सुरक्षित लस शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश आले असून सर्व उमेदवारांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती उत्तमरीत्या काम करीत असल्याचा दावा रशियाने मंगळवारी करताच पाठोपाठच डोनाल्ड ट्रम्प यांनीही लशीसंबंधी मोठी बातमी असे ट्वीट केले. अवघ्या मानव जमातीचे जिणे मुश्कील करणार्या कोरोना विषाणूवर लवकरात लवकर सुरक्षित लस यावी असे आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत आहे, परंतु मानवी आरोग्यापलीकडच्या …
Read More »पोलीस भरतीविषयक ऑनलाइन मार्गदर्शन
अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्रात लवकरच मोठी पोलीस भरती होणार असून, या भरती प्रक्रियेविषयक मार्गदर्शन व्हावे, प्रत्येक बारकावे समजून घ्यावेत यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच पोलीस भरती ऑनलाइन (फेसबुक लाइव्ह) मार्गदर्शनपर संवाद कार्यक्रम होणार असून, या …
Read More »आवास भगतआळीत खारफुटीची कत्तल
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील आवास भगतआळीमध्ये खारफुटीची कत्तल होत आहे, तसेच खाडीकिनारी बेकायदा भराव केला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेकायदा भराव करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भगतआळीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. आवास ग्रामपंचायतीच्या हद्दीत भगतआळी येथे खारफुटीची कत्तल तसेच भरावदेखील केला जात आहे. ही जागा हडप करण्याचा प्रयत्न …
Read More »खारआंबोली धरण ओसंडून वाहू लागले
मुरूड ः मुरूडजवळील खारआंबोली धरण ओसंडून वाहू लागले आहे, मात्र लॉकडाऊनमुळे पर्यटकांना धबधब्याचा आनंद घेता येणार नाही. (छाया ः सुधीर नाझरे)
Read More »गतिमंद बालिकेच्या पालकांचा शोध सुरू
कर्जत ः बातमीदार अंदाजे 16 ते 18 दरम्यान वय असलेली एक गतिमंद-मतिमंद बालिका मौजे चारफाटा, कर्जत येथे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल भालीवले यांना 28 जून रोजी आढळली आहे. या बालिकेबाबत सर्व ठिकाणी विचारपूस केली असता ती कोणाच्याही ओळखीची नसल्याचे आढळून आले. याबाबत स्वप्नील भालीवले यांनी कर्जत पोलीस ठाणे यांना कळविले असून …
Read More »उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजांस तूर्तास स्थगिती
अलिबाग ः जिमाका रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात 15 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा अध्यादेश बजावला आहे. त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे जनतेची गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने …
Read More »संधिवातापासून मिळवा सुटका
आरोग्य प्रहर संधिवात कोणत्याही वयात होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात प्रामुख्याने गुडघेदुखीची मोठी समस्या आहे. या आजारातून सुटका करून घ्यायची असेल तर काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. संधिवात झाला तर हाडे कमजोर होऊन सांधेदुखीची समस्या डोके वर काढते. सांधा म्हणजे गुडघा. हासुद्धा तीन हाडे, गुडघ्यांची वाटी …
Read More »माणगाव तालुक्यात 19 कोरोनाबाधित
माणगाव ः प्रतिनिधी जगभरात हाहाकार माजवणार्या कोरोना महामारीने रायगड जिल्ह्यातही धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले असून जिल्हा प्रशासनाची धावाधाव झाली आहे. कोरोना महामारीने माणगाव तालुक्यात कहरच केला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या चांगली असली तरी तेवढ्याच प्रमाणात तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील जनतेची …
Read More »रोहा बाजारपेठ हाऊसफुल्ल
अत्यावश्यक वस्तूंसाठी नागरिकांची गर्दी रोहे ः प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे रायगड जिल्हा बंद राहणार असल्याने अत्यावश्यक साहित्यासह भाजीपाला, किराणा माल व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी बुधवारी (दि. 15) शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने रोहा बाजारपेठेत आल्याने रोहा बाजारपेठ नागरिकांनी हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. रोहा शहरासह ग्रामीण भागात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रोहा, …
Read More »रायगडात 290 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; तीन जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 290 नव्या रुग्णांची मंगळवारी (दि. 14) नोंद झाली असून, पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 216 (महापालिका हद्दीतील 175, ग्रामीणमधील 41), अलिबाग 23, खालापूर 15, रोहा 11, उरण नऊ, कर्जत व म्हसळा प्रत्येकी पाच, पेण तीन, महाड दोन आणि श्रीवर्धन तालुक्यातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper