Breaking News

महत्वाच्या बातम्या

विनोद घोसाळकर यांची माणगावात प्रचारफेरी

माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील प्रचाराने वेग घेतला असून, महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी कार्यकर्त्यांसह माणगाव बाजारपेठेत प्रचार दौरा केला. या वेळी विनोद घोसाळकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.  या वेळी शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, अ‍ॅड. राजीव साबळे, प्रमोद घोसाळकर, माणगाव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, अजित …

Read More »

विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हा!

माजी जि. प. सदस्या कौसल्या पाटील यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी विरोधी पक्षाच्या आडमुठ्या धोरणामुळे खारेपाट भागाचा विकास खुंटला असून, या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी रविशेठ पाटील यांच्या रूपाने संधी चालून आली आहे. या संधीचे सोने करून घ्या, असे आवाहन माजी जि. प. सदस्या कौसल्या पाटील यांनी केले. भाजप-शिवसेना-आरपीआय …

Read More »

कर्जत मेडिकल असोसिएशनची सामाजिक संदेश देणारी कोजागरी

हेल्मेट घालून केले दांडिया नृत्य कर्जत : बातमीदार दुचाकी चालविताना हेल्मेट वापरले पाहिजे, असा संदेश देण्यासाठी कर्जत मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी हेल्मेट घालून दांडिया खेळत कोजागरी पौर्णिमा साजरी केली. कर्जत मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून येथील रॉयल गार्डनच्या सभागृहात कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कर्जत मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी …

Read More »

वीजपुरवठ्याअभावी उपकरणे बंद

महाराष्ट्र बँकेच्या कर्जत शाखेचे व्यवहार ठप्प कर्जत : प्रतिनिधी बँक बंद होणार, या अफवेमुळे दोन दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कशेळे शाखेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत तीन महिला जखमी झाल्या होत्या. त्यातच शनिवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने या बँकेच्या कर्जत शाखेमधील उपकरणे बंद पडली व बँकेचे …

Read More »

सर्वांनी मतदान करा

निवासी नायब तहसीलदार समीर देसाई यांचे आवाहन पोलादपूर एसटी स्थानक आणि सडवली आदिवासीवाडीत पथनाट्य पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी आणि प्रिझम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 15) दुपारी पोलादपूर एसटी स्थानक आणि  तालुक्यातील सडवली आदिवासीवाडीत पथनाट्यांद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, …

Read More »

मतदारच विरोधकांना आता घाम फोडतील

आमदार भरत गोगावले कडाडले पोलादपूर : प्रतिनिधी महाड विधानसभा मतदारसंघात रोजच्या रोज काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सेनेत प्रवेश करीत आहेत. पोलादपूर तालुक्यातील जनता विकासाला हपापलेली आहे. येथील मतदार विरोधकांना घाम फोडतील, असा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी लोहारे येथे व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांच्या प्रचारासाठी पोलादपूर तालुक्यातील लोहारे पंचायत …

Read More »

उलवे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने विद्यालयात विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात इसेन्स ऑफ सायन्स मॅगझिनचे अनावरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या सायन्स असोसिएशनकडून ‘पोस्टर प्रेझेन्टेशन’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम शनिवारी (दि. 12) आयोजित करण्यात करण्यात आला होता. या कार्यक्रमात पोस्टर प्रेझेन्टेशनबरोबर सायन्स असोसिएशन प्रकााशित ‘इसेन्स ऑफ सायन्स’ या मॅगेझिनचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय निश्चित

शिवसेना उपजिल्हा संघटक परेश पाटील यांचा विश्वास कळंबोली ः वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी युती सरकारच्या माध्यमातून पनवेलचा केलेला विकास हेच त्यांच्या विजयाचे गमक असून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी शिवसैनिक आकाशपाताळ एक करीत असून त्यात आम्ही यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास शिवसेना उपजिल्हा संघटक परेश …

Read More »

फणसवाडी ग्रामस्थ भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या विकासकामांवर प्रभावित होऊन पनवेल तालुक्यातील फणसवाडी येथील ग्रामस्थांनी ‘कमळ’ हाती घेतले. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचा निर्धार पक्षप्रवेशकर्त्यांनी या वेळी बोलून दाखविला. सर्वांचे भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत केले. या वेळी रामा वारगडा, सोमा वारगडा, मंगळ्या …

Read More »