ऐतिहासिक आणि शिवकालीन महत्त्व असलेल्या पोलादपूर तालुक्याचे जात आणि व्यवसायदृष्टया फारच कमी भेद आढळून येत आहेत. यामध्ये मराठा, कुणबी आणि महादेव कोळी या तीन जातींची व्याप्ती लक्षणीय असून या तीनही जातींमध्ये रोटी-बेटी व्यवहार पुर्वापार सुरू आहेत. अलिकडे, आरक्षणाच्या मुद्दयांवरून मराठा अग्रेसर आहेत तर कुणबी इतर मागासवर्गीय म्हणून आरक्षणाच्या प्रतिक्षेत आहेत. …
Read More »दिवाळखोरीचे राजकारण
ठाकरे सरकारनेही आपल्या कार्यकाळात जुन्या पेन्शनचा मुद्दा दूरच ठेवला होता हे सर्वज्ञात आहे. असे असूनही केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आता उद्धव ठाकरे जुन्या पेन्शनच्या मुद्दयाला पाठिंबा देत सरकारी कर्मचार्यांच्या संपाला बळ देतात हे आश्चर्यकारक आहे. राज्यकारभार चांगला चालवण्यासाठी सत्ताधारी कर्तृत्ववान आणि शुद्ध हेतूने काम करणारा असावा लागतो, तसाच विरोधीपक्ष …
Read More »कामोठ्यात रंगला खेळ पैठणीचा
अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे भारतीय जनता पक्ष आणि संस्कार महिला संस्थेच्या वतीने हळदी कुंकू समारंभ कामोठेमधील सुषमा पाटील विद्यालयात मंगळवारी (दि. 14) झाला. या समारंभाचे उद्घाटन अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले असून, या सोहळ्याला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कामोठे शहर संस्कार …
Read More »शेकाप व मविआच्या ढोंगीपणाला जनता कंटाळली
भाजप नेते परेश ठाकूर यांची मालमत्ता कराविरोधातील मोर्चानंतर टीका पनवेल : प्रतिनिधी मालमत्ता कराविरोधात पनवेलमध्ये सोमवारी मोर्चा काढून पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेविरोधात विष कालवण्याचे काम महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून होत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भाजप सातत्याने सर्वसामान्य जनतेच्या हिताची काळजी करीत आहे. म्हणूनच …
Read More »‘न्हावा-शिवडी सेतुबाधितांना त्वरीत भरपाई द्या’
आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची लक्षवेधी सूचना मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) उभारण्यात येणार्या रायगड जिल्ह्यातील न्हावा-शिवडी सेतु प्रकल्पाच्या बांधकामामुळे न्हावा, गव्हाण, घारापुरी हद्दीतील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे व मच्छीमार बांधवांचे पुनर्वसन अद्यापपर्यंत झालेले नाही. याबाबत पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर व उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी …
Read More »आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून पनवेल, उरणच्या शाळांना संगणक वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या 2022-23च्या स्थानिक विकास निधीतून शाळांना डिजिटल साहित्य वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल, उरण परिसरातील शाळांना संगणक देण्यात आले आहेत. कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. यामध्ये …
Read More »विचुंबे येथे रस्त्याचे लोकार्पण आणि भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आठ लाख 36 हजार रुपयांच्या निधीतून माऊली सोसायटी रस्त्याचे काँक्रीटीकरण्यात आले आहे. या रस्त्याचे लोकार्पण आणि 10 लाख रुपयांच्या निधीतून निलकंठ सोसायटी ते ग्रीन व्हॅली सोसायटीपर्यंतच्या करण्यात येणार्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …
Read More »आजिवलीत रस्ता कामाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या निधीतून पनवेल तालुक्यातील आजिवली येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या विकासकामाचा शुभारंभ भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासाकरीता निधीची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन केले. …
Read More »पनवेल येथे रस्ते दुभाजकांमध्ये माती टाकण्यास सुरुवात
भाजप नेते रावसाहेब खरात यांचा यशस्वी पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यासाठी माती टाकण्यात आली आहे. या कामी भाजप अनुसूचित मोर्चा पनवेल तालुका उपाध्यक्ष रावसाहेब खरात यांनी पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. पनवेल शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून ते पुर्वेस असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या …
Read More »पनवेल वाहतूक शाखेतर्फे 53 जणांवर कारवाई
पनवेल : प्रतिनिधी पनवेल वाहतूक शाखेतर्फे सोमवारी (दि. 13) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 53 जणांवर कारवाई करण्यात येऊन 23 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही विशेष मोहीम वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. पनवेलच्या वाहतूक शाखेतर्फे सोमवारी कोळखे गाव (जुना मुंबई पुणे हायवे) येथे सायंकाळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper