पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जन शिक्षण संस्था रायगडमार्फत गरीब व गरजू महिलांसाठी मोफत शिवण व ब्युटीपार्लर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना उद्या मंगळवारी (दि. 23) प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. शक्ती अव्हेनू बिल्डींग, …
Read More »निवडणुकांपूर्वी सिडकोच्या घरांसाठी अर्जविक्री
नवी मुंवई : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सिडकोच्या 90 हजार घरांसाठी अर्ज विक्री सुरू करण्याचे संकेत सिडकोच्या संबंधित विभागाने दिले आहेत. त्यामुळे मागील सोडतीत संधी हुकलेल्या ग्राहकांना घरासाठी पुन्हा एकदा नशीब आजमावता येणार आहे. सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरांसाठी प्रत्यक्ष अर्ज विक्री …
Read More »वहाळ येथील विजेच्या खांबांना संरक्षण कव्हर
उलवे : रामप्रहर वृत्त वहाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील वीज खांबांना प्रोटेक्शन कव्हर बसविण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये विजेच्या खांबांना लागणार्या विजेच्या झटक्यामुळे होणार्या दुर्घटनांना टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचा शुभारंभ उलवे नोडचे कार्यकारी अभियंता अविनाश राठोड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 22) …
Read More »लायन्स क्लबच्या वतीने गरजूंना आधार
उरण : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण शहरातील गरीब व गरजूंना उन्हात व पावसाळ्यात होणारा त्रास कमी होण्यासाठी सोमवारी (दि. 22)छत्र्या देऊन मदतीचा हात दिला. लायन्स क्लब ऑफ उरणचे सन 2019-20 चे अध्यक्ष लायन डॉ. अमोल ओंकार गिरी यांच्या या वर्षाच्या उपक्रमामध्ये पहिला समाजोपयोगी उपक्रम राबवून चांगली कामगिरी …
Read More »सीकेटी इंग्रजी माध्यमात शपथग्रहण सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी विद्यालयात इंग्रजी माध्यमात लाल, हिरवा, पिवळा व निळा या चारही कुलांच्या प्रमुख, उपप्रमुख, तसेच सांस्कृतिक प्रमुख, शिस्तप्रमुख, क्रीडाप्रमुख आणि शिस्त नियंत्रक विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण सोहळा दिनांक 22 जुलै 2019 रोजी मोठ्या दिमाखात पार पाडला. या सोहळ्याला पनवेल महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी मनीषा मानकर या प्रमुख पाहुणे …
Read More »भिंगारी जिल्हा परिदषदेच्या शाळेत वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भिंगारी गावातील रायगड जिल्हा परिदषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळळाच्या वतीने वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम भिंगारी गावातील कराडी समाज हॉलमध्ये झाला. या वेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे आणि माजी उपमहापौर चारुशीला घरत उपस्थित होत्या. श्री …
Read More »श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे विविध शाळांमध्ये वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील चिंध्रण, मोरबे, रीटघरमधील शाळांमध्ये वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पनवेल तालुक्यातील चिंध्रण, मोर्बे, रीटघरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि रिटघरमधील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय …
Read More »‘त्या’ सहा धावा चुकीच्याच
पंचांनी दिली कबुली कोलंबो ः वृत्तसंस्था वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ओव्हर थ्रोच्या सहा धावा देण्याचा माझा निर्णय चुकीचाच होता; पण त्याचा मला खेद वाटत नाही, हे उद्गार आहेत श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांचे. वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत ‘ओव्हर थ्रो’ आणि त्यामुळे इंग्लंडला लाभलेल्या सहा धावांची सर्वाधिक चर्चा झाली. तो …
Read More »अखेरच्या वन डे सामन्यात विजयासह भारत अ संघाने मालिका जिंकली
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचे शतक एका धावेने हुकले मुंबई ः प्रतिनिधी पाचव्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज ‘अ’ संघावर मात करत मालिकेत 4-1ने बाजी मारली आहे. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले 237 धावांचे आव्हान भारतीय संघाने केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारतीय संघाचे सलामीवीर शुभमन गिल आणि ऋतुराज …
Read More »धोनीकडून चेंडू निवड समितीच्या कोर्टात
मुंबई ः प्रतिनिधी 2019 विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू झाली आहे. अद्याप धोनीने निवृत्तीविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. आगामी वेस्ट इंडिज दौर्यात मात्र आपण खेळणार नसल्याचे धोनीने निवड समितीला कळवले आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर संघात निवडायचे की नाही, हा निर्णय निवड समितीनेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper