Breaking News

महत्वाच्या बातम्या

पेणमधील गणेशमूर्तिकारांना दिलासा

कारखाने लवकरच होणार सुरू आमदार रविशेठ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश पेण : प्रतिनिधीपेणमधील गणपती कारखानदारांना दिलासा मिळाला असून, गणेशमूर्ती कारखाने लवकरच होणार सुरू आहेत. गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पेणमधील मूर्तीकारांचा व्यवसाय कोरोनामुळे अडचणीत आला होता. बाब स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती …

Read More »

परिस्थिती आटोक्यात पण…

लॉकडाऊनमुळेच एव्हाना कोरोनाच्या प्रादुर्भावाचे उत्तम व्यवस्थापन सरकारी यंत्रणांना शक्य झाले आहे. लॉकडाऊनआधी कोरोनाच्या केसेस साडेतीन दिवसांत दुप्पट होत होत्या तर आता हे प्रमाण 12 दिवसांवर आले आहे. हा निश्चितच दिलासादायक बदल आहे. परंतु केसेस मात्र अजूनही वाढत आहेतच. भारतातील लॉकडाऊनचा मंगळवारी 42वा दिवस होता. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या …

Read More »

रोटरॅक्टतर्फे पनवेल महापालिकेला फेस मास्क

पनवेल ः वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल एलिटने पनवेल महानगरपालिकेला फेस मास्क प्रदान केले. मनोज मुनोत आणि मनीष मुनोत यांनी फेस मास्क प्रायोजित केले होते. पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. आयुक्तांनी याबद्दल पॅरंट क्लबचे अध्यक्ष रितेश मुनोत …

Read More »

उरणमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

उरण ः प्रतिनिधी उरण बाजारपेठ सोमवारपासून (दि. 4) सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू करण्यात आली. त्यात दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या वेळी अत्यावशक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. यातील बहुसंख नागरिक दुचाकी घेऊन आल्याचे दिसून आले. परिणामी येथील काही बेशिस्त नागरिकांमुळे सोशल …

Read More »

मिठागर व्यवसायाला उतरती कळा

पेण ः प्रतिनिधी राज्यातील प्रमुख मीठ उत्पादक जिल्हा म्हणून रायगडची ओळख होती. त्यामध्ये पेणचे नाव आवर्जून घेतले जात असे, आज मात्र ही ओळख नामशेष होत चालली आहे. शासनाचे उदासीन धोरण आणि मीठ व्यावसायिकांसमोरील अडचणींमुळे मिठागर व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. काही तालुक्यांत मिठागर व्यवसायाला पोषक धोरणाची स्थिती निर्माण करण्याची मागणी …

Read More »

बँक ऑफ इंडियाकडून सोशल डिस्टन्सिंगचे उत्तम नियोजन

कडाव ः वार्ताहर कर्जत तालुक्यामधील कडाव येथे असणार्‍या बँक ऑफ इंडियात खातेदारांची नेहमीच प्रचंड गर्दी असते, पण सध्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे बँक ऑफ इंडिया कडाव शाखेच्या वतीने कोरोनाला रोखण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून बँक व्यवस्थापक तुकाराम रुपनुर व बँक कर्मचार्‍यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. कडावमधील बँक ऑफ …

Read More »

मद्याची दुकाने सुरू होण्याआधीच पेणमध्ये मद्यपींच्या रांगा

पेण ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात वाइन आणि बीअर शॉप सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर तळीरामांनी दुकाने सुरू होण्याआधीच दुकानांसमोर गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पेणमध्ये वाइन, बीअर शॉप दुकानांसमोर आधीच रांगा लागल्या होत्या. विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली, तसेच अनेक जण आजूबाजूला उभे होते. जिल्ह्यात दारूची …

Read More »

नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये!

सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांचे आवाहन मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेले लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने मंगळवारी (दि. 5) काही दुकाने उघडण्यात आली होती, परंतु आदेशात नमूद नसतानासुद्धा काही कपड्यांची दुकानेही उघडण्यात आली. त्यामुळे मुख्य बाजारात गर्दी झाली होती. ही …

Read More »

खोपोलीत रांगांचा दिवस

नगरपालिका रुग्णालय, वाइन शॉप व बँकांबाहेर मोठ्या रांगा खोपोली ः प्रतिनिधी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेले लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर मंगळवारी (दि. 5) खोपोली शहरात अनोखे व तेवढेच विचित्र आणि भयावह दृश्य सर्वत्र दिसले. परप्रांतीयांची आरोग्य दाखला मिळविण्यासाठी नगरपालिका रुग्णालय आवारात मोठी रांग, तळीरामांच्या शहरातील सर्व वाइन शॉप परिसरात …

Read More »

ओम साई सोसायटीतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उरण ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जारी केल्याने गरीब, गरजू लोकांची उपासमार होत आहे. अशा गरीब, गरजूंना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उरण नगरपालिका हद्दीतील कामठा रोडवरील कामगार वसाहत येथील ओम साई सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने सोसायटीजवळ कचराकुंडीतील कचरा साफ करणार्‍या लोकांना तसेच सोसायटीमध्ये सफाई करणारे, पाणी चालू करणारे …

Read More »