Breaking News

महत्वाच्या बातम्या

देशात कोरोना रुग्णांचा विक्रम

24 तासांत आढळले 96 हजारांहून अधिक रुग्ण नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत देश नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. शुक्रवारी (दि. 11) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये देशात 96 हजार 457 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 1357 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. …

Read More »

नवे शैक्षणिक धोरण भारताला नवी दिशा देणारे : मोदी

नवी दिल्ली  : वृत्तसंस्थानवे शैक्षणिक धोरण 21व्या शतकातील भारताला नवी दिशा देणारे ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत 21व्या शतकातील शालेय शिक्षण या विषयावरील एका संमेलनात ते सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण हे …

Read More »

कामोठे : भाजप युवा नेते व प्रसिद्ध व्यावसायिक हॅपी सिंग यांच्या क्राऊन बिल्डकॉन एल.एल.पी. च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी हॅपी सिंग यांना  शुभेच्छा दिल्या. सोबत भाजयुमो प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांत कदम आणि निलेश वाडेकर.

Read More »

ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांना श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्त माथेरानचे ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना कर्जत येथून नवी मुंबई येथे रुग्णवाहिकेत नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पवार यांच्या अचानक मृत्यूने ने रायगड जिल्ह्याच्या पत्रकारीतेवर शोककळा पसरली आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचातर्फे शुक्रवारी (दि. 11) त्यांना …

Read More »

चिरनेरच्या जंगलात होतेय गुरांची कत्तल

चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यात गुरे चोरणार्‍या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. शेतकर्‍यांच्या पशुधनाची हे कसाई बिनधास्त कत्तल करीत असल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. जंगलात चरायला गेलेली जनावरे रात्री फासगीत अडकवून रातोरात त्याची कत्तल करून त्यांची चोरटी वाहतूक हे कसाई करीत असून त्यांना कोणाचे ना भय ना भीती राहिली आहे. …

Read More »

पनवेल मनपा उचलणार ‘त्यांच्या’अंत्यविधीचा खर्च

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाने मृत्युमुखी पावलेल्या मृताच्या नातेवाइकांकडे पैसे नसल्याने तसेच अनेक वेळा अंत्यविधीला कोणीच उपस्थित राहत नसल्याचे पाहावयास मिळत असल्याने पालिका प्रशासनाने याबाबत स्वखर्चाने कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या अंत्यविधीचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 14 हजारांचा टप्पा …

Read More »

कोरोनाबाधित क्षेत्रात आता पोलीस बंदोबस्त; नवी मुंबई मनपाचा कंटेन्मेंट झोनसाठी निर्णय

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असलेल्या 30 ठिकाणांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे, परंतु या भागात राहणार्‍या नागरिकांकडून नियमावलीचे पालन केले जात नव्हते. आता या भागात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत पोलिसांची मदत घेतली …

Read More »

उतावीळ निष्कर्ष नकोत

ऑक्सफर्ड विद्यापीठ, अ‍ॅस्ट्राझेनेका ही औषध कंपनी तसेच भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नांतून निर्माण केल्या जाणार्‍या कोरोनावरील लशीच्या अखेरच्या टप्प्यातील मानवी चाचण्या बुधवारी जगभरात थांबवण्यात आल्या. भारतातही औषध महानियंत्रकांनी बजावलेल्या नोटिशीनंतर गुरूवारी संबंधित चाचण्या थांबवण्याचा निर्णय सिरम इन्स्टिट्यूटने घेतला. परंतु चाचण्या थांबवण्याच्या या घडामोडीकडे आताच मोठा अडथळा म्हणून …

Read More »

पेणमध्ये कृषी कार्यानुभव कार्यक्रम

पेण : प्रतिनिधी – डॉ. बाळासाहेब सावत कोकण कृषि विद्यापीठ दापोली सलग्न कृषि महाविद्यालय आचळोली महाड यांच्या वतीने पेण तालुक्यातील मळेघर येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2020- 21 चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थिनी जयश्री संजय गुठळे हिने शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.  या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमात मळेघर गावातील …

Read More »

राज्यपालांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान

मुंबई : प्रतिनिधी – कोरोना योद्धे म्हणून समाजाच्या विविध घटकांमध्ये काम करणार्‍या डॉक्टर, पोलीस, स्वयंसेवी संस्था, स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी, सफाई कामगार, वैद्यकीय सेवा देणारी सेवक अशांचा सन्मान स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 10) राजभवनात सन्मान करण्यात आला. भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष …

Read More »