वन जमिनीतून जागा देण्याची मागणी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या 12 आदिवासी वाड्या या रस्ता आणि काही वाड्या विजेपासून वंचित आहेत. येथील आजारी रुग्णाला आजही डोली करून आणावे लागत आहे. दरम्यान, आदिवासी संघटना या प्रश्नी आक्रमक झाल्या असून, त्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. कर्जत हा आदिवासीबहुल …
Read More »पनवेलमध्ये 263 नवे पॉझिटिव्ह
पाच जणांचा मृत्यू; 274 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 27) कोरोनाचे 263 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 274 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 192 रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला, तर 198 रुग्ण बरे झाले आहे. …
Read More »लसीच्या प्रयत्नांना वेग
जगभरातील सर्वच देशांचे लक्ष सध्या कोरोना विषाणूवरील लसीच्या उत्पादनाकडे लागले असून सर्वांना परवडणारी आणि दीर्घ काळ प्रभावी लस विकसित करण्यासाठी देशोदेशीचे शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. गुरूवारी जगभरातील आजवरच्या कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटी 40 लाखांवर गेली. जगभरात एव्हाना या विषाणूमुळे आठ लाख 22 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. …
Read More »कुष्ठरुग्ण बंधू-भगिनींना अन्नधान्याचे वाटप
पनवेल : गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 60 हजार कुटुंबांना अन्नधान्य देऊन त्यांचा गणेशोत्सव गोड केला जात आहे. या अंतर्गत …
Read More »पुण्यातील मानाच्या गणपतींचे यंदा उत्सव मंडपातच होणार विसर्जन
पुणे : प्रतिनिधी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या आणि इतर प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. आता गणरायाच्या मूर्तीचे विसर्जनदेखील सांगता मिरवणूक न होता उत्सव मंडपातच केले जाणार आहे, अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली. मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे …
Read More »मुंबईत इमारतीचा भाग कोसळला
मुंबई : प्रतिनिधी महाड येथील इमारत दुर्घटना ताजी असतानाच मुंबईतील नागपाडा परिसरात एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी घडली. या ढिगार्याखाली चार जण अडकल्याचे वृत्त असून बचावकार्य सुरू आहे.दक्षिण मुंबईतील नागपाड्यात असलेल्या शुक्लाजी मार्गावरील तीन मजली इमारतीचा भाग गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक कोसळला. कोसळलेल्या ढिगार्याखाली चार …
Read More »‘…तर मुंबईत लोकलसेवा पूर्ववत होईल’
मुंबई : लोकलसेवा नियमितपणे सुरू होण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या लाखो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मध्य रेल्वेने दिली आहे. लोकल कधी सुरू केली जाणार, या प्रश्नाचे उत्तर आताच मिळाले नसले तरी ते लवकरच मिळू शकते, असे संकेत मध्य रेल्वेकडून देण्यात आले आहेत. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी लोकल सुरू …
Read More »रायगडात एनडीआरएफची टीम कायम तैनात असावी; जिल्हा प्रशासनाचा राज्य शासनाला प्रस्ताव
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात निर्माण होणारी आपत्तीजनक स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात एनडीआरएफची टीम कायम तैनात असावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनासमोर ठेवला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. रायगडसह कोकणाला अनेकदा आपत्तीजनक स्थितीला सामोरे जावे लागते. 2005मधील अतिवृष्टीने दरडी कोसळून झालेली जीवितहानी व 2016मध्ये सावित्री पूल दुर्घटनेत …
Read More »गणेशोत्सवातून कोरोनासंदर्भात प्रबोधन; नागोठण्यातील श्री सन्मित्र मित्र मंडळाची जनजागृती
नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागोठणे येथील श्री सन्मित्र मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात कोविड-19 प्रतिबंधक फलक लावून जनजागृती केली आहे. या मंडळाचे यंदाचे 47वे वर्ष असून, तीन वर्षांनंतर सुवर्ण महोत्सव आगळावेगळा व्हावा या दृष्टीने मंडळाचे सर्वच सदस्य आतापासूनच कामाला लागले आहेत. नागोठणे येथील श्री सन्मित्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची …
Read More »रायगडात 454 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 13 रुग्णांचा मृत्यू
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 27) 454 नव्या कोरोना रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे 441 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 263, पेण 36, अलिबाग 33, खालापूर 29, माणगाव 26, रोहा व महाड प्रत्येकी 16, उरण 14, कर्जत 10, पोलादपूर चार, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper