आमदार महेंद्र थोरवे यांची सूचना; नुकसानीची केली पाहणी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील भातशेती आणि अन्य प्रकारच्या शेतीचे झालेले नुकसान यांची नोंद शासनाने करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना 100 टक्के भरपाई दिली पाहिजे, अशी भूमिका आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे. तालुक्यातील मांडवणे, आंबोट भागातील नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केल्यानंतर तसे आदेश …
Read More »नवीन पनवेल परिसरात छट्पर्व उत्साहात, आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले छट्पूजेचे दर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात उत्तर भारतात छट्पर्व मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते. त्यानिमित्त नवीन पनवेल, खांदा कॉलनी, खारघर, कामोठे, कळंबोली येथे छट्पूजा उत्साहात करण्यात आली. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध ठिकाणी जाऊन छट्पूजेचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता …
Read More »अविस्मरणीय भाऊबीज…
भाऊबीज म्हणजे दिवाळीतील एक अतूट नात्याचा दिवस… भावाबहिणीचं नातं दृढ करणारा प्रेम वाढवणारा सण. माझा एक मित्र गावाला घरी सण साजरा करण्यासाठी गेला होता. सकाळी भाऊबीज आटोपून त्याने पुण्याला निघण्याचा निर्णय घेतला. सणासुदीचे दिवस त्यामुळश एसटीला गर्दी होती. घरचे आरक्षण करून जा म्हणत होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून हा निघाला. …
Read More »सुकापूरमध्ये शेकापला पुन्हा धक्का!, कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल परिसरात मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी छट्पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत सुकापूर येथे भाजप उत्तर भारतीय समितीतर्फे छट्पूजेनिमित्त शनिवारी (दि. 2) भजनसंध्या आयोजित करण्यात आली होती. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. सुकापूर येथे शनिवारी …
Read More »भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ ः पंतप्रधान
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था उद्योजकांना आवाहन करताना भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. बँकॉक येथे आयोजित आदित्य बिर्ला समूहाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. मोदी तीन दिवसांच्या थायलंड दौर्यावर आहेत. मोदी आपल्या दौर्यादरम्यान असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स (आसियान), पूर्व आशिया आणि प्रादेशिक व्यापक …
Read More »खारघर ः गुजराती नववर्ष, अन्नकुट दर्शनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात सद्गुरू संत भक्तिप्रिय तथा कोठारी स्वामींचे आशीर्वाद घेतले. या वेळी भाजप खारघर शहर सचिव विपुल चौटालिया उपस्थित होते.
Read More »पनवेल ः उसर्ली येथील ग्रामस्थांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रविवारी सदिच्छा भेट घेतली. या वेळी भूषण पाटील, प्रवीण बढे, विक्रम साबळे, संजय मेश्राम, उमेश कारभारी, कृष्णा कोळी, अमर कोळी, कुणाल चोरगे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Read More »‘जिथे यंत्रणा पोहचणार नाही, तिथेही मदत करणार’
अकोला ः प्रतिनिधी गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाडा, विदर्भ, कोकणासह राज्यातील अनेक भागांना फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. या वेळी अधिकार्यांच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अधिकार्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेेश दिले, …
Read More »सरकार लवकरच स्थापन होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रसारमाध्यमांना माहिती
अकोला : प्रतिनिधी ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचण होते. लवकरात लवकर सरकार स्थापन करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौर्यावर आले आहेत. …
Read More »अयोध्या ः सुरक्षा वाढवण्याची मुस्लिमांची मागणी
नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जागेवरचा अंतिम निर्णय येण्याआधी अयोध्येत अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावरच्या फैसल्याआधी मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे केंद्रीय अर्धसैनिक दल (पॅरामिलिट्री फोर्स) तैनात करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अयोध्येत ज्या भागात मुस्लिमांची संख्या बर्यापैकी आहे त्या भागात सुरक्षा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper