Breaking News

महत्वाच्या बातम्या

लॉकडाऊनमध्ये खेळाडूंना सरावाकरिता परवानगी द्यावी; राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक शिवाजी ढवळे यांची मागणी

नवी मुंबई ः बातमीदार संपूर्ण देशासह नवी मुंबईतही कोरोनाने थैमान घातले आहे. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांना कोरोनाने ग्रासले. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांसह देशाचे भवितव्य असणार्‍या खेळाडूंनाही बसला आहे. लॉकडाऊनमुळे  घराबाहेर पडणे कठीण झाल्याने खेळाडूंना सराव करता येत नाही. परिणामी खेळाडूंतील सरावाची वृत्ती व प्रतिकारशक्ती कमी होत …

Read More »

तोडक कारवाईच्या नोटिसा मागे न घेतल्यास आंदोलन! आमदार मंदा म्हात्रे यांचा सिडकोला इशारा

नवी मुंबई ः प्रतिनिधी सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग अस्वस्थ असताना सिडको प्रशासनाकडून नवी मुंबईमधील गावठाण क्षेत्रातील घरांना तोडक कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी तोडक कारवाईही सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाईच्या नोटिसा तत्काळ मागे घेण्यात याव्यात याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव …

Read More »

नमुंपाचे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर लागले कामाला; कोरोनाचा भस्मासूर रोखण्याचे आव्हान

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली होऊन नवे आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेचा कार्यभार स्वीकारला. नवी मुंबईत कोरोनाने आपला डंख बाहेर काढला असताना राजकीय घडामोडींना वेग आल्याचे बांगर यांच्या नियुक्तीवरून दिसून आले आहे. मुख्य म्हणजे चार्ज घेतल्यावर नवनियुक्त आयुक्त बांगर यांनी तातडीने अधिकार्‍यांची बैठक …

Read More »

मोरा सागरी पोलीस ठाण्याकडून नाकाबंदी

उरण ः वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण तालुक्यात 13 ते 16 जुलै या कालावधीत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरण मोरा येथील हनुमान कोळीवाडा येथे मंगळवारी (दि. 14) कडक नाकाबंदी करण्यात आली. यात बाइकवर डबल सीट जाणे, हेल्मेटचा वापर न करणे, लायसन्स नसणे त्याचप्रमाणे …

Read More »

आत्महत्येप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरात राहणार्‍या राजेश मालपाणी यांनी मागील महिन्यात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी आत्महत्येस जबाबदार असलेल्या कर्ज घेणार्‍या व देणार्‍या अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राजेश बाबूलाल मालपाणी (46) हे पनवेलमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते. नवीन पनवेल …

Read More »

ओबीसींच्या शिक्षणासाठी महाज्योती योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी

पनवेल ः प्रतिनिधी बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर आधारित भटक्या विमुक्त आणि ओबीसी समाजाच्या शिक्षणासाठी जाहीर झालेली महाज्योती योजना तत्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष बबन बारगजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. भटका-विमुक्त समाज हा वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेला समाज आहे. …

Read More »

सिडकोच्या उद्यानाला डबक्याचे स्वरूप; कळंबोलीतील रहिवाशांमध्ये संताप

पनवेल ः वार्ताहर कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 4मध्ये असणार्‍या सिडकोच्या उद्यानाला कोणी वाली नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक व बच्चेकंपनीसाठी असणार्‍या उद्यानात चक्क वाहने उभी केली जात असून उद्यानाची दुरवस्था झाली आहे. याबाबत लेखी तक्रार दाखल करूनही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. उद्यानात केलेल्या चुकीच्या बांधकामामुळे पावसाळ्यात …

Read More »

वावळोली आश्रमशाळेतील साहित्य झाले खराब

पाली : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्यामध्ये जीवित हानी तसेच कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली. घरे, शाळा, वाडे, झाडे जमीनदोस्त झाली. यात सुधागड तालुक्यातील वावळोली आश्रमशाळेचेदेखील मोठे नुकसान झाले. येथील तब्बल 560 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासह दैनंदिन वापरातील वस्तू भिजून पूर्णपणे खराब झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व साहित्य व वस्तूंची आता …

Read More »

लॉकडाऊनच्या घोषणेने बाजारात गर्दी; नियमांची पायमल्ली

नागोठणे : प्रतिनिधी – 15 जुलै म्हणजेच बुधवार सकाळपासून लॉकडाऊन होत आहे या गैरसमजातून नागोठणे येथील बाजारपेठेत मंगळवारी (दि. 14) ग्राहकांची झुंबड उडाली असल्याचे चित्र दिसून आले. खरेदीसाठी प्रत्येक दुकानांसमोर प्रचंड अशी गर्दी जमत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचेसुद्धा या निमित्ताने तीन तेरा वाजले. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. …

Read More »

कर्जतमध्ये एकच व्हेंटिलेटर

शासनाच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची होतेय गैरसोय कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशेचा आकडा गाठायला गेली आहे.अशा परिस्थितीत येथील एकमेव कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांना तेथे पोहोचल्यानंतर अन्यत्र हलवण्याची सूचना केली जात आहे. दरम्यान, एकमेव व्हेंटिलेटर असलेल्या रायगड हॉस्पिटलमधील शासनाच्या कोविड केअर सेंटरमध्येही …

Read More »