Breaking News

महत्वाच्या बातम्या

चक्रीवादळात नुकसान झालेल्या साई विद्यालयास आर्थिक मदत

माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिरचे 3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शाळेला पूर्वपदावर आणण्यासाठी समाजसेवक कृष्णाजी महाडिक यांनी मुंबईतील सुमन रमेश तुलसी चरिटेबल ट्रस्टकडून एक लाख 65 हजार रुपये मिळवून दिले. या निधीतून विद्यालयाची दुरुस्ती करण्यात …

Read More »

माथेरानमध्ये महावितरणवर धडक

कर्जत : बातमीदार – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून माथेरानमध्ये महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. मीटर बंद असूनही रिडींग दाखवून बिल देणे, बिल भरलेले असूनही मागील महिन्यांची शिल्लक बिलात अधिक येणे, तक्रारींचे निवारण न होणे, वीज बिल भरणा कर्मचारी उपस्थित नसणे यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण …

Read More »

सुसह्य उन्हाळ्यासाठी आतापासूनच जलनियोजन आवश्यक

पोलादपूर : प्रतिनिधी – पावसाचे हस्त नक्षत्र शिल्लक असताना पोलादपूर तालुक्याने यंदा सरासरीच्या 98.54 टक्के सरासरी गाठली. दरवर्षी समाधानकारक पाऊस पडत असताना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. ती दूर करण्यासाठी आतापासूनच व्यापक प्रयत्न सुरू करण्याची गरज आहे. पोलादपूर तालुक्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान 3680 मिलीमीटर असून, दरवर्षीच्या सरासरीच्या 98.54 टक्के सरासरी गाठली आहे. यंदा …

Read More »

रोह्यात कोरोना रिपोर्टचा सावळागोंधळ

नागोठणे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात संशयित कोरोना रुग्णांचे अहवाल येण्यास बराच कालावधी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या तालुक्यातच कोरोना रिपोर्टचा सावळागोंधळ असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी रोहा उपजिल्हा रुग्णालयातील 2 सप्टेंबरपासूनचे रुग्णांचे तपासणी अहवाल चार दिवस होऊनही प्राप्त झाले …

Read More »

पनवेल तालुक्यात 279 जण पॉझिटिव्ह

दोघांचा मृत्यू; 137 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 7) कोरोनाचे 279 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 199 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 107 …

Read More »

महामारी संपलेली नाही

अनलॉक ही देशाची आर्थिक अपरिहार्यता होती आणि आहे. लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला इतका जबर फटका बसला आहे की अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी अनलॉक आणि अनेक विशेष मदत योजनांची गरज आहेच. पण याचा अर्थ जर कुणी कोरोना महामारी संपुष्टात आली असा घेत असेल तर ते भीषण महासंकटाला आमंत्रण देणारे ठरू शकेल. कोरोनामुळे जगभरात …

Read More »

एक्सप्रेस वेवर तीन अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

खोपोली : प्रतिनिधी – मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रविवारी रात्री आठ ते बारा वाजण्याच्या दरम्यान खंडाळा घाट ते भाताण बोगदा या अंतरात तीन वेगवेगळे अपघात घडले. यात एकूण पाच जण किरकोळ तर एक जण गंभीर जखमी आहेत. तातडीने मदत मिळाल्याने जिवीत हानी झाली नाही. पहिला अपघात रविवारी संध्याकाळी आडोशी उतारावरील …

Read More »

वाढीव वीज बिलांविरोधात भाजपचे रायगड जिल्ह्यात आंदोलन

पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले असताना निसर्ग वादळाने नुकसानग्रस्त केले आहे, अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने अवास्तव विजबिले आकारणी करून ग्रामीण जनतेला पूर्णपणे नाडण्यास सुरूवात केली आहे. म्हणून पूर्ण विजबिले माफी करण्याची जोरदार मागणी करीत पोलादपूर तालुका आणि शहर भारतीय जनता …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला

ऑइल पसरून वाहतूक ठप्प खोपोली, खालापूर : प्रतिनिधी – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर उलटून आतील ऑइल रस्त्यावर पसरल्याची घटना सोमवारी (दि. 7) दुपारी घडली. अपघाताची शक्यता व दुर्घटना रोखण्यासाठी तसेच सांडलेले ऑइल भरून माती टाकण्यासाठी आयआरबी व वाहतूक पोलिसांनी मुंबईकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी बंद …

Read More »

रायगडात 531 नवे पॉझिटिव्ह; सहा रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस कोरोना रुग्णांचे नवे उच्चांक प्रस्थापित झाल्यानंतर सोमवारी (दि. 7) काहीसा दिलासा मिळून 531 नव्या कोरोना रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे दिवसभरात 408 जण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 279, अलिबाग 101, पेण 47, खालापूर 25, रोहा 18, …

Read More »