Breaking News

महत्वाच्या बातम्या

नेरळ-माथेरान मिनीट्रेन 10 जूनपासून पावसाळी सुटीवर

शटल सेवा राहणार सुरू माथेरान : रामप्रहर वृत्त पर्यटकांचे आकर्षण नेरळ-माथेरान मिनीट्रेन म्हणजे माथेरानची राणी 10 जूनपासून पावसाळी सुटीवर जाणार आहे. माथेरान-अमन लॉजदरम्यान धावणारी मिनीट्रेनची शटलसेवा पावसाळ्यातही सुरूच राहणार आहे. सन 1907मध्ये माथेरान मिनीट्रेनची सेवा सुरू झाली होती. 2005च्या अतिवृष्टीचा अपवाद वगळता ही मिनीट्रेन अव्याहतपणे पर्यटक प्रवाशांना सेवा देत आहे. …

Read More »

उरण विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते करणार भाजपमध्ये प्रवेश

जेएनपीटी मल्टीपर्पज हॉलमध्ये शनिवारी समारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसमावेशक धोरण आणि सक्षम नेतृत्व असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांचा ओढा सातत्याने वाढत आहे. अशाच प्रकारे उरण विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते विकासाचे ‘कमळ’ हाती घेणार आहेत. हा पक्षप्रवेश समारंभ शनिवारी (दि. 10) जेएनपीटी हॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता होणार आहे. …

Read More »

देशाच्या प्रगतीमध्ये व्यापार्‍यांची भूमिका महत्त्वाची

भाजप क्लस्टर संयोजक संजय टंडन यांचे प्रतिपादन पेण ः प्रतिनिधी अनेक छोट्या-मोठ्या योजनांमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावले आहे. नऊ वर्षांत एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आलेले नाही. देशाच्या प्रगतीमध्ये व्यापारी वर्गाची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन भाजपचे क्लस्टर संयोजक संजय टंडन यांनी पेण येथे केले. भाजप महाजनसंपर्क अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील व्यापारी …

Read More »

आदिवासी शेतकरी बांधवांना भाजीपाला, भात बियाणे वाटप

पनवेल : वार्ताहर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेडच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील लहान धामणी, मोठी धामणी, औशाची वाडी येथील आदिवासी शेतकर्‍यांना भाजीपाला व भात बियाणे वाटप करण्यात आले. ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड आणि सावली संस्था यांच्या माध्यमातून आदिवासी शेतकर्‍यांना नेहमी फायदा होतोय. आता पर्यंत कंपनीच्या माध्यमातून फळझाडे, घरकुल, करोना …

Read More »

एनआरआयच्या घनकचरा प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी

नवी मुंबई : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षणामध्ये घरातूनच ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे कचरा वर्गीकरण करण्यात येत आहे त्याचप्रमाणे दररोज 100 मेट्रीक टनाहून अधिक कचरा निर्माण करणार्‍या मोठ्या संस्था, सोसायट्या, हॉटेल्स यांनी आपल्या ओल्या कचर्‍यावर आपल्याच आवारात प्रक्रिया करणे घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार आवश्यक असून त्याकडेही विशेष लक्ष दिले …

Read More »

भाजपसाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे त्याग आणि योगदान अमूल्य -आमदार गणेश नाईक

नवी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांशी हितगुज संवाद मेळावा नवी मुंबई : बातमीदार केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या लोककल्याणकारी सरकारला 30 मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त देशभर मोदी9 हे विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबर संवाद आणि हितगुज कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या वतीने ऐरोली विधानसभा …

Read More »

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गुरुवारी (दि. 8) पनवेल शहर पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या …

Read More »

अनधिकृत शाळांमुळे प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी पनवेल तालुक्यातील दहा शाळा अनधिकृत जाहीर केल्याने तेथील प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. त्यांना दुसर्‍या शाळेत प्रवेश देण्याची व फी परत मिळवून देण्याची जबाबदारी कोणाची? आपल्या पाल्याच्या भविष्याच्या चिंतेमुळे शिक्षण खात्याला एवढ्या उशिरा का जाग आली. या शाळा जाहिरात …

Read More »

कर्ज परतफेडीसाठी मंदिरातील देव पळवले

रेवदंडा मंदिर चोरीप्रकणी मुद्देमालासह आरोपी जेरबंद अलिबाग, रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा येथील तीन मंदिरांमध्ये झालेल्या देवाच्या मूर्तींच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी एकाला मुद्देमालासह अटक केली आहे. महेश चायनाखवा असे आरोपीचे नाव असून कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने या चोर्‍या केल्याचे तपासात पुढे आले आहे. 18 मे रोजी रेवदंडा थेरोंडा येथील खंडेराव पाड्यातील खंडोबा …

Read More »

हिंसाचारामागे कोण?

समाजमाध्यमे कशाप्रकारे माथी भडकवू शकतात याचे प्रत्यंतर गेले दोन-तीन महिने महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा येत आहे. जाणून-बुजून राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, का असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील ताज्या हिंसाचारानंतर उपस्थित केला आहे, तो रास्तच म्हणावा लागेल. कोल्हापुरात मंगळवारी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असतानाच काही …

Read More »