28th April 2020
महत्वाच्या बातम्या
चिरनेर (ता. उरण) ः हायवे रोडवर बँक ऑफ महाराष्ट्र येथे बँकिंग कामासाठी परिसरातील नागरिक व महिलांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ फासल्याचे चित्र दिसून आले. (छाया : जीवन केणी)
Read More »
28th April 2020
महत्वाच्या बातम्या
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुरूडमधील अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील डीएलएलइ विभागातील मुलांनी 600 मास्क तयार करून सामाजिक उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले 600 मास्क लोकांसाठी कर्तव्य बजावणारे मुरूड पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय तसेच तहसील …
Read More »
28th April 2020
महत्वाच्या बातम्या
पनवेल ः वार्ताहर अंजुमन-ए-इस्लाम शिक्षणसंस्थेचे एनबीए मानांकनप्राप्त अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेल लॉकडाऊनच्या काळात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत ऑनलाइन माध्यमातून अध्ययन-अध्यापनाचा अभिनव उपक्रम राबवत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून मार्चच्या तिसर्या आठवड्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. काळसेकर पॉलिटेक्निकमधील विविध विभागांचा पदविका अभ्यासक्रम यादरम्यान 85 टक्के पूर्ण झाला …
Read More »
28th April 2020
महत्वाच्या बातम्या
पेण ः प्रतिनिधी पेण शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रचा सायरन रविवारी दुपारी अचानक वाजल्याने पोलिसांची व नागरिकांची एकच धावपळ झाली. तांत्रिक बिघाडामुळे हा सायरन वाजल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. बँकेजवळच डीवायएसपी ऑफिस असल्याने डीवायएसपी नितीन जाधव यांनी त्वरित सायरन वाजल्याची दखल घेऊन पोलीस कर्मचार्यांना बँकेजवळ जाण्यास सांगितले. बर्याच वेळाने …
Read More »
28th April 2020
महत्वाच्या बातम्या
पनवेल ः वार्ताहर संपूर्ण विश्व कोरोना (कोविड-19) नावाच्या आजाराशी झुंज देत असताना पनवेल तालुक्यात संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पनवेल व रायगडमधील कलाकारांना धान्य आणि आर्थिक मदत करण्यात आली. मार्च, एप्रिल, मे महिन्यांत कलाकारांचा विशेष सीझन असतो. त्यामध्ये कलाकार जे काही कमवतो त्यावर नोव्हेंबरपर्यंत आपले घर चालवतो. …
Read More »
28th April 2020
महत्वाच्या बातम्या
खोपोली : प्रतिनिधी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून खोपोलीतील चार प्रभाग प्रशासन व पोलिसांकडून पूर्ण सील करण्यात आले असून, अन्य भागातील रहदारीही रोखण्यात आली आहे. ठरावीक औषधी दुकाने व काही दवाखाने सुरू असले तरी नागरिकांना होम क्वारंटाइन केले असल्याने संपूर्ण शहर सध्या ठप्प आहे. कोरोनाचा एक …
Read More »
28th April 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी तसेच समाजासाठी कार्यरत असलेल्या पोलीस प्रशासनाच्या आरोग्याची काळजी म्हणून क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या वतीने पनवेल येथील खांदेश्वर पोलीस स्टेशन येथे अधिकारी-कर्मचार्यांना पाच लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पोलीस वर्ग प्रत्येक वेळी लोकांपर्यंत पोहचत आहे. ते सतत जागरूक असतात. त्यांच्या आरोग्यासाठी …
Read More »
28th April 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः बातमीदार उन्हाळ्यासह उपवासाच्या रमजान महिन्यात रसदार फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे साहजिकच बाजारात फळांना मागणी वाढली असून निर्यातीतही वाढ झाली आहे. त्यामुळे गेली कित्येक दिवस मरगळ आलेल्या फळ बाजारात आता उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. फळांची हीच मागणी लक्षात घेता बाजार समितीच्या वतीने फळांच्या अतिरिक्त गाड्यांना परवानगी देण्यास …
Read More »
28th April 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः वार्ताहर तालुक्यातील ताडपट्टी मालडुंगे परिसरातील आदिवासी बांधवांसह विधवा व अपंगांना पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. ताडपट्टी मालडुंगे परिसरातील काही आदिवासी बांधवांसह विधवा व अपंगांना अद्यापपर्यंत जीवनावश्यक वस्तू मिळाल्या नसल्याची माहिती पत्रकार संजय कदम यांनी पनवेल तालुका पोलीस …
Read More »
28th April 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः वार्ताहर रामटेक दिपकेर पेस्ट कंट्रोल (नेरूळ) नवी मुंबई विभागाच्या माध्यमातून खांदेश्वर पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिप पेस्ट कंट्रोलकडून खांदेश्वर पोलीस ठाणे इमारतीत व पोलिसांच्या वापरात येणार्या वाहनांवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. दीप पेस्ट कंट्रोल यांनी केलेल्या कामाबद्दल खांदेश्वर पोलीस अधिकारी-कर्मचार्यांनी त्यांचे आभार व्यक्त …
Read More »