Breaking News

महत्वाच्या बातम्या

ग्रामीण रुग्णालयात शासकीय कर्मचार्‍यांची कोरोना तपासणी

मुरूड ः प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार मुरूड तहसील व तालुका आरोग्य अधिकार्‍यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार गमन गवित व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड शहरातील विविध 16 कार्यालयांतील 215 कर्मचार्‍यांसह पत्रकारांची कोविड-19 चाचणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीच्या कामात ग्रामीण रुग्णालय डॉ. दिव्या सोनम, …

Read More »

पशू विभागाकडून माकडांना खाद्यपदार्थ

रोहे : प्रतिनिधी रोहा-नागोठणे मार्गावर भिसे खिंडीत अनेक माकडांचा कित्येक वर्षांपासून वावर आहे. या मार्गावरून जाणारे वाहनचालक माकडांची खाण्यापिण्याची व्यवस्था करतात, मात्र लॉकडाऊनमुळे सध्या येथील वाहने बंद आहेत. त्यामुळे आता या मार्गावरील माकडांची खाण्यापिण्याची व्यवस्था रोहा पशू विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वत्र भयाण शांतता पसरली आहे. …

Read More »

वर्षी तप व्रतावर कोरोनाचे सावट; घरीच आटोपला सांगता सोहळा

कर्जत ः बातमीदार कर्जतच्या जैन बंधू-भगिनींनी 13 महिने उपवासाचे वर्षी तप व्रत सुरू केले होते. 141 जणांनी हे व्रत पूर्ण केले. या व्रताचा सांगता सोहळा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अगदी थाटामाटात करण्याचे ठरले होते. त्याची तयारीसुद्धा सुरू करण्यात आली होती, परंतु जगावर अचानक कोरोनाचे संकट आल्याने हा सोहळा रद्द करून प्रत्येकाच्या …

Read More »

मौजे शास्त्रीनगर, खोपोली परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

अलिबाग ः जिमाका जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे शास्त्रीनगर, खोपोली येथे एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेले शास्त्रीनगर, खोपोली येथील प्रभाग क्र. 12 शास्त्रीनगर व प्रभाग क्र. 11 विनानगर, खोपोली, ता. खालापूर हा परिसर (हॉस्पिटल व औषधांची दुकाने वगळून) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना …

Read More »

तबेल्यातील मलमूत्राची तक्रार केल्याने जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील लाडीवली गावात म्हशींच्या तबेल्यातील मलमूत्र रस्त्याने वाहत असल्याबाबत आवाज उठवल्याने तरुणाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तिवरे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली गावात ग्रामपंचायतीकडून गटार साफसफाईचे काम सुरू होते. या कामात रस्त्यावरील गटाराचे स्लॅब तोडू नये, …

Read More »

गणेशमूर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून सूट द्यावी; मूर्तिकार, स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी

पेण ः प्रतिनिधी जगभरात हाहाकार माजविलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील अनेक लहान मोठ्या उद्योग व्यवसायांना याचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन काळात गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण शहरातील गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायालाही संकटाचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून सूट देण्याची …

Read More »

कोरोनामुळे देशात एका दिवसात 47 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनामुळे एकूण 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 826वर गेली आहे. एकाच दिवसात आणखी 1 हजार 975 रुग्णांचीही भर पडली. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 27 हजारांजवळ पोहोचली आहे. रविवारी (दि. …

Read More »

उरण परिसर फ्लेमिंगो पक्ष्यांनी फुलला

उरण : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप कमी झाला असून, त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषणही कमालीचे घटले झाले आहे. हे मोकळे वातावरण आणि प्रदुषणमुक्त वातावरण पक्षांसाठी पोषक ठरू लागले आहे. उरण परिसरात स्थलांतर करणारे विशेषतः फ्लेमिंगो पक्षी मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडू लागले आहेत. फ्लेमिंगोंच्या वाढत्या संख्येबरोबरच …

Read More »

लॉकडाऊन काळात बेकायदा मासेमारी

दोन बोटींवर कारवाई अलिबाग : प्रतिनिधीलॉकडाऊनच्या काळात बंदी असलेल्या एलइडी दिव्यांचा वापर करीत मासेमारी करणार्‍या दोन बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. ज्ञानेश्वरी माऊली व भक्त मल्हार अशी या बोटींची नावे आहेत. या बोटी त्यावरील साहित्य जप्त करण्यात आले आहे. रायगडच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने ही कारवाई केली.  गेले महिनाभर लॉकडाऊनमुळे मासेमारी …

Read More »

रायगड जिल्ह्यातकोरोनाचा तिसरा बळी

कामोठ्यातील पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू पनवेल : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूने तिसरा बळी घेतला आहे. कामोठे येथील पोलीस हेड कॉन्स्टेबलचा रविवारी (दि. 26) एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याआधी जिल्ह्यात खारघर येथील रिक्षाचालकाचा आणि पोलादपूर येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.कामोठे येथील 53 वर्षीय हेड कॉन्स्टेबलला कोविड विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान …

Read More »