Breaking News

महत्वाच्या बातम्या

आसूडगावात जनता कर्फ्यूला प्रतिसाद

कळंबोली : प्रतिनिधी – खांदा कॉलनीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने या परिसराला लागून असलेल्या आसूडगाव परिसरात कोरोनोचा शिरकाव होवू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आसुडगाव परिसरातील नागरिकांनी एकत्र येत स्वयंस्फुर्तीने दि. 24, 25, 26 एप्रिलला जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्याला सर्व जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदारांनी …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून पनवेल परिसरातील गरजूंना अन्नधान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या गरीब मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व मजुर काही झोपडपट्ट्यांमध्ये तर काहीजण भाड्याने राहतात. संचारबंदी व जिल्हा बंदी असल्यामुळे हाताला काम नसल्यामुळे सर्वच जण बेरोजगार होऊन घरी बसुन आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास …

Read More »

पनवेलमध्ये खोटी हजेरी लावणारा सफाई कामगार निलंबित

38 कर्मचार्‍यांना शिस्तभंगाची नोटीस पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिकेने खोट्या हजेरी लावणार्‍या सफाई कामगाराला निलंबित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामात हलगर्जीपणा करणार्‍या 14 कंत्राटी कर्मचारी,  चार वाहन चालक आणि 20 शिक्षक कर्मचार्‍यांना शिस्तभंगाच्या नोटीसा दिल्या असून अजून काही अनुपस्थितांना त्यांच्या विभागातून माहिती घेऊन शिस्तभंगाची नोटीस देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे …

Read More »

उपजीविकांवर भर हवाच

एकीकडे कोरोनाच्या आणखी फैलावाची भीती आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा फटका व जवळपास 40 कोटी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. या दोन्ही आघाड्यांवर समतोल साधण्याची जबाबदारी केंद्र सरकारला पार पाडायची आहे. हे आव्हान सोपे अजिबातच नाही. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा शेवटचा आठवडा सोमवारपासून सुरू झाला. खरंतर याच्याही आधीपासून सर्वसामान्यांचे …

Read More »

सॅनिटायझरचे मोफत वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मदत नाहीतर कर्तव्य या भावनेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांच्या  माध्यमातून प्रभाग 10 व कळंबोलीतील सर्व किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, डेरीचालक, स्वच्छता दूत, इतर अत्यावश्यक कर्मचार्‍यांना तसेच प्रभागातील नागरिकांना एकूण 80 लिटर सॅनिटायझरचे …

Read More »

चिमूटभर मिठाची कष्टदायी कहाणी

उरण : प्रतिनिधी  – माणूस श्रीमंत असो अथवा गरीब असो तो जे अन्नपदार्थ शिजवून खात असतो अथवा हातगाडीवरील वडापाव असो किंवा पंचतारांकित हॉटेलमधील किमती डिश असो या सर्वांना ज्या चिमूटभर पदार्थाने चव आणली जाते, त्या पदार्थांची निर्मिती आजही कोरोना व्हायरसने जगभरात फैलावलेल्या दहशतीमध्ये करण्यात गुंग असलेले हात तुमच्या-आमच्या जेवणाची तुम्ही-आम्ही …

Read More »

घणसोली गाव स्वतःला करणार क्वारंटाइन

नवी मुंबई : बातमीदार – मुंबई पुण्यानंतर नवी मुंबईला कोरोनाने पछाडले आहे. त्यात नवी मुंबईतील शहरी भाग हॉटस्पॉट ठरत असतानाच घणसोली गावाने देखील आपला अग्रक्रम राखला आहे. त्यानुसार घणसोली गावातील गावकर्‍यांनी समाजमाध्यमांवर चर्चा करून गावाला पुढील 6 दिवस क्वारंटाइन करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या निर्णयाचे …

Read More »

उरणमध्येे वन्य प्राण्यांची सुरक्षा ऐरणीवर!

जेएनपीटीच्या राखीव जंगलात उपाययोजना करण्याची मागणी उरण : प्रतिनिधी – सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या राखीव जंगल डोंगर परिसरात दुर्मिळ वन्यप्राणी भटकंती व रस्ते क्रॉसिंग करताना भरधाव वेगाने धावणार्‍या वाहनाखाली येऊन हकनाक बळी जात आहेत. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे वाहनाखाली येऊन नाहक बळी जाणार्‍या दुर्मिळ वन्यप्राण्यांची संरक्षणासाठी उपाययोजना …

Read More »

रोहा ः रोहा-नागोठणे मार्गावर हॉटेल प्राईडसमोर रोहा पोलिसांकडून लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

Read More »

थर्मल स्क्रिनिंगद्वारे आरोग्य तपासणी

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश व राज्य पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग नगर परिषदेतर्फे अलिबाग -मुरूड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली राम मंदिर व लालबाग परिसरातील 1150 लोकांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी अलिबाग-मुरूड मेडिकल …

Read More »