उरण : प्रतिनिधी देशातील शासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली असल्याने त्याचा मनस्ताप जनतेला वारंवार सोसावा लागत आहे. या भ्रष्टाचाराचा बंदोबस्त कसा करावा या अनुषंगाने वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनींचे उरणच्या तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यासमोर भ्रष्टाचारविषयक जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. आज शासकीय यंत्रणेत जनतेला लहानशा कामासाठी लाच …
Read More »साजन भानवालचे कांस्य हुकले जागतिक युवा कुस्ती स्पर्धा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था तीन पदकांचा मानकरी ठरलेल्या साजन भानवाल (77 किलो) याला ग्रीको-रोमन प्रकारात कांस्यपदकाने हुलकावणी दिली. बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी भारताच्या रवीने (97 किलो) रिपिचेज फेरीत स्थान मिळवले आहे. तुर्कीच्या सेरकान अयोकुन याच्यासमोर भानवालचा निभाव लागला नाही. त्यामुळे कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत …
Read More »चेन स्नॅचिंगवर नियंत्रण आणण्याची मागणी, खारघर पोलिसांना महिलांनी दिले निवेदन
खारघर : प्रतिनिधी खारघर शहरात नजीकच्या काळात चेन स्नॅचिंगचे प्रकार सर्वच सेक्टरमध्ये वाढले आहेत. संबंधित प्रकाराने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याने पोलिसांनी यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्याची मागणी शुक्रवारी (दि. 1) खारघर भाजपच्या महिला पदाधिकार्यांनी केली. भाजपच्या महिला मोर्चाच्या चिटणीस बिना गोगरी यांनी …
Read More »रोहित शर्माने विराट, धोनीलाही टाकले मागे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा सलामीवीर आणि टी-20 क्रिकेट संघाचा बदली कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात अवघ्या नऊ धावा करून बाद झाला, मात्र या नऊ धावांसह त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये मोठा टप्पा गाठला. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. रोहितने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने …
Read More »नुकसानीचे पंचनामे लवकर करावेत, भाजपचे केळवणे विभाग अध्यक्ष किरण माळी यांची मागणी
मोहोपाडा : प्रतिनिधी या वर्षी झालेला पाऊस आणि त्यामुळे बहरलेली शेती शेतकर्यांना सुखद करणारी होती, मात्र परतीच्या अवेळी पावसाने बहरलेल्या भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकर्यांचे डोळे पाणावले आहेत.शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून गरीब शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केळवणे भाजप विभागप्रमुख किरण माळी, तसेच रसायनी पाताळगंगा परिसरातील शेतकर्यांनी केली …
Read More »भारतीय महिलांची विंडीजवर मात; मराठमोळी पूनम राऊत चमकली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मराठमोळी पूनम राऊतचे अर्धशतक आणि कर्णधार मिताली राज-हरमनप्रीत कौरच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय महिलांनी दुसर्या वन डे सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय महिलांनी 6 गड्यांच्या मोबदल्यात 191 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी केलेल्या भेदक मार्याच्या जोरावर भारतीय महिलांनी 53 धावांनी विजय मिळवला. …
Read More »परतीचा पाऊस, वादळाचा पर्यटन व्यवसायावर परिणाम
अलिबाग ः प्रतिनिधी दिवाळीपासून रायगड जिल्ह्यात पर्यटन हंगाम सुरू होतो, परंतु यंदा परतीचा पाऊस आणि चक्रीवादळाचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. दिवाळीची सुटी असतानादेखील रायगड जिल्ह्यात फार कमी पर्यटक येत आहेत. गोव्यापाठोपाठ कोकणातील समुद्रकिनार्यांनी पर्यटकांना भुरळ पाडली आहे. नारळी-पोफळीच्या बागा, रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणार्या लाटा यामुळे रायगडचे समुद्रकिनारे …
Read More »लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची एसबीआयची सूचना
मुंबई ः प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्व पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. पेन्शनधारकांना ज्यांचे निवृत्ती वेतन एसबीआयच्या खात्यात जमा होते अशांना 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आपलं लाइफ सर्टिफिकेट (जिवंत असल्याचं प्रमाणपत्र) जमा करण्यास बँकेकडून सांगण्यात आलं आहे. एसबीआयच्या कोणत्याही शाखेत हे …
Read More »पालकमंत्र्यांनी शेतकर्यांशी साधला संवाद
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मौजे खंडाळा, रामराज, पेण तालुक्यातील वाशी खारेपाट व हमरापूर विभाग, पनवेल तालुक्यातील तारा या गावातील अतीवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या भात पिकाच्या शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शेतकर्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत अलिबागचे आमदार महेंद्र …
Read More »गोवंश हत्येप्रकरणी खालापुरात एकाला अटक
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील हाळ बुद्रुक गावातील रियाज अब्दुल कादीर जळगावकर याला पोलिसांनी गोवंश हत्येप्रकरणी अटक केली आहे. हाळ बुद्रुक गावात बेकायदा गुरांची कत्तल होत असल्याची माहिती खालापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हाळ बुद्रुक गावात छापा टाकला असता रियाज हा गोवंश जातीच्या प्राण्याची हत्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper