिवसाळा’
राज्यात ऐन डिसेंबर महिन्यात जलधारा बरसत आहेत. रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण असा विचित्र अनुभव सध्या लोक घेत आहेत. ज्या ऋतूमध्ये गुलाबी थंडी पडते, दाट धुके असते; त्याच हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे डोक्यावर छत्री धरण्याची वेळ आली आहे. वातावरणातील या बदलाचा सर्वाधिक फटका अन्नदाता शेतकरीवर्गाला बसतोय. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात …
Read More »उरण केगावातील तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश
उरण : वार्ताहर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन उरण तालुक्यातील केगाव गावातील अनेक तरुणांनी तसेच केगाव ग्रामपंचायतमधील माजी उपसरपंच विलास काठे, अरविंद पवार यांनी रविवारी (दि. 13) उरण भाजप कार्यालयात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थित …
Read More »महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवहेलना
कृषी कायद्यांचा विरोध करताना भारताविरोधात घोषणाबाजी वॉशिंग्टन डीसी ः वृत्तसंस्था भारतातील सुधारित कृषी कायद्यांना विरोध करणार्या शेतकर्यांच्या समर्थनार्थ भारतीय-अमेरिकन शिख युवकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रदर्शन केले. या वेळी तेथील महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवमानना झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी खलिस्तानी झेंडे सापडले असून, वॉशिंग्टनच्या भारतीय दूतावासासमोरच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. …
Read More »मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही -कोळसे पाटील
नागोठणे : प्रतिनिधी सत्याग्रह कसा असतो व तो कसा करायचा असतो, हे येथील जनतेला शिकवून दिले आहे. 36 वर्षांपूर्वी सरकारी कंपनीशी केलेला करार आता रिलायन्सला सुद्धा लागूच होत असून कोणताही पंगा न घेता तसेच कंपनी बंद न पाडता आंदोलन चालूच राहणार आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी स्पष्टोक्ती …
Read More »चणेरे ग्रामस्थ जनहित याचिका दाखल करणार
एकात्मिक नवनगर वसाहत रद्द प्रकरण पनवेल : प्रतिनिधी मुंबई आणि नवी मुंबई वरील ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात सिडकोच्या माध्यमातून एकात्मिक नवनगर वसाहत उभारण्यात येण्याची युती शासनाची अधिसूचना ऑक्टोबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्याने रायगड जिल्ह्यातील 40 गावांच्या विकासावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याविरोधात चणेरे ग्रामस्थ सेवा मंडळ …
Read More »मराठा आंदोलकांची पोलिसांकडून नाकाबंदी
रसायनी : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 14) मराठा समाज बांधव व भगिनी मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येऊन आरक्षणासाठी पुढील दिशा ठरविणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून मराठा समाज आंदोलकांची नाकाबंदी करण्यात येत आहे. रविवारी (दि. 13) विविध मार्गांवर पोलीस प्रत्येक गाडीची पाहणी करताना दिसून आले. दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या मदतीने …
Read More »‘…तर जानेवारीपासून भारतात लशीकरण’
मुंबई ः प्रतिनिधीकोरोनावरील कोविशिल्ड लस तयार करणार्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी कोरोना लशीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने लशीला मान्यता दिली, तर भारतात जानेवारीपासून लशीकरणाला सुरुवात होऊ शकते, असे पुनावाला यांनी म्हटले आहे.इकॉनॉमिक्स टाइम्स ग्लोबल बिझनेस समीटमध्ये बोलताना अदर पुनावाला म्हणाले की, या महिन्याच्या …
Read More »मुली स्वतःहून संबंध ठेवतात आणि ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात
महिला आयोगाच्या अध्यक्षांचे विधान रायपूर ः वृत्तसंस्थामुली, महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्काराच्या तक्रारी करतात, असे बेधडकवक्तव्य छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष किरणमयी नायक यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper