Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलला मिळणार अखंडित वीजपुरवठा; 480 कोटी रुपयांचा निधी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागास अखंडित वीजपुरवठा करण्याकरिता विविध योजनांतर्गत यापूर्वी अंदाजे 254 कोटी 11 लाख खर्च करण्यात आले असून उर्वरित 480.40 कोटी रुपयांची कामे सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या (आरडीएसएस) अंतर्गत प्रस्तावित केलेली आहेत, असे लेखी उत्तर …

Read More »

मुंबई ऊर्जा प्रकल्प : शेतकर्‍यांचे समाधान झाल्यानंतरच काम करा! -मंत्री उदय सामंत

आमदार प्रशांत ठाकूर यांची शिष्टाई कामी! शनिवारी पाहणी व चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सर्वेक्षण, प्रकल्पबाधितांशी चर्चा आणि त्यांचे समाधान झाल्यावरच या प्रकल्पाचे काम सुरू करावे, असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी व मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या …

Read More »

दरोड्याच्या तयारीत असलेल्या परप्रांतीय टोळीला खोपोलीत अटक

खोपोली : प्रतिनिधी प्राणघातक हत्यारे घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने गुरुवारी (दि.14) पहाटेच्या सुमारास खोपोलीत जेरबंद केले. आठ दरोडेखोरांपैकी सहा जणांना पकडण्यात आले असून दोघे जण फरार झाले आहेत. खोपोली हद्दीत विहारी येथील बंद असलेल्या इंडिया स्टील कारखान्याच्या संरक्षक भिंतीजवळ दरोडेखोर दबा धरून …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डोंबिवलीत आगरी महोत्सवाचे उद्घाटन

डोंबिवली : रामप्रहर वृत्त सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे लोकमान्यतेस पात्र ठरलेल्या आगरी युथ फोरम या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित 19व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.13) झाले. सन 2004पासून अखिल भारतीय आगरी महोत्सव या समाज सोहळ्याच्या आयोजनास सुरुवात केलेली …

Read More »

संसद सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

देशाच्या संसदेवर 2001 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बुधवारी 13 डिसेंबर रोजी 22 वर्षे पूर्ण होत असतानाच सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे वेळी दोन तरुणांनी लोकसभेच्या गॅलरीतून खाली उडी मारून सभागृहात पिवळ्या धुराचे लोट पसरवले तर अन्य दोघांनी संसदेबाहेर गोंधळ माजवला. या घटनेमुळे नव्या संसदेच्या सुरक्षेविषयी मोठी चिंता निर्माण झाली आहे. …

Read More »

हेटवणे धरण सुधारित योजनेला मान्यता मिळावी

आमदार रविशेठ पाटील यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्रान्वये केली. पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रगतिपथावर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पत्रकार दिनानिमित्त पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड सोहळा पनवेल : रामप्रहर वृत्त पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 7 जानेवारी रोजी पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. या वेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध …

Read More »

कुडाळच्या ‘ढिंग टँग ढिटँग’ एकांकिकेने पटकाविला राज्यस्तरीय अटल करंडक

गौरव रंगभूमी पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांचा सन्मान पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत कुडाळच्या ढ …

Read More »

भाजप शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी; ‘नैना’संदर्भात 23 डिसेंबरला पनवेलमध्ये सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष हा भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आहे. त्यांना वार्‍यावर सोडणार नाही. विकासाला विरोध करणार्‍यांनी राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना नैना प्राधिकरणाविरोधात उपोषणे, आंदोलने केली नाहीत. आता मात्र लोकांना भ्रमित करण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे. आम्हाला जनतेचा विकास हवा आहे. त्याचवेळी …

Read More »

गाना, बजाना, नाचना… पब्लिकची एन्जॉयमेंट

आपण स्वतः घेतलेला अनुभव मनात कायमच घर करून राहतो… मी शालेय वयात दक्षिण मुंबईतील अप्सरा थिएटरमध्ये आमच्या गल्लीतील सवंगड्यांसोबत धर्मा (रिलीज 30 नोव्हेंबर 1973) हा मसालेदार मनोरंजक डाकूपट एन्जॉय करायला गेलो असतानाचा हा भन्नाट अनुभव. त्या काळात असे ढिश्यॅव दिश्यॅव दे मार मारधाड पिक्चर्स म्हणजे ’तिकिटाचा पैसा वसूल’. अशातच पडद्यावर …

Read More »