सांगली : प्रतिनिधी शासकीय, वैद्यकीय क्षेत्रासह आता राजकीय क्षेत्रालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सांगली जिल्ह्यातील सात आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार असे डझनभर नेते कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, विक्रम सावंत, मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले …
Read More »वीज बिलमाफीसाठी भाजप आक्रमक; मुरूडमध्ये आज बिल दहन आंदोलन
मुरूड : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे जनता त्रस्त असून, दोन महिने काही ठिकाणी विद्युतपुरवठा सुरळीत नसतानाही महावितरणने वाढीव वीज बिले आकारली आहेत. राज्य सरकारच्या या अनागोंदी कारभाराविरोधात आणि वीज बिले पूर्णपणे माफ करण्यात यावीत, या मागणीसाठी मुरूडमध्ये सोमवारी (दि. 7) वीज बिल दहन आंदोलन करण्यात येणार आहे. …
Read More »कोरोना रुग्णांमध्ये भारत दुसर्या स्थानी; ब्राझीलला टाकले मागे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेत नाही. देशात कोविड-19 विषाणूने 41 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत, तर आजवर 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच भारत जगात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर पोहचला आहे. यामध्ये भारताने आता ब्राझिलला मागे टाकले …
Read More »शिक्षकांसाठी ऑनलाइन पुरस्कार सोहळा
पनवेल : प्रतिनिधी शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शैक्षणिक समूहाच्या, नवीन पनवेल येथील श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेजमधील इंग्रजी माध्यमाच्या व विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांसाठी आदर्श विद्यारत्न पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. 5) ऑनलाइन झाला. या कार्यक्रमामध्ये आरती वर्मा यांना या वर्षीच्या माहेर पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »काँग्रेसमध्ये फुटला आणखी एक ‘लेटर बॉम्ब’
लखनऊ ः काँग्रेसमधील कलह लवकर संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या ’लेटर बॉम्ब’नंतर आता आणखी एक ’लेटर बॉम्ब’ फुटला आहे. या वेळी तो उत्तर प्रदेशचा आहे. गेल्या वर्षी पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेल्या काँग्रेसच्या नऊ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. काँग्रेस पक्षाला इतिहासजमा …
Read More »विद्यार्थ्यांनी केला ऑनलाइन टीचर्स डे उत्साहात साजरा
उरण : वार्ताहर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण ह्यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस ’टीचर्स डे’म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी शाळा कॉलेजांमध्ये मोठ्या वर्गातील विद्यार्थी हे छोट्या वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन शिकवित असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण येथील यूईस स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या दहावी अणि बारावीच्या वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, दहावीच्या विध्यार्थ्यांनी इयत्ता …
Read More »गौरा गणपतीला भावपूर्ण वातावरणात निरोप
उरण : वार्ताहर साखरचौथनिमित्त गौरा गणपतीचे शनिवारी आगमन झालेले असून दिड दिवसांच्या गणपतींना भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हददीतील दांडा येथील नवयुग क्रीडा मंडळ दांडा सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी आपल्या मंडळाची गणेशमूर्ती दांडा समुद्र किनारी विसर्जन केली. विसर्जन करताना सोशल डिस्टन्सिंग पळण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडला …
Read More »पनवेल तालुक्यात आढळले 398 नवे रुग्ण
तिघांचा मृत्यू; 250 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 6) कोरोनाचे 398 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 250 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 292 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 180 रुग्ण …
Read More »जासई विद्यालयात शिक्षक दिन साजरा
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज या शिक्षण संकुलात शिक्षक दिन उत्साहात व सोशल डिस्टन्सिंग पाळून साजरा करण्यात आला. प्रास्ताविक रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नूरा शेख यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण …
Read More »भाजपतर्फे ऑनलाइन शिक्षक कृतज्ञता सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्त दरवर्षी शिक्षक दिन शाळेत साजरा करण्यात येतो परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पध्दतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरूच आहे. कोरोना काळातदेखील शिक्षक कोविड योद्धा म्हणून कोविड सेंटर क्षेत्रीय अधिकारी, सर्वेक्षण, जनजागृती करीत आहेत. शिक्षकांच्या या कार्याचा सन्मान व्हावा या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper