Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल तालुक्यात 154 नवे कोरोनाग्रस्त

पाच जणांचा मृत्यू; 250 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 31) कोरोनाचे 154 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 250 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत  दिवसभरात 121 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 210 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …

Read More »

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना डेडलाइन; 14 दिवस व्हावे लागणार होम क्वारंटाइन

अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणांहून रायगड जिल्ह्यात येणार्‍या चाकरमान्यांना 7 ऑगस्टपूर्वी जिल्ह्यात दाखल व्हावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना पुढचे 14 दिवस होमक्वारंटाइन रहावे लागणार आहे. या संदर्भात रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी परिपत्रक जारी केले आहे.  रायगड जिल्ह्यात 15 हजारांच्या आसपास नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यासह राज्यात …

Read More »

लॉकडाऊन काळात तरुणांनी फुलविला भाजीचा मळा

माणगाव : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे शहरातून गावाकडे आलेले चाकरमानी तरुण शेतीमध्ये विविध प्रयोग करून भाजीपाला पिकवत आहेत. शहरात नोकरी-व्यवसाय गमावलेले तरुण गावी शेतीकडे वळत असल्याने भविष्यात शेतीला चांगले दिवस येतील, असे बोलले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या शहरातून अनेक चाकरमानी नोकरी, व्यवसाय …

Read More »

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मरणोत्तर ’भारतरत्न’ने सन्मान करावा; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाप्रती दिलेले समर्पित योगदान लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या …

Read More »

सॅनिटायझर प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू

तेलंगणा : वृत्तसंस्था मद्य मिळत नसल्याने सॅनिटायझर प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. यातील तिघांचा गुरुवारी, तर इतर सहा जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मद्याची दुकाने बंद असल्याने संबंधित व्यक्तींनी सॅनिटायझर पिण्यास सुरुवात केली होती. मृतांमधील तिघे भिकारी आहेत. अशा प्रकारे किती घटना घडल्या आहेत त्याचा …

Read More »

महाडमध्ये जिल्हा परिषद सदस्यावर प्राणघातक हल्ला; 34 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

महाड : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शिवसेनेचे खाडी विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते जितेंद्र सावंत यांच्यावर गुरुवारी (दि. 31) रात्री 10.30च्या सुमारास गावातीलच एका गटाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सावंत जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी हल्लेखोरांच्या विरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी कोकरे गावातील 34 …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि सिडको यांच्यात बैठक; विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि सिडको व्यवस्थापन यांच्यात शुक्रवारी (दि. 31) सिडको भवनात बैठक झाली. या वेळी सिडको संपादित जी प्रकल्पग्रस्त गावे आहेत त्यांना रस्ते, गटारे, समाजमंदिर, मैदान, जलकुंभ, जिम, हॉस्पिटल, शाळा यांसारख्या नागरी सोयीसुविधा तातडीने पुरवाव्यात, असे संघर्ष समितीकडून सिडको …

Read More »

कोरोना बळींच्या संख्येत भारत जगात पाचव्या स्थानी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोनाचे थैमान कायम आहे. मागील काही दिवसांपासून दररोज 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे, तर दुसरीकडे कोरोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (दि. 31) …

Read More »

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे दाखवले जाते, पण एकमेकांशी सुसंवाद नसलेले हे सरकार म्हणजे कुटुंब नसून लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, मी इतिहासाचा अभ्यासक आहे. अशा प्रकारचे …

Read More »

महिलांसाठी विशेष बस-रेल्वेची सुविधा द्यावी

आमदार मंदा म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नवी मुंबई ः बातमीदार कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना याचा सर्वाधिक फटका नोकरदार महिलावर्गाला बसला आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेली चार महिने कार्यालये बंद असल्याने सक्तीच्या रजेवर असलेल्या नोकरदार महिलांना नवी मुंबई ते मुंबई अशा प्रवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. …

Read More »